Sunday, August 2, 2020

आजची प्रश्नमंजुषा उपक्रमाची सांगता

प्रश्नमंजुषा भाग १०० ची उत्तरे
1] ताटवा
2] 00:00
3] कार्ल लँडस्टेनर
4] शिवनेरी
5] १६ सष्टेंबर
6] GOOD THINGS TAKE TIME
7] महात्मा गांधी
8] खाशाबा जाधव
9] सिंधुदुर्ग
10] पेदेमरी व्यंकट सुब्बाराव

सर्वांना नमस्कार..!!
     आजची प्रश्नमंजुषा या सदराचे काल १०० भाग पूर्ण झाले.आपणा सर्वांच्या प्रतिसादाने हे सदर खूप प्रसिद्धही झाले.यानिमित्ताने माझा refresh असा अभ्यासही झाला.अनेक शिक्षकांनी हा छोटा अभ्यास सर्व विद्यार्थी पालकवर्गापर्यंत पोहोचवला.whatsapp group च्या माध्यमातून ख-या अर्थाने तमाम शिक्षकांनी हे सदर मोठे केले.महत्त्व ओळखून लाॕकडाऊनमध्ये या रंजक उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन करण्यास प्रेरीत केले.
        आदरणीय प्रेरक मार्गदर्शक मा.श्री.रमेश चव्हाण साहेब ( गटशिक्षणाधिकारी पं.स.जावली ), मा.भागशिक्षणविस्ताराधिकारी कल्पना तोडरमल (पं.स.जावली ), केंद्रप्रमुख मा.विजयकुमार देशमुख, सर्व आदरणीय केंद्रप्रमुख पं.स.जावली व आपण तमाम महाराष्ट्रातील सर्व आदरणीय गुरुजन यांची प्रेरणा लाभली व मार्गदर्शन मिळाले.
          शिक्षक मंच सातारा, दैनिक रयतेचा वाली यांनी हे सदर महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवले.आज online प्रश्नमंजुषा घेत मुलांना या सदराचा आनंद देत आहोत.यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक मंच सातारा तर्फे एक प्रमाणपञ ही दिले जाईल.
        पुन्हा एकदा सर्वांचे आभार..!!!
        भेटू या पुन्हा एकदा  *विद्यार्थीहितासाठी..!!*
        तोपर्यंत नमस्कार !!

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob .9922777064

Saturday, August 1, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग १०० वा

प्रश्नमंजुषा भाग क्र.९९ ची उत्तरे
1] संदीप खरे
2] ञिमितीय वस्तू
3] लुई पाश्चर
4] केशरी
5] तेरेखोल
6] pictogram
7] नरेंद्र दाभोळकर
8] स्नेहल कदम
9] नाशिक
10] तहसिलदार

आजची प्रश्नमंजुषा भाग १०० वा
1] फुलझाडांच्या समूहाला काय म्हणतात ?
2] 24 तासांच्या डिजिटल घड्याळात मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत, ही वेळ कशी दिसेल ?
3] मानवी रक्तगटांचा शोध कोणी लावला ?
4] शिवाईदेवीचे मंदिर असणारा किल्ला कोणता ?
5] जागतिक ओझोन दिन कधी येतो ?
6] ' चांगल्या गोष्टींना वेळ लागतो ' या अर्थाची कोणती इंग्रजी म्हण आपण शिकला आहात ?
7] ' मानवता हाच खरा धर्म ' हे बोल कोणाचे ?
8]  आॕलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक खेळातील पहिले पदक मिळविणारे सातारा जिल्ह्यातील खेळाडू कोण ?
9] महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ' पहिला पर्यटन जिल्हा ' म्हणून घोषित झाला आहे ?
10] 'भारत माझा देश आहे ' या प्रतिज्ञेचे लेखक कोण ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob .9922777064