Sunday, August 2, 2020

आजची प्रश्नमंजुषा उपक्रमाची सांगता

प्रश्नमंजुषा भाग १०० ची उत्तरे
1] ताटवा
2] 00:00
3] कार्ल लँडस्टेनर
4] शिवनेरी
5] १६ सष्टेंबर
6] GOOD THINGS TAKE TIME
7] महात्मा गांधी
8] खाशाबा जाधव
9] सिंधुदुर्ग
10] पेदेमरी व्यंकट सुब्बाराव

सर्वांना नमस्कार..!!
     आजची प्रश्नमंजुषा या सदराचे काल १०० भाग पूर्ण झाले.आपणा सर्वांच्या प्रतिसादाने हे सदर खूप प्रसिद्धही झाले.यानिमित्ताने माझा refresh असा अभ्यासही झाला.अनेक शिक्षकांनी हा छोटा अभ्यास सर्व विद्यार्थी पालकवर्गापर्यंत पोहोचवला.whatsapp group च्या माध्यमातून ख-या अर्थाने तमाम शिक्षकांनी हे सदर मोठे केले.महत्त्व ओळखून लाॕकडाऊनमध्ये या रंजक उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन करण्यास प्रेरीत केले.
        आदरणीय प्रेरक मार्गदर्शक मा.श्री.रमेश चव्हाण साहेब ( गटशिक्षणाधिकारी पं.स.जावली ), मा.भागशिक्षणविस्ताराधिकारी कल्पना तोडरमल (पं.स.जावली ), केंद्रप्रमुख मा.विजयकुमार देशमुख, सर्व आदरणीय केंद्रप्रमुख पं.स.जावली व आपण तमाम महाराष्ट्रातील सर्व आदरणीय गुरुजन यांची प्रेरणा लाभली व मार्गदर्शन मिळाले.
          शिक्षक मंच सातारा, दैनिक रयतेचा वाली यांनी हे सदर महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवले.आज online प्रश्नमंजुषा घेत मुलांना या सदराचा आनंद देत आहोत.यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक मंच सातारा तर्फे एक प्रमाणपञ ही दिले जाईल.
        पुन्हा एकदा सर्वांचे आभार..!!!
        भेटू या पुन्हा एकदा  *विद्यार्थीहितासाठी..!!*
        तोपर्यंत नमस्कार !!

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob .9922777064

6 comments:

  1. 👌💐💐💐(सुजाता जाधव)

    ReplyDelete
  2. आजची प्रश्नमंजुषा या सदराचे कधी शंभर भाग पूर्ण झाले हे लक्षातही आले नाही. यामुळे विद्यार्थी मित्रांबरोबरच आमचाही अभ्यास झाला. धन्यवाद जाधव सर

    ReplyDelete
  3. Corona lockdown maddhe Jo prashana manjushecha upkram rabvala to stuttya hota tyamule buddhila chalna milali tasech bauddhik manoranjan zale satat Corona news aikun sarvanchach mendu badhir zala hota prashna hi darjedar hote khara shikshak Jo satat dnyandanache Kam karto tyana lockdown chya maryada yet nahit .shubhecchya from: pramod & gulabrao motling udtare.

    ReplyDelete
  4. Lockdown maddhe aapan rabavlelya prashana manjushya ya upkramacha aamchya mulana khup fayda zala.shala band aslyamule dnyanarjanache Kam bandach hote ha upkram online aslyamule & mobile ha mulanchya aavdicha vishay aslyamule tyani prashana manjushela aavdine pratisad dila udyachya bhagat Kay prashana astil yachi utkhantha Norman hot as.& Vicharlelya prashanachya uttarasathi gharat all member maddhe vichar manthan ghadayche ya upkramamule mulanchya barobar palkanchi hi jindnyasu vrutti vadhali.ya upkramala aamcha salaam & shubhecchya.from:vinod & nitin gulabrao motling.

    ReplyDelete
  5. मा. जाधव सर
    आज आपल्या प्रश्नमंजुषा उपक्रमाचे 100 भाग पूर्ण झालेत त्यानिमित्त आपणास खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन..💐💐🙏🏻🙏🏻
    आपल्या या उपक्रमामुळे विद्यार्थी व शिक्षक दोघांना खूप फायदा झाला. यामुळे मुलांच्या ज्ञानात भर तर पडलीच पण त्यांची जिज्ञासू व शोधक वृत्ती निश्चितच वाढीस लागली. ज्ञानाची गंगा आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून भरभरून वाहिली व सर्वांनी तिचा लाभ घेतला.. अश्या ह्या ज्ञानरुपी कुंभातून झरा नेहमी व्हावा हिच सदिच्छा. हा उपक्रम इथे न थांबता अविरत चालू असावा असे आम्हाला वाटते. आणि हा उपक्रम पुढे अखंड ठेवण्यास आपणास ईश्वर दहा हत्तीचे बळ देवो हिच प्रार्थना.🙏🏻🙏🏻
    पुन्हा एकदा आपणास खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन🙏🏻💐💐
    स्मिता पाटिल
    जि प प्राथमिक शाळा करहर
    ता जावली जि सातारा

    ReplyDelete