Friday, May 29, 2020

प्रश्नमंजुषा भाग १० वा

प्रश्नमंजुषा भाग ९ ची उत्तरे

1] परीघ
2] परिमिती
3] चालू खाते
4] ५४० अंश
5] periwinkle
6] It's five to three
7]कोलंबिया,ब्राझील,इंडोनेशिया,केनिया,सोमालिया
8] ञिमितीय
9] जलमार्ग
10]महासागर


प्रश्नमंजुषा भाग १० वा

1]महाराष्ट्रात कोणता खडक फार  मोठ्या भूप्रदेशावर पसरलेला आहे ?
2]अरबी समुद्रातील खनिज तेलक्षेञाचे नाव काय ?
3]महाराष्ट्राला लाभलेल्या समुद्रकिना-याची लांबी किती ?
4]भारतात कोणत्या ठिकाणी व कोणत्या राज्यात भूऔष्णिक विद्युतकेंद्र आहे ?
5]सौरचुलीतील अन्न शिजवण्याच्या भांड्यांचा रंग कोणता असतो ?
6]जमिन व पाण्याच्या तापण्यामुळे वातावरणातील कोणता घटक तापत असतो ?
7]जगातील सर्वात लहान देश कोणता ?
8]या महिन्यातील कोणता दिवस ' जागतिक बेडूक संरक्षण दिन ' म्हणून वन्य संरक्षण  कायद्यानुसार पाळला जातो ?
9]मासे कोणत्या अवयवांनी श्वसन करतात ?
10]कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव काय ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा, आपटी ता.जावली जि.सातारा

प्रश्नमंजुषा भाग ९ वा

प्रश्नमंजुषा भाग ८ ची उत्तरे

1] २२ एप्रिल
2] आर्यभट्ट
3] लाल महालात ५ एप्रिल १६६३ ला
4]  ४ (ए जू स नो )
5] डाँ.बाबासाहेब आंबेडकर
6] मा.सतिश बुद्धे
7] १ मे लाच
8] शनिवार
9] हाॕकी
10]कॕल्शिअम


प्रश्नमंजुषा भाग ९ वा

1]वर्तुळाच्या कडेच्या लांबीला वर्तुळाचा काय म्हणतात ?
2]बदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज ही त्या आकृतीची काय असते ?
3]व्यापारी, व्यावसायिक तसेच रोज पैशांचे व्यवहार करणा-यांसाठी बँकेत कोणत्या प्रकारचे खाते उघडावे लागेल ?
4]पंचकोन आकार असणा-या बंदीस्त आकृतीतील कोनांच्या मापांची बेरीज किती ?
5]सदाफुलीला इंग्रजीत कोणते नाव आहे ?
6]तीन वाजण्यास पाच मिनिट कमी आहेत हे इंग्रजीत कसे सांगाल ?
7]पृथ्वीवर ज्या देशांमधून विषुववृत्त गेलं आहे अशा कोणत्याही एका देशाचे नाव सांगा ?
8]नकाशे द्विमितीय असतात तर पृथ्वीगोल किती मितीय आहे ?
9]वाहतूकीच्या कोणत्या मार्गाने मोठया प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो ?
10]पृथ्वीवरील पर्जन्याचे खरे उगमस्थान कोणते ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा, आपटी ता.जावली जि.सातारा

Thursday, May 28, 2020

प्रश्नमंजुषा भाग ८ वा

प्रश्नमंजुषा भाग ७ ची उत्तरे

1] आरोग्यसेतू
2] मा.राजेश टोपे
3] lunch
4] भारत
5]  rectangle
6] बहुजन हिताय, बहुजन सुखाय.
7] गुरु
8] world health organisation ( जागतिक आरोग्य संघटना )
9]  ९१ च्या
10] गुलाब


 प्रश्नमंजुषा भाग ८ वा

1] दरवर्षी कोणत्या तारखेस जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो ?
2]अवकाशात सोडण्यात आलेला पहिला भारतीय उपग्रह कोणता ?
3]शायिस्ताखानाची फजिती ही घटना पुण्यातील कोणत्या वास्तुत किती साली घडली ?
4]इंग्रजी वर्षात किती महिने ३० दिवसांचे असतात ?
5]१९९० सली कोणत्या भारतीयास मरणोत्तर भारतरत्न हा किताब प्रदान करण्यात आला ?
6]जावली तालुक्याचे विद्यमान गटविकास अधिकारी कोण आहेत ?
7]१ मे महाराष्ट्र दिन साजरा होतो, तर कामगार दिन किती तारखेला साजरा करतात ?
8]१ मे ला गुरुवार असल्यास महिन्याच्या अखेरीस कोणता वार येईल ?
9]भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
10]शरीराची हाडे मजबूत होण्यासाठी अन्नपदार्थांतील कोणता घटक उपयोगी पडतो ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा, आपटी ता.जावली जि.सातारा

प्रश्नमंजुषा भाग ७ वा

प्रश्नमंजुषा भाग ६ ची उत्तरे
1] पृथ्वी
2] सविता
3] वसंत
4] अंधार
5] औंध ता.खटाव जि.सातारा
6] नीरा
7] पुरंदर
8] ३६०० सेकंद
9] तेरेखोल
10] गुलाबी


प्रश्नमंजुषा भाग ७ वा

1] कोरोनासंबंधित आपल्या आरोग्यविषयक सूचना देणारे कोणते app भारत सरकारने विकसित केले आहे ?
2] आपल्या महाराष्ट्राचे विद्यमान आरोग्यमंञी कोण आहेत ?
3] दुपारच्या जेवणाला इंग्रजीत काय म्हणतात ?
4] जगात सर्वाधिक पाऊस पडणारी दोन ठिकाणे कोणत्या देशात आहेत ?
5] चौरस या आकाराला इंग्रजीत square म्हणतात तर आयताला काय म्हणत असतील ?
6] सातारा जिल्हा परिषदेचे ब्रीदवाक्य कोणते ?
7] आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
8] WHO या शब्दाचा longform काय ?
9] १ ते १०० सख्यांमध्ये ज्या मूळसंख्या आढळतात त्यातील सर्वात मोठी संख्या कोणत्या स्तंभात आढळते ?
10] गुलकंद हा पदार्थ मिळविण्यासाठी कोणत्या वनस्पतींचा उपयोग होतो ?

नितीन आत्माराम जाधव
विषयाशिक्षक
जि.प.शाळा, आपटी ता.जावली जि.सातारा

प्रश्नमंजुषा भाग ६ वा

आजची प्रश्नमंजुषा या उपक्रमाविषयी

     सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे.या स्पर्धेच्या तयारीसाठी मूल फक्त पुस्तककेंद्रीत न राहता त्याला आनंद देणारी व मनोरंजक वाटणारी अशी एखादी गोष्ट घडते तेव्हा ते मूल आनंदाने स्वयंअध्ययन करु लागते. यातच त्याच्या अभ्यासाची एक बैठक तयार होते.त्यानंतर सुरुवात होते त्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याला.कारण त्याला आता 'कूपातील मंडूक' बनून न राहता अशा ज्ञानसागरात पोहायचे असते आणि तेही आनंदाने..!!
       जिज्ञासूवृत्ती आणि मूल यांचे एक अतूट नाते आहे.मुले अनेकविध प्रश्न सतत विचारत असतात, त्यात दडलेली असते त्यांची जिज्ञासा. ही जिज्ञासा पुढेही तशीच वृद्धिंगत होते, नव्हे ती व्हायलाही हवी.नाही का...!!
       यासाठी 'आजची प्रश्नमंजुषा' हे सदर मुलांना नक्कीच उपयुक्त ठरेल. यात १० प्रश्न दररोज आपल्या भेटीला येतील त्यात पहिले सहा विषयांशी निगडीत व शेवटचे चार सामान्यज्ञान व चालू घडामोडींविषयी असतील.मुले प्रश्न सोडविताना पूर्वज्ञान जागृत करतील.जागृत केलेले पूर्वज्ञान हा अप्रत्यक्ष स्मरण अभ्यासच असेल.प्रश्नाकडून उत्तराकडे जाण्याच्या धडपडीतून पालकांशी व शिक्षकांशी संवाद साधतील.संदर्भ साहित्याशी नाते जोडतील.स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करतील.स्वयंअध्ययनातून आनंद मिळवतील.
धन्यवाद..!!
                         नितीन जाधव

 प्रश्नमंजुषा भाग ६

1] सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला निलग्रह असेही म्हणतात ?
2] सूर्याचे अनेक समानार्थी शब्द आहेत पण त्यातील कोणता समानार्थी शब्द स्ञीलिंगी शब्द वाटतो ?
3] चैञ व वैशाख या दोन महिन्यात कोणता उपऋतू येतो ?
4] तम म्हणजे काय ?
5] सातारा जिल्ह्यात असलेले भवानी वस्तू संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे ?
6] सातारा जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरुन कोणती मोठी नदी वाहते ?
7] जसे शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला तसे छञपती संभाजीमहाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?
8] ६० मिनीटे म्हणजे किती सेकंद ?
9] महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील नदी कोणती ?
10] आपल्या जीभेचा कोणता रंग आपल्या आरोग्याचे उत्तम लक्षण असते ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा, आपटी ता.जावली जि.सातारा

Wednesday, May 27, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ३४ वा

प्रश्नमंजुषा भाग ३३ ची उत्तरे

१] नाशिक
२] १३२५ मीटर
३] २२ मार्च
४] घुबड
५] शरणवने
६] us
७] आफ्रिका खंड
८] अष्टकोनी
९] समुद्र
१०]१८ मीटर


 प्रश्नमंजुषा भाग ३४ वा

1] मोरांच्या एकञ ओरडण्याला काय  म्हणतात ?
2] 9/18 चे अतिसंक्षिप्त रुप कोणते ?
3] शेवंड हा प्राणी पृथ्वीच्या कोणत्या आवरणात आढळतो ?
4] स्वतंत्र भारताच्या संविधानाने कोणती प्रथा नष्ट केली आहे ?
5] सेनापती म्हणून शिवरायांच्या सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या हंबीरराव मोहिते यांचे आपल्या जिल्ह्यातील गाव कोणते ?
6] calf या शब्दाचा योग्य उच्चार कोणता ?
7] रुतू हे पृथ्वीच्या कोणत्या गतीशी संबंधित असतात ?
8] छञपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज कोण ?
9]क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते ?
10] जागतिक तंबाखू विरोधी दिन कोणत्या तारखेस येतो ?

नितीन जाधव
विषयशिक्षक
शाळा, आपटी ता.जावली

Tuesday, May 26, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ३३ वा

प्रश्नमंजुषा भाग ३२ ची उत्तरे

१] श्यामलाल गुप्ता
२] lucky
३] अनपेक्षित
४] स्थितांबरात
५] कुरटे बेटावर
६] तीन
७] १८००
८] सोलापूर
९] बुलढाणा
१०]परमवीर चक्र

 प्रश्नमंजुषा भाग ३३ वा

१] 'मांडे' हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ कोणत्या जिल्ह्याची खासीयत आहे ?
२] महाराष्ट्रातील अस्तंभा शिखराची उंची किती आहे ?
३]संपूर्ण वर्षभरात दोनच तारखा अशा आहेत की, त्या दिवशी १२ तासांचा दिवस आणि १२ तासांची राञ असते.अशाप्रकारचा समसमान राञ दिवस असलेला उन्हाळ्यातील जो दिवस आहे त्याची तारीख सांगा ?
४] घार, गरुड, ससाणा, गिधाड यांप्रमाणेच छोट्या पक्ष्यांची शिकार करुन खाणारा पक्षी कोणता ?
५]मध्यप्रदेशातील देवरायांना कोणत्या नावाने ओळखले जाते ?
६] famous या शब्दांमध्ये कोणते pronoun दडले आहे ?
७] उत्क्रांतीतून आदिमानव प्रथम कोणत्या खंडात निर्माण झाला ?
८] मधमाश्यांच्या घराच्या खोल्या किती कोनांच्या असतात ?
९] महोदधी या शब्दाचा अर्थ काय ?
१०] एका आयताकृती मैदानाची परिमिती 100 मीटर असून त्याची लांबी ३२ मीटर आहे, तर त्याची रुंदी किती मीटर असेल ?

नितीन जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली