Thursday, May 28, 2020

प्रश्नमंजुषा भाग ६ वा

आजची प्रश्नमंजुषा या उपक्रमाविषयी

     सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे.या स्पर्धेच्या तयारीसाठी मूल फक्त पुस्तककेंद्रीत न राहता त्याला आनंद देणारी व मनोरंजक वाटणारी अशी एखादी गोष्ट घडते तेव्हा ते मूल आनंदाने स्वयंअध्ययन करु लागते. यातच त्याच्या अभ्यासाची एक बैठक तयार होते.त्यानंतर सुरुवात होते त्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याला.कारण त्याला आता 'कूपातील मंडूक' बनून न राहता अशा ज्ञानसागरात पोहायचे असते आणि तेही आनंदाने..!!
       जिज्ञासूवृत्ती आणि मूल यांचे एक अतूट नाते आहे.मुले अनेकविध प्रश्न सतत विचारत असतात, त्यात दडलेली असते त्यांची जिज्ञासा. ही जिज्ञासा पुढेही तशीच वृद्धिंगत होते, नव्हे ती व्हायलाही हवी.नाही का...!!
       यासाठी 'आजची प्रश्नमंजुषा' हे सदर मुलांना नक्कीच उपयुक्त ठरेल. यात १० प्रश्न दररोज आपल्या भेटीला येतील त्यात पहिले सहा विषयांशी निगडीत व शेवटचे चार सामान्यज्ञान व चालू घडामोडींविषयी असतील.मुले प्रश्न सोडविताना पूर्वज्ञान जागृत करतील.जागृत केलेले पूर्वज्ञान हा अप्रत्यक्ष स्मरण अभ्यासच असेल.प्रश्नाकडून उत्तराकडे जाण्याच्या धडपडीतून पालकांशी व शिक्षकांशी संवाद साधतील.संदर्भ साहित्याशी नाते जोडतील.स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करतील.स्वयंअध्ययनातून आनंद मिळवतील.
धन्यवाद..!!
                         नितीन जाधव

 प्रश्नमंजुषा भाग ६

1] सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला निलग्रह असेही म्हणतात ?
2] सूर्याचे अनेक समानार्थी शब्द आहेत पण त्यातील कोणता समानार्थी शब्द स्ञीलिंगी शब्द वाटतो ?
3] चैञ व वैशाख या दोन महिन्यात कोणता उपऋतू येतो ?
4] तम म्हणजे काय ?
5] सातारा जिल्ह्यात असलेले भवानी वस्तू संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे ?
6] सातारा जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरुन कोणती मोठी नदी वाहते ?
7] जसे शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला तसे छञपती संभाजीमहाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?
8] ६० मिनीटे म्हणजे किती सेकंद ?
9] महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील नदी कोणती ?
10] आपल्या जीभेचा कोणता रंग आपल्या आरोग्याचे उत्तम लक्षण असते ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा, आपटी ता.जावली जि.सातारा

2 comments: