Friday, May 29, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ३५ वा

प्रश्नमंजुषा भाग ३४ ची उत्तरे

१] केकारव
२] 1/2
३] जलावरणात
४] अस्पृश्यता
५] तळबीड ता.कराड जि.सातारा
६] काफ्
७] वार्षिक गतीशी
८] श्रीमंत छञपती उदयनराजे भोसले
९] महाराष्ट्र
१०]३१ मे


 आजची प्रश्नमंजुषा भाग ३५ वा

1] प्रामाणिक या विशेषणाचे नामात रुपांतर करण्यासाठी त्या शब्दाला कोणता प्रत्यय जोडावा लागेल ?
2] 1800 पेरु 15 पेट्यात समान भरले त्यापैकी 10 पेट्या नागपूरला विक्रीसाठी पाठवल्या, तर किती पेरु नागपूरला पाठविले ?
3]अॕनाफिलीस डासाची मादी चावल्यामुळे आपणाला कोणता रोग होऊ शकतो ?
4]आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे. ही भावना म्हणजे कोणते नैतिक मूल्य ?
5] स्वराज्यात पुरंदर या किल्ल्याप्रमाणेच आणखी कोणत्या गडावर तोफा तयार करण्याचे कारखानेही होते ?
6] grove या इंग्रजीतील शब्दासाठी इंग्रजीतीलच कोणता समानार्थी शब्द वापरता येईल ?
7] आपल्या महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे ?
8] हरियाल हा आपला राज्यपक्षी महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आढळतो ?
9] सातारा शहरात ' गुलमोहर डे ' उन्हाळ्यात साजरा होतो, हा दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात ?
10] 'आले' या वनस्पतीच्या कोणत्या भागाचा आपण अन्न म्हणून वापर करतो ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा, आपटी ता.जावली जि.सातारा

1 comment: