Tuesday, May 26, 2020

प्रश्नमंजुषा भाग २

प्रश्नमंजुषा भाग २

1]करंगळी या मराठी शब्दाला इंग्रजीत काय नाव आहे स्पेलिंगसहित सांगा ?
2] दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असेल तर त्या संख्यांना कोणत्या संख्या म्हणून ओळखले जाते ?
3] कवीवर्य बा.सी.मर्ढेकर यांचे सातारा जिल्ह्यातील कोणते गाव आहे ?
4] वातावरणातील कोणत्या घटकातून पाऊस पडतो ?
5] घरातील काडीपेटीच्या आकारास गणितीय भाषेत काय म्हटले जाते ?
6] मोहरम या सणाचे दुसरे नाव काय ?
7] दरवर्षी आपण कोणत्या तारखेस शिवजयंती साजरी करतो ?
8] रविंद्रनाथ टागोरांनी 'शांति- निकेतन' ही शाळा बंगालमध्ये कोणत्या ठिकाणी सुरु केली ?
9] नवाश्मयुग हा कोणत्या युगाचा कालखंड आहे ?
10] प्राचीन इजिप्तमध्ये कोणता खेळ फार लोकप्रिय होता ?

नितीन जाधव
शाळा, आपटी ता.जावली

 उत्तरसूची :

1] little finger
2] जोडमूळ संख्या
उदा.5 व 7 : 11 व 13 कारण 5 व 7 दरम्यान 6 ही एकच संयुक्त संख्या येते.
3] कृष्णा नदीकाठावरील मर्ढे ता.सातारा
4] ढगातून
5] इष्टिकाचिती
6] ताजिया
7] १९ फेब्रुवारी
8] बोलपूर
9] अश्मयुग
10] सेनात

1 comment:

  1. आपण करत असलेले कार्य अतिशय प्रेरणादायी आहे आपल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा💐💐💐

    ReplyDelete