Sunday, May 31, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ३८ वा

प्रश्नमंजुषा भाग ३७ ची उत्तरे

1] कर्करोग
2] ८२ %
3] निकोटीन
4] २८ रसायने
5] पानांपासून
6] CIGARETTE SMOKING IS INJURIOUS TO HEALTH.
7] यवतमाळ
8] जावली तालुका
9] २००३ साली
10] सलाम मुंबई फाउंडेशन


आजची प्रश्नमंजुषा भाग ३८ वा

1] सावजासाठी वाघ गवतात दबा धरुन लपून बसतो.-----या वाक्यात एकूण किती नामे आलेली आहेत ?
2] 70 च्या अगोदरच्या व नंतरच्या लगतच्या मूळ सख्यांची बेरीज काय येईल ?
3] बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरु कोणत्या वनस्पतीच्या पानावर अंडे घालते ?
4] दौलताबाद हा कोणत्या प्रकारचा दुर्ग आहे ?
5] वारली कलासंस्कृती ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे ?
6] price या शब्दाचा अर्थ भाव/किंमत तर prize या शब्दाचा अर्थ काय ?
7] महात्मा ज्योतिराव फुले यांचे जन्मगाव कोणते ?
8] सातारा जिल्ह्यातील ठोसेघर हा प्रसिद्ध धबधबा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?
9] महाराष्ट्रातील घोलवड हे ठिकाण कौणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ?
10] आपल्या राज्याचे राज्यफूल कोणते ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा, आपटी ता.जावली जि.सातारा

10 comments:

  1. छान प्रश्ननिर्मिती👍✍️

    ReplyDelete
  2. Dadabhau joshi:Great work

    ReplyDelete
    Replies
    1. नाविण्यपूर्ण प्रश्ननिर्मिती

      Delete
  3. श्री.नितिन जाधव सर म्हणजे शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तीमत्व!आपण दररोज सुरु केलेली प्रश्ननिर्मिती म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांसाठी मेंदूला चालना देणारी पर्वणीच होय.जूनपासून दर शनिवारी 'दप्तराविना शाळा'या उपक्रमातर्गंत आमच्या जि.प.प्राथमिक शाळा महू येथे प्रश्नमंजूषा स्पर्धा असते.आपल्या या प्रश्ननिर्मितीमुळे आमच्या प्रश्नभांडारात आणखीनच भर पडली.आपल्या या निरंतर उपक्रमाचे मनापासून कौतुक व भावी प्रश्ननिर्मितीसाठी अनंत शुभेच्छा!

    ReplyDelete
  4. नितीन सर छान प्रश्न निर्मिती

    ReplyDelete
  5. सदैव तत्पर शिक्षणाविषयी ची तळवळ.असणारे मर्मज्ञ अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे नितीन जी जाधव सर.आपला प्रश्नमंजुषा उपक्रम हा खूपच प्रेरणादायी आहे. केवळ विद्यार्थ्यांना च नव्हे तर पालक आणि शिक्षक यांच्या बुद्धीला चालना देणारा आहे.या उपक्रमामुळे विद्यार्थामंध्ये सकारात्मक बदल घडवून आलाआहे.त्यामुळे वाचणाचा आवड निर्माण झाली. पालक मित्र यांच्या मध्ये सुसंवाद होत आहेत. उद्या येणार्या प्रश्नाविषयी विद्यार्थांमध्ये खुप खुप उत्सुकता आहे.
    खुप खुप अभिनंदन आणि धन्यवाद सरजी. आम्हाला बौद्धिक मेजवानी उपलब्ध करून दिल्याबद्दल.💐💐👏👏👏👏

    ReplyDelete
  6. ,,, छान , तुमचं अभिनंदन ,, नितीन सर आमच्यासाठी ही प्रश्नावली उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद ,,

    ReplyDelete