Thursday, June 4, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ३९ वा

प्रश्नमंजुषा भाग ३८ ची उत्तरे

1] चार
2] 138
3] रुई या वनस्पतीच्या पानावर
4] गिरीदुर्ग
5] ठाणे
6] बक्षिस / पारितोषिक
7] कटगुण ता.खटाव जि.सातारा
8] सातारा
9] चिकू
10]ताम्हण

आजची प्रश्नमंजुषा भाग ३९ वा.

1] झाडांना येणाऱ्या नविन कोवळ्या पानांना काय म्हणतात ?
2] 150 ही संख्या रोमन अंकात कशी लिहावी लागेल ?
3] फळाच्या बाहेर बी असणारे फळ कोणते ?
4] आग्रा येथील सुटकेनंतर शिवराय महाराष्ट्रातील कोणत्या गडावर सुखरूप पोहोचले ?
5] विज्ञान व तंञज्ञानाचा वापर करुन करण्यात येणाऱ्या शेतीस कोणती शेती म्हणतात ?
6] इंग्रजीत नारळाला coconut म्हणतात, तर नारळाच्या करवंटीला काय म्हणावे लागेल ?
7] कोकणात गणेशोत्सवाबरोबर आणखी कोणता सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो ?
8] संपूर्ण महाराष्ट्रात सांगली जिल्ह्याबरोबर हळद व आल्याचे सर्वाधिक उत्पादन घेणारा दुसरा जिल्हा कोणता ?
9] महाराष्ट्रातील एकमेव सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्याच्या किनारपट्टीला आहे ?
10]एग्मार्क हे प्रमाणपञ कशाची गुणवत्ता दाखवते ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा, आपटी ता.जावली जि.सातारा

3 comments:

  1. सर,आपल्या प्रश्नसंचचा आम्हाला,विध्यार्थ्याना नक्कीच फायदा होईल.Keep it up👍💐

    ReplyDelete
  2. सर .. lockdown च्या काळात तुम्ही खूपच छान उपक्रम चालू केला आहे .त्याचा उपयोग समस्थ शिक्षक आणि विद्यार्थ्यांना होणार आहे..तुमच्या कार्याला सलाम आणि हार्दिक शुभेच्छा!.

    ReplyDelete
  3. तुमच्या सातत्याला सलाम👍🙏

    ReplyDelete