Tuesday, June 9, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ४४ वा

प्रश्नमंजुषा भाग ४३ ची उत्तरे

1] संयोगचिन्ह
2] 35.75 रु.
3] तंतुमय पदार्थ
4] मध्याश्मयुगात
5] पावसाळ्यानंतर
6] Saturday
7] ग्रीष्म ऋतू
8] माहुली ता.जि.सातारा
9] पालघर
10] निसर्ग चक्रीवादळ

आजची प्रश्नमंजुषा भाग ४४ वा

1] दुष्काळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
2] एका वर्गातील एक तृतियांश विद्यार्थ्यांची संख्या 12 असेल तर वर्गात एकूण किती विद्यार्थी असतील ?
3] डांबरगोळ्यांमध्ये कोणते रसायन असते ?
4] महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिकजवळचे कोणते स्थळ प्रसिद्ध आहे ?
5] मायणी पक्षीअभयारण्यात येणारे रोहित पक्षी कोणत्या प्रदेशातून स्थलांतर करुन येतात ?
6] bad या शब्दाचे तिसरे रुप कोणते ?
7] बैलपोळा या सणास महाराष्ट्रातील काही भागात दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ?
8] सातारा जिल्ह्यातील मायणी पक्षी अभयारण्य कोणत्या तालुक्यात येते ?
9] महाबळेश्वर येथे उगम पावणारी कृष्णा नदी शेवटी कोणत्या सागरास जावून मिळते ?
10] महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध लेणी कोणती ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

No comments:

Post a Comment