Wednesday, June 17, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ५५ वा

प्रश्नमंजुषा भाग ५४ ची उत्तरे

1] बेढब
2] 48 सेमी
3] सर्दी-खोकला
4] मराठी
5] सासवड जि.पुणे
6] l ( एल् )
7] बंकीमचंद्र चॕटर्जी
8] सांगली
9] प्रवाशांच्या सेवेसाठी
10]1646 मीटर

आजची प्रश्नमंजुषा भाग ५५ वा

1] ' प्रखर ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
2] रौप्यमहोत्सवी सोहळ्यानंतर किती वर्षांनी एका शाळेचा सुवर्णमहोत्सवी सोहळा येईल ?
3] बेसुमार जंगलतोडीमुळे वातावरणातील कोणत्या वायूचे शोषण अपुरे होत आहे ?
4] शिवाजी महाराजांच्या जन्माची जन्मतिथी सांगा ?
5] महाराष्ट्रातल्या कोणत्या गावात मोरांना अभय मिळाले आहे ?
6] 'once upon a time' या इंग्रजी शब्दसमूहाचा मराठी अर्थ सांगा ?
7] मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर या महान क्रिकेटरच्या गुरुंचे नाव काय ?
8] सातारा जिल्ह्यात कोणत्या शहरात लहान विमानतळ तथा धावपट्टी उपलब्ध आहे ?
9] महाराष्ट्र राज्य पोलिस खात्याचे ब्रीदवाक्य कोणते ?
10]महाराष्ट्रातील सर्वात लांब व प्रमुख असणारी नदी शेवटी कोणत्या सागरास जाऊन मिळते ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

11 comments:

  1. खूप अभ्यासूपणे प्रश्ननिर्मिती केली आहे सर तुम्ही....👍🙏

    ReplyDelete
  2. स्काँलरशिप MPSCला खूप फायदा होणार👌👌

    ReplyDelete
  3. आपली प्रश्नमंजुषा विध्यार्थ्याच्या विचाराला चालना देणारी आहें व विध्यार्थाच्या अध्ययन क्षमतेस प्रेरणा देणारी आहे

    ReplyDelete
  4. खूपच सखोल प्रश्ननिर्मिती

    ReplyDelete
  5. खूपच सखोल प्रश्ननिर्मिती

    ReplyDelete
  6. सर,सर तुम्ही खूप बारकाईने अभ्यास करुन मार्गदर्शक अशी प्रश्न निर्मिती केली आहे.

    ReplyDelete
  7. सर,आपण खूपच अभ्यासपूर्वक ही प्रश्ननिर्मिती केली याचा मुलांना वर्तमानात ,तसेच भाविष्य काळातहीखूपच फायदा आहे या उपक्रमास आपणास मनापासून शुभेच्छा

    सौ. रूपाली राक्षे

    ReplyDelete
  8. आदरणीय नितीनजी जाधव सर म्हणजे एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व.सर तुम्ही प्रश्नमंजूषा उपक्रम राबविला आणि आम्हा सर्वांना बौद्धिक मेजवानीच उपलब्ध करून दिली. प्रश्न निर्माण केल्या शिवाय उत्तर मिळत नाही असं म्हणतात. पण तूम्ही काढलेले सखोल अभ्यासपूर्ण प्रश्न ,बुद्धीला चालना देतात.विचार करायला भाग पाडतात.केवळ विद्यार्थ्यांचं नव्हे तर शिक्षक पालक सर्वजन प्रश्नमंजूषा पूढच्या भागाची आतुरतेने वाट पाहतात.त्यामुळे विद्यार्थी शिक्षक पालक यांच्यात सुसंवाद वाढू लागला.विद्यार्थांचा आत्मविश्वास वाढला, स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारी म्हणून हा उपक्रम अतिशय उपयुक्त आहे. अर्धशतक पार पडले आता शतक द्विशतक कडे यशस्वी वाटचाल होणारचं यात काहीच शंका नाही. कारण प्रत्येक शंकेचे निरसन हे जाधव सरांकडे असते.
    खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद

    ReplyDelete
  9. आदरणीय नितीनजी जाधव सर म्हणजे एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व.सर तुम्ही प्रश्नमंजूषा उपक्रम राबविला आणि आम्हा सर्वांना बौद्धिक मेजवानीच उपलब्ध करून दिली. प्रश्न निर्माण केल्या शिवाय उत्तर मिळत नाही असं म्हणतात. पण तूम्ही काढलेले सखोल अभ्यासपूर्ण प्रश्न ,बुद्धीला चालना देतात.विचार करायला भाग पाडतात.केवळ विद्यार्थ्यांचं नव्हे तर शिक्षक पालक सर्वजन प्रश्नमंजूषा पूढच्या भागाची आतुरतेने वाट पाहतात.त्यामुळे विद्यार्थी शिक्षक पालक यांच्यात सुसंवाद वाढू लागला.विद्यार्थांचा आत्मविश्वास वाढला, स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारी म्हणून हा उपक्रम अतिशय उपयुक्त आहे. अर्धशतक पार पडले आता शतक द्विशतक कडे यशस्वी वाटचाल होणारचं यात काहीच शंका नाही. कारण प्रत्येक शंकेचे निरसन हे जाधव सरांकडे असते.
    खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद
    कुमार कांबळे
    जि.प.प्राथमिक शाळा लिंब नं २

    ReplyDelete