Thursday, June 4, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ४२ वा

प्रश्नमंजुषा भाग ४१ ची उत्तरे

1] बेट
2] 1
3] आदिमूळ
4] लीळाचरिञ
5] सामुद्रधुनी
6] जवळच
7] 2 माध्यमातून
8] चार
9] उल्कापात
10]पाच

आजची प्रश्नमंजुषा भाग ४२ वा

1] अंगारे या शब्दाला जोडून येणारा जोडशब्द कोणता ?
2] दोन संख्यांची बेरीज 40 आहे व त्याच दोन संख्यांची वजाबाकी 8 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती ?
3] पाऊस पडण्याचा ठरावीक काळ सोडून इतर वेळी पडणा-या पावसास आपण काय म्हणतो ?
4] महाराष्ट्रातील कोणत्या संतांची पदे 'गुरुग्रंथसाहिब ' या शीख धर्मग्रंथात पहावायास मिळतात ?
5] महाराष्ट्रातील वीजनिर्मितीमध्ये कोणत्या शक्तीचा वापर अतिशय मर्यादित स्वरुपात आहे ?
6] रस्त्यावरील वाहतुकीला इशारा देण्यासाठी लावलेल्या  दिव्यांना इंंग्रजीत काय म्हणतात ?
7] ' दो बूँद जिंदगी के ' हे वाक्य कोणत्या मोहिमेसंदर्भातील आहे ?
8] पेशवेकालीन न्यायाधीश रामशास्ञी प्रभुणे यांचे सातारा जिल्ह्यातील जन्मगाव कोणते ?
9] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती पूर्व भागाबरोबर आणखी कोणत्या भागात एकवटलेली आहे ?
10]महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

8 comments:

  1. विचारप्रवर्तक प्रश्न👍

    ReplyDelete
  2. सर्वसमावेशक प्रश्न 👌👍

    ReplyDelete
  3. सर्व समावेशक प्रश्न , विचाराला चालना देणारे प्रश्न अतिशय उपयुक्त उपक्रम छान जाधव सर. -. श्री हेमंत शिंदे पदवीधर शिक्षक

    ReplyDelete
  4. आत्मविश्वास वाढविणारे ब प्रेरणा देणारे व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त उपक्रम - श्री हेमंत शिंदे पदवीधर शिक्षक

    ReplyDelete
    Replies
    1. खूपच छान उपक्रम सर

      Delete