Wednesday, June 17, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ५२ वा

प्रश्नमंजुषा भाग ५१ ची उत्तरे

1] कमाल
2] 4 ची आठपट
3] पन्हं
4] शहाजीराजांनी
5] कोल्हापूर
6] खेळगडी/खेळातील सवंगडी (playfellow हा शब्द फारसा वापरला जात नाही.)
7] व-हाडी
8] वाई ता.वाई जि.सातारा
9] संगितक्षेञात
10]ब्ल्यू माॕरमाॕन ( राणी पाकोळी )

आजची प्रश्नमंजुषा भाग ५२ वा

1] मानवाला सूर्याची मदत मिळते तसेच अनेकविध प्रकारे उपयोग होतो.त्याच्या या उपयोगितेवरून आपण सूर्याला कोणत्या विशिष्ट नावाने ओळखतो ?
2] एका विहिरीची खोली 30 मीटर आहे.तिचा 3/5 भाग पाण्यात आहे. तर एकूण किती मीटर भाग पाण्याखाली आहे ?
3] दुधामध्ये असणाऱ्या शर्करेचे नाव सांगा ?
4] इजिप्त देशाची संस्कृती कोणत्या नदीच्या काठी बहरास आली ?
5] लेण्या खोदण्यासाठी महाराष्ट्रातील कोणत्या खडकांनी व्यापलेला भाग अतिशय उपयुक्त ठरला आहे ?
6] अळंबी/भूछञ या वनस्पतीला इंग्रजीत कोणत्या नावाने ओळखले जाते ?
7] CSH-4 व SSV-84 ही कोणत्या धान्याच्या सुधारित बियाण्यांची नावे आहेत ?
8] सातारा जिल्ह्यात समर्थ जीवन शिल्पसृष्टी संग्रहालय कोठे आहे ?
9] महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागाला मराठवाडा म्हणून ओळखले जाते ?
10]महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प कोठे आहे ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

1 comment: