Thursday, June 18, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ५६ वा

प्रश्नमंजुषा भाग ५५ ची उत्तरे

1] सौम्य
2] 25 वर्षांनी
3] कार्बनडायआॕक्साइड
4] फाल्गुन वद्य तुतीया शके १५५१
5] मोराची चिंचोली जि.पुणे
6] कोणे एके काळी
7] रमाकांत आचरेकर
8] कराड
9] सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
10]बंगालच्या उपसागरास

आजची प्रश्नमंजुषा भाग ५६ वा

1] हळूच या हो हळूच या !! --- ही गोड कविता ज्या कवींची आहे त्यांचे पूर्ण नाव सांगा ?
2] एका पेपरमार्टमधून प्रशिकने 96 कागद खरेदी केले तर, त्याने किती दस्ते कागद खरेदी केले ?
3] एखाद्या बंदीस्त ठिकाणी माणसांच्या गर्दीमुळे आपणाला गुदमरल्यासारखे होऊ लागते तेव्हा त्या ठिकाणी कोणत्या वायूचे प्रमाण वाढलेले असते ?
4] शिवकाळात पावसाळ्याच्या दिवसांत गडांवरील तोफा गंजू नयेत, म्हणून तोफांना कोणत्या पदार्थाचा लेप लावला जात असे ?
5] राज्याला कायमस्वरुपी दुष्काळापासून मुक्त करण्यासाठी शासनाने कोणती योजना हाती घेतली आहे ?
6] अग्निशमन दलामध्ये आग विझवण्याचे काम करणा-या अग्निशामकास इंग्रजीत काय म्हणतात ?
7] 'ऋतुराज' असे कोणत्या उपऋतूला संबोधण्यात येते ?
8] सातारा जिल्ह्यात दासनवमीला कोणत्या गडावर लाखो भाविकांची गर्दी उसळते ?
9] मोबाईलमधून निघणाऱ्या लहरींचा परिणाम कोणत्या पक्ष्यावर अधिकतेने झाल्याचे आढळते ?
10]भारतातील कोणत्या राज्यात सर्वप्रथम मोसमी पावसाची सुरुवात होते ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

8 comments:

  1. आपल्या स्तुत्य उपक्रमास हार्दिक शुभेच्छा
    श्री किरण यादव

    ReplyDelete
  2. सखोल अभ्यासातून तयार केलेले वैविध्यपूर्ण प्रश्न.

    ReplyDelete
  3. विद्यार्थी व शिक्षकांच्या बौद्धिकतेला चालना देणारे उत्कृष्ट प्रश्न

    ReplyDelete
  4. बुद्धीला चालना देणारे प्रश्न.,,,खूप छान,,,,👍👍👍जाधव सर keep it up

    ReplyDelete
  5. दर्जेदार प्रश्ननिर्मिती असलेला स्तुत्य उपक्रम. बहुपयोगी सृजनशील प्रश्नसाठा. आपले खूप खूप अभिनंदन आदरणीय जाधव सर

    ReplyDelete
  6. खूपच सुंदर उपक्रम,मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडतेय. From-Ashok More, subject teacher, Nipani

    ReplyDelete