Tuesday, June 30, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ६८ वा

प्रश्नमंजुषा भाग ६७ वा
1] मुलाखत तंञ
2] १०
3] चार
4] आग्र्याहून सुटका
5] शिखर
6] liquid soap
7] साडेतीन मुहूर्त
8] गजे लेझिम
9] कोल्हापूर
10] नील आर्मस्टाँग

आजची प्रश्नमंजुषा भाग ६८ वा
1] ' वनस्पतींची झाडावरुन खाली पडलेली वाळलेली पाने ' या शब्दसमूहासाठी एक शब्द सांगा ?
2] वर्तुळाची सर्वात मोठी जीवा त्या वर्तुळातील ञिज्येच्या कितीपट असते ?
3] मीठ व साखरेच्या द्रावणाला वैज्ञानिक भाषेत काय म्हणतात ?
4] घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला ?
5] लीपवर्षात मकरसंक्रांत कोणत्या तारखेस येते ?
6] dirty म्हणजे घाणेरडे तर, dirt म्हणजे काय ?
7] अग्रहायण हे कोणत्या सौर महिन्याचे दुसरे नाव आहे ?
8] सातारा जिल्ह्यातील कोणती नदी कृष्णेची प्रमुख उपनदी म्हणून ओळखली जाते ?
9] बौद्ध धर्मियांच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात ?
10] ब्रेल लिपीचे जनक कोण ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

26 comments:

  1. नितीन जाधव सर आपला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, यातूनच स्पर्धात्मक परिक्षेला सामोरे जाताना आमचे विद्यार्थी निर्भिडपणे उभे राहतील.

    ReplyDelete
  2. आपला आजची प्रश्नमंजुषा उपक्रम विद्यार्थ्यांना सामान्यज्ञान वृद्धी साठी व भविष्यातील स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारी साठी निश्चितच पथदर्शक आहे.

    ReplyDelete
  3. उत्कृष्ट प्रश्ननिर्मिती keep it up

    ReplyDelete
  4. Plz पोस्टच्या मागे आपले नाव येऊ द्या...thanks !!

    ReplyDelete
  5. आतिशय उत्तम गुणवत्तापूर्ण नवनिर्मिती बद्दल प्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन तसेच विद्यार्थ्याना शिक्षण प्रवाहात ठेवण्यामध्ये आपला सिंहाचा वाटा आहे त्याबद्दल आपले शतशः आभार.
    आपणाकडून अशीच गुणवत्तापूर्ण नवनिर्मिती होत राहो आणि माझा नेहमीच " शिक्षणातील नवीन काही" ला पाठींबा असणार आहे
    मनःपूर्वक शुभेच्छा सर👍🙏💐💐
    शुभेच्छांसह -श्री.किरवे सर (बामणोली कसबे)

    ReplyDelete
  6. सर आपला उपक्रम अतिशय सुंदर रीतीने चालला आहे अगदी अखंडित पणे. त्याबद्दल खरंतर मनापासून तुमचे अभिनंदन. तुमचा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्यातील स्पर्धा परिक्षेची तयारीच होय. खूप खूप शुभेच्छा सर💐💐💐

    ReplyDelete

  7. आपला प्रश्न मंजुषा हा उपक्रम निश्चित च स्तुत्य आहे अतिशय अभ्यास पूर्वक तयार केलेली सदर प्रश्नमंजूषा आहे ही प्रश्नमंजुषा केवळ विद्यार्थ्यांना नव्हे तर मला ही वैयक्तिक याचा उपयोग झाला सदर उपक्रमातील सातत्य निश्चित च वाखाणण्याजोगे आहे.
    धन्यवाद सर 🙏🏻आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा💐💐
    उपशिक्षिका
    अनुजा रामचंद्र सावंत
    जि .प. शाळा चोरंबे ता .जावली

    ReplyDelete
  8. सुजाता क्षीरसागर
    Very Nice keep it up 👍👍👌👌

    ReplyDelete
  9. खूपच अभ्यासपूर्ण प्रश्नावली.
    विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारी.

    ReplyDelete
  10. अतिशय अभ्यासपूर्वक निर्मिती केली ,, असेच निर्मिती करीत असाल तर मुलांना स्पर्धी परिक्षासाठी सर्व काळ संग्रही राहतील व उपयोगी पडतील ,,, तुमचे आभार ,,,

    ReplyDelete
  11. अतिशय अभ्यासपूर्वक निर्मिती केली ,, असेच निर्मिती करीत असाल तर मुलांना स्पर्धी परिक्षासाठी सर्व काळ संग्रही राहतील व उपयोगी पडतील ,,, तुमचे आभार ,,,

    ReplyDelete
  12. अतिशय अभ्यासपूर्वक निर्मिती केली ,, असेच निर्मिती करीत असाल तर मुलांना स्पर्धी परिक्षासाठी सर्व काळ संग्रही राहतील व उपयोगी पडतील ,,, तुमचे आभार ,,,

    ReplyDelete
  13. One of the nice collection on GK.. It's useful for students and also teachers..Thanks for it.Keep it up👌👌👌

    ReplyDelete
  14. स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त तसेच विद्यार्थ्यांना विचार प्रवर्तक प्रश्न निर्मिती..... Well done

    ReplyDelete
  15. खूपच मार्गदर्शक प्रश्न thanks a lot

    ReplyDelete
  16. खूपच अभ्यासपूर्ण प्रश्न आहेत.आपल्या उपक्रमाचा खूप फायदा होइल. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏💐💐
    संगिता पवार

    ReplyDelete
  17. सर आपला हा उपक्रम सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षांना,तसेच शैक्षणिक वर्गातील सर्वांना खूपच उपयुक्त असा आहे.यापुढील भागांसाठी आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा!

    ReplyDelete
  18. नितीन जाधव सर,आपला उपक्रम मुलांचे भविष्य घडवणारा उपक्रम आहे.त्यामुळे तुमच्या कार्याला सलाम.

    ReplyDelete
  19. खूपच छान सर .आपले काम कौतुकास्पद आहे. खूप खूप शुभेच्छा
    निलेश उतेकर

    ReplyDelete
  20. प्रश्न मंजुषा हा विषय खूप छान आहे.श्री.नितीन जाधव सर, छान संकल्पना आहे.आपण हाती घेतलेला उपक्रम विद्यार्थ्यांना दिशा देणारा विषय आहे.आपल्या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा!!!

    ReplyDelete
  21. S.s.Kshirsagar
    Very Nice work Jadhav sir

    ReplyDelete