Wednesday, June 17, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ५१ वा

प्रश्नमंजुषा भाग ५० ची उत्तरे

1] दोन
2] 12
3] पान
4] प्रचंडगड
5] सैंधव मीठ
6]wealthy अशाप्रकारचे अनेक शब्द
7] साने गुरुजी
8] प्रतापगड ता.महाबळेश्वर जि.सातारा
9] पश्चिमेस
10] बंगालच्या उपसागरावर

आजची प्रश्नमंजुषा भाग ५१ वा

1] ' किमान ' या शब्दासाठी अचूक असा विरुद्धार्थी शब्द सांगा ?
2] 9 च्या आठपटीतून 5 ची आठपट वजा केल्यास कितीची आठपट प्राप्त होईल ?
3] कैरीपासून तयार होणाऱ्या लोकप्रिय पेयाचे नाव काय ?
4] किल्ले दुर्गम कसे बनवावेत, याचे शिक्षण शिवरायांना कोणाकडून मिळाले होते ?
5] तांबडा-पांढरा मटण रस्सा हा पदार्थ  महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची खासियत आहे ?
6] playground म्हणजे क्रीडांगण तर playfellow म्हणजे काय ?
7] महाराष्ट्रातील विदर्भ भागात बोलली जाणारी मराठी बोलीभाषा कोणती ?
8] आपल्या जिल्ह्यात मराठी विश्वकोश कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
9] दृष्टिहीन रवींद्र जैन हे नाव कोणत्या क्षेञाशी संबंधित आहे ?
10]महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

1 comment: