Sunday, June 21, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ५९ वा

प्रश्नमंजुषा भाग ५८ ची उत्तरे

1] क्षितीज
2] 91 सेमी
3] चार पदार्थांचे
4] वल्कले
5] निम सदाहरित वने
6] blue whale
7] नारळ
8] महाबळेश्वर
9] २०१५ पासून
10] २१ जून

आजची प्रश्नमंजुषा भाग ५९ वा

1] नर्तिका या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ?
2] 5, 0, 3, 1 या चार अंकांपासून 4000 पेक्षा मोठ्या किती संख्या मिळतील ?
3] आपल्या इच्छेनुसार, आवश्यकतेनुसार आपल्या त्वचेचा रंग सहजपणे बदलू शकणारा, सरपटणारा प्राणी कोणता ?
4] शिवकालीन युद्धगर्जना कोणती ?
5] आपल्या देशात हिमवर्षाव कोठे होतो ?
6] Which is the opposite word for the word ' hollow ' ?
7] पक्षी कोणत्या उपऋतूत विशेष आनंदी असतात ?
8] सातारा जिल्ह्यातील कराड शहाराजवळील बौद्ध लेणी कोणत्या डोंगरात खोदलेल्या आहेत ?
9] नैसर्गिक संकटांना तोंड देण्यासाठी सरकारने कोणता विभाग स्थापन केला आहे ?
10] आपला राष्ट्रध्वज सर्वप्रथम कधी फडकवण्यात आला, त्या ऐतिहासिक दिनाची संपूर्ण तारीख सांगा ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

4 comments:

  1. सर, आपल्या प्रश्नमंजुषा सदरात सर्व विषयांचा समावेश आहे.विचार करायला लावणारे प्रश्न आहेत.आपल्या या उपक्रमाला शुभेच्छा!

    ReplyDelete
  2. अतिशय छान👍👍

    ReplyDelete