Friday, June 5, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ४३ वा

प्रश्नमंजुषा भाग ४२ ची उत्तरे

1] धुपारे
2] २४
3] अवकाळी पाऊस
4] संत नामदेव
5] अणुशक्तीचा
6] traffic signal
7] पल्स पोलिओ निर्मूलन मोहिम
8] माहुली
9] नैऋत्य
10]आंबा


आजची प्रश्नमंजुषा भाग ४३ वा

1] 'विद्यार्थी-प्रतिनिधी' हा शब्द लिहिताना दोन शब्दांमध्ये कोणते विरामचिन्ह वापरावे लागेल ?
2] एक टन साखरेची किंमत 35750 रुपये असेल तर एक किलो साखरेची किंमत किती असेल ?
3] केसर आंब्यातील धागे हे कर्बोदकांच्या कोणत्या प्रकारात मोडतात ?
4] अश्मयुगातील कोणत्या कालखंडात पृथ्वीवरील हवामान उबदार होऊ लागले होते ?
5] जलव्यवस्थापनाचा उपयोग कोणत्या ऋतूनंतर करता येईल ?
6] which is the last day in the weekend ?
7] ज्येष्ठ व आषाढ या दोन महिन्यांमध्ये कोणता उपऋतू असतो ?
8] सातारा जिल्ह्यात वेण्णा व कृष्णा नद्यांचा संगम कोठे झाला आहे ?
9] कोकण किनारपट्टीचे उत्तरेकडून दक्षिणेकडे असे निरीक्षण करत खाली आल्यास कोणता जिल्हा सर्वप्रथम दृष्टीक्षेपात येतो ?
10]महाराष्ट्र किनारपट्टीवर नुकतेच धडकलेल्या चक्रीवादळाचे नाव काय ?

श्री नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

No comments:

Post a Comment