Tuesday, June 9, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ४६ वा

प्रश्नमंजुषा भाग ४५ ची उत्तरे

1] सुगम
2] 5
3] संघनन
4] होमो
5] जम्मू आणि काश्मीर
6] a bunch of grapes
7] राजस्थान
8] उष्ण व कोरडे
9] Compressed Natural Gas.
10]ग्रामगीता

आजची प्रश्नमंजुषा भाग ४६ वा

1] कवी अनिल यांचे पूर्ण नाव काय ?
2] एका समभुज चौकोनाची परिमिती 144 मीटर आहे तर त्या समभुज चौकोनाची बाजू किती लांबीची असेल ?
3] कुशल मानवाच्या अस्तित्वाचा शोध कोणत्या शास्ञज्ञाने लावला ?
4] पृथ्वीतलावर किती प्रकारची भूरुपे आपणाला पहावयास मिळतात ?
5] पृथ्वीच्या परिवलनाचा एक सूर्योदय ते पुढचा सूर्योदय या कालावधीला काय म्हणतात ?
6] How many bones are there in human body ?
7] ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेदिवशी आपल्या संस्कृतीतील कोणता सण साजरा केला जातो ?
8] छञपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांची भेट आपल्या जिल्ह्यात प्रथम कोठे झाली ?
9] महाराष्ट्रातील ' राष्ट्रीय उद्यान ' असा दर्जा मिळालेल्या अरण्यांची संख्या किती ?
10] आपला राज्यवृक्ष म्हणून जसा आंबा आपल्याला परिचित आहे तसे कल्पवृक्ष म्हणून आपण कोणत्या झाडाला ओळखतो ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

No comments:

Post a Comment