Tuesday, May 26, 2020

प्रश्नमंजुषा भाग ५

प्रश्नमंजुषा भाग ५

1] ब्राँझ हा मिश्रधातू मिळविण्यासाठी कोणत्या दोन धातूंचे रस एकत्र करावे लागतील ?
2] विजेच्या खांबाची लांबी, विहिरीची खोली, नदीवरील पुलाची लांबी तसेच डोंगर अथवा पर्वताची उंची मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते ?
3] सारिकाजवळ 256 फुले आहेत या फुलांपासून दशकाच्या कीती माळा तयार होतील व किती फुले शिल्लक राहतील ?
4] भाजक या शब्दाला योग्य उपसर्ग लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा ?
5]  रेडिओ ला मराठीत आपण आकाशवाणी असे म्हणतो.अजून कोणता मराठी शब्द रेडिओसाठी वापरता येईल ?
6] तापमापीमध्ये तापमान दर्शविण्यासाठी पूर्वी पारा वापरला जायचा आता एक विशिष्ट पदार्थ वापरला जातो ज्याचा रंग लाल असतो सांगा पाहू त्याचे नाव ?
7 ]चार रस्ते जिथे एकत्र येतात त्या ठिकाणाला चौक म्हणतात तर तीन रस्ते ज्या ठिकाणी एकञ येतात त्या जागेला काय म्हणतात  ?
8] सातारा जिल्ह्यात एकूण किती शिखरे आहेत ?
9] शिवरायांनी भोरप्या डोंगरावर बांधलेला किल्ला कोणता ?
10] माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण ?

नितीन जाधव
शाळा ,आपटी ता.जावली

 उत्तरसूची :
1] कथिल व तांबे
2] मीटर
3] 25 माळा
4] विभाजक दुभाजक
5] नभोवाणी
6] अल्कोहोल
7] तीठा
8] मांढरदेव ता.वाई, शिखर शिंगणापूर ता.माण
9] प्रतापगड
10] महात्मा गांधी

1 comment:

  1. खरंच खूप प्रेरणादायी आणि आदर्शवत काम. जाधव सर मला आपला खूप अभिमान वाटतो. आपली विद्यार्थीहितासाठी सुरू असणारी धडपड आपल्या प्रत्येक कामामध्ये दिसून येते. भविष्यातील उत्तुंग शैक्षणिक प्रगतीसाठी आपणास हार्दिक शुभेच्छा.

    ReplyDelete