Tuesday, May 26, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ३३ वा

प्रश्नमंजुषा भाग ३२ ची उत्तरे

१] श्यामलाल गुप्ता
२] lucky
३] अनपेक्षित
४] स्थितांबरात
५] कुरटे बेटावर
६] तीन
७] १८००
८] सोलापूर
९] बुलढाणा
१०]परमवीर चक्र

 प्रश्नमंजुषा भाग ३३ वा

१] 'मांडे' हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ कोणत्या जिल्ह्याची खासीयत आहे ?
२] महाराष्ट्रातील अस्तंभा शिखराची उंची किती आहे ?
३]संपूर्ण वर्षभरात दोनच तारखा अशा आहेत की, त्या दिवशी १२ तासांचा दिवस आणि १२ तासांची राञ असते.अशाप्रकारचा समसमान राञ दिवस असलेला उन्हाळ्यातील जो दिवस आहे त्याची तारीख सांगा ?
४] घार, गरुड, ससाणा, गिधाड यांप्रमाणेच छोट्या पक्ष्यांची शिकार करुन खाणारा पक्षी कोणता ?
५]मध्यप्रदेशातील देवरायांना कोणत्या नावाने ओळखले जाते ?
६] famous या शब्दांमध्ये कोणते pronoun दडले आहे ?
७] उत्क्रांतीतून आदिमानव प्रथम कोणत्या खंडात निर्माण झाला ?
८] मधमाश्यांच्या घराच्या खोल्या किती कोनांच्या असतात ?
९] महोदधी या शब्दाचा अर्थ काय ?
१०] एका आयताकृती मैदानाची परिमिती 100 मीटर असून त्याची लांबी ३२ मीटर आहे, तर त्याची रुंदी किती मीटर असेल ?

नितीन जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली

7 comments: