Wednesday, June 17, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ४९ वा

प्रश्नमंजुषा भाग ४८ ची उत्तरे
1] दोन
2] 11
3] बर्फाचा
4] राजगडावर
5] चांद्रकालगणना
6] mare
7] तुळस
8] कास तलाव
9] रीश्टर स्केल
10] तेलंगणा


आजची प्रश्नमंजुषा भाग ४९ वा

1] अनेक विषयांत तरबेज असणा-या व्यक्तीसाठी कोणते विशेषण वापरणे योग्य ठरेल ?
2] एका संख्येला 9 ने गुणण्याऐवजी 7 ने गुणले तेव्हा गुणाकार 6 ने कमी आला तर ती संख्या कोणती ?
3] शिसपेन्सीलमध्ये लेखन करण्यासाठी जो पदार्थ वापरलेला असतो त्या पदार्थाचे नाव काय ?
4] शिवरायांनी कोकणात जंजि-याजवळ भरसमुद्रात कोणता जलदुर्ग उभारला ?
5] हवेतील गारवा, आद्रर्ता आणि प्राणवायू यांचे प्रमाण निसर्गातील कोणत्या घटकावर अवलंबून असते ?
6] which  is the opposite word for the word  'correct' ?
7] पंचायत समितीतील  प्रमुख अधिका-याचे पद कोणते  ?
8] साता-याची खासियत म्हणून सुप्रसिद्ध असलेला मिठाईतील पदार्थ कोणता ?
9] सातपुडा पर्वतावरील सर्वात उंच ठिकाण कोणते ?
10] निसर्ग चक्रीवादळाने सर्वाधिक नुकसान झालेला  कोकणातील जिल्हा कोणता ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

आजची प्रश्नमंजुषा भाग ४८ वा

प्रश्नमंजुषा भाग ४७ ची उत्तरे

1] हुतात्मा
2] 11
3] तीन
4] १ मे १९६०
5] पूर्व
6] Penguin
7] किरी करवंदे
8] पाच
9] टी.एम.सी
10] स्वर्गिय यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग

आजची प्रश्नमंजुषा भाग ४८ वा

1] वरण या शब्दातील अक्षरांपासून दोन अक्षरी अर्थपूर्ण असे किती शब्द तयार होतील ?
2]मे महिन्यातील तारखा पाहिल्यास आपल्याला किती मूळसंख्या तारखांच्या रुपात दिसतील ?
3] जास्त तापमानात खराब होणाऱ्या वस्तू किंवा पदार्थ साठवण्यासाठी व टिकविण्यासाठी कोणत्या पदार्थाचा उपयोग होतो ?
4] शिवरायांच्या स्वराज्यातील कोणत्या गडावर आपणाला पाली दरवाजा पहावयास मिळतो ?
5] इस्लाम दिनदर्शिकेत कोणत्या कालगणना पद्धतीचा वापर केला जातो ?
6] which is the opposite gender name of  horse ?
7] आपल्या संस्कृतीत पविञ मानली जाणारी झुडुप वर्गातील वनस्पती कोणती ?
8] सातारा जिल्ह्यातील कोणता तलाव हा उरमोडी नदीचे उगमस्थान आहे ?
9] भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजली जाते ?
10]भारताचे २९ वे राज्य म्हणून कोणत्या राज्याची निर्मिती झाली आहे ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Tuesday, June 9, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ४७ वा

प्रश्नमंजुषा भाग ४६ ची उत्तरे

1] आत्माराम रावजी देशपांडे
2] 36 मीटर
3] लुई लिकी
4] 11 भूरुपे
5] दिवस
6] 206
7] वटपौर्णिमा
8] चाफळ ता.पाटण जि.सातारा
9] पाच
10]नारळ


आजची प्रश्नमंजुषा भाग ४७ वा

1] देशासाठी बलिदान देणाऱ्या व्यक्तीस काय म्हणतात ?
2] एक संख्या 11 वेळा घेऊन बेरीज केली तेव्हा बेरीज 121 आली तर ती संख्या कोणती ?
3] फुलपाखरांना पायाच्या किती जोड्या असतात ?
4] महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या दिवशी व किती साली झाली ?
5] नकाशा वाचण्यापूर्वी नकाशातील पूर्व दिशा ही परिसरातील कोणत्या दिशेशी जोडून घ्यावी लागते ?
6] Which bird cannot fly  but it can swim easily in the ocean ?
7] कोणत्या जातीची करवंदे पिकून गोडसर झाली तरी रंगाने हिरवीच राहतात ?
8] सातारा जिल्ह्याला किती जिल्ह्याच्या सीमा स्पर्श करतात ?
9] धरणातील पाणीसाठा कोणत्या एककात मोजतात ?
10]मुंबई-पुणे दरम्यान असणाऱ्या द्रुतगती मार्गाचे ( express way ) चे नाव काय ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

आजची प्रश्नमंजुषा भाग ४६ वा

प्रश्नमंजुषा भाग ४५ ची उत्तरे

1] सुगम
2] 5
3] संघनन
4] होमो
5] जम्मू आणि काश्मीर
6] a bunch of grapes
7] राजस्थान
8] उष्ण व कोरडे
9] Compressed Natural Gas.
10]ग्रामगीता

आजची प्रश्नमंजुषा भाग ४६ वा

1] कवी अनिल यांचे पूर्ण नाव काय ?
2] एका समभुज चौकोनाची परिमिती 144 मीटर आहे तर त्या समभुज चौकोनाची बाजू किती लांबीची असेल ?
3] कुशल मानवाच्या अस्तित्वाचा शोध कोणत्या शास्ञज्ञाने लावला ?
4] पृथ्वीतलावर किती प्रकारची भूरुपे आपणाला पहावयास मिळतात ?
5] पृथ्वीच्या परिवलनाचा एक सूर्योदय ते पुढचा सूर्योदय या कालावधीला काय म्हणतात ?
6] How many bones are there in human body ?
7] ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेदिवशी आपल्या संस्कृतीतील कोणता सण साजरा केला जातो ?
8] छञपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांची भेट आपल्या जिल्ह्यात प्रथम कोठे झाली ?
9] महाराष्ट्रातील ' राष्ट्रीय उद्यान ' असा दर्जा मिळालेल्या अरण्यांची संख्या किती ?
10] आपला राज्यवृक्ष म्हणून जसा आंबा आपल्याला परिचित आहे तसे कल्पवृक्ष म्हणून आपण कोणत्या झाडाला ओळखतो ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

आजची प्रश्नमंजुषा भाग ४५ वा

प्रश्नमंजुषा भाग ४४ ची उत्तरे

1] सुकाळ
2] 36
3] नॕप्थेलिन
4] गंगापूर
5] उत्तर आशियातील सायबेरियामधून
6] wrost
7] बेंदूर
8] खटाव
9] बंगालच्या उपसागरास
10] अजिंठा-वेरुळ


आजची प्रश्नमंजुषा भाग ४५ वा

1] दुर्गम या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द सांगा ?
2] 1 पासून 9 पर्यंतच्या संख्यांची सरासरी किती ?
3] बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रुपांतरण होण्याच्या क्रियेला शास्ञीय भाषेत काय म्हणतात ?
4] लॕटिन भाषेतील कोणत्या शब्दाचा अर्थ मानव असा होतो ?
5] आपल्या राज्यात केशर हा पदार्थ कोठून आयात करावा लागतो ?
6] द्राक्षांचा घडाला इंग्रजीत काय म्हणाल ?
7]भारतीय महावाळवंट प्रामुख्याने ज्या राज्यात येते ते राज्य कोणते ?
8] सातारा जिल्ह्याचे हवामान कसे आहे ?
9] CNG चे विस्तारित रुप कोणते ?
10] राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कोणत्या ग्रंथातून स्वच्छतेचे महत्त्व प्रतिपादन केले आहे ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

आजची प्रश्नमंजुषा भाग ४४ वा

प्रश्नमंजुषा भाग ४३ ची उत्तरे

1] संयोगचिन्ह
2] 35.75 रु.
3] तंतुमय पदार्थ
4] मध्याश्मयुगात
5] पावसाळ्यानंतर
6] Saturday
7] ग्रीष्म ऋतू
8] माहुली ता.जि.सातारा
9] पालघर
10] निसर्ग चक्रीवादळ

आजची प्रश्नमंजुषा भाग ४४ वा

1] दुष्काळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
2] एका वर्गातील एक तृतियांश विद्यार्थ्यांची संख्या 12 असेल तर वर्गात एकूण किती विद्यार्थी असतील ?
3] डांबरगोळ्यांमध्ये कोणते रसायन असते ?
4] महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिकजवळचे कोणते स्थळ प्रसिद्ध आहे ?
5] मायणी पक्षीअभयारण्यात येणारे रोहित पक्षी कोणत्या प्रदेशातून स्थलांतर करुन येतात ?
6] bad या शब्दाचे तिसरे रुप कोणते ?
7] बैलपोळा या सणास महाराष्ट्रातील काही भागात दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ?
8] सातारा जिल्ह्यातील मायणी पक्षी अभयारण्य कोणत्या तालुक्यात येते ?
9] महाबळेश्वर येथे उगम पावणारी कृष्णा नदी शेवटी कोणत्या सागरास जावून मिळते ?
10] महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध लेणी कोणती ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Friday, June 5, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ४३ वा

प्रश्नमंजुषा भाग ४२ ची उत्तरे

1] धुपारे
2] २४
3] अवकाळी पाऊस
4] संत नामदेव
5] अणुशक्तीचा
6] traffic signal
7] पल्स पोलिओ निर्मूलन मोहिम
8] माहुली
9] नैऋत्य
10]आंबा


आजची प्रश्नमंजुषा भाग ४३ वा

1] 'विद्यार्थी-प्रतिनिधी' हा शब्द लिहिताना दोन शब्दांमध्ये कोणते विरामचिन्ह वापरावे लागेल ?
2] एक टन साखरेची किंमत 35750 रुपये असेल तर एक किलो साखरेची किंमत किती असेल ?
3] केसर आंब्यातील धागे हे कर्बोदकांच्या कोणत्या प्रकारात मोडतात ?
4] अश्मयुगातील कोणत्या कालखंडात पृथ्वीवरील हवामान उबदार होऊ लागले होते ?
5] जलव्यवस्थापनाचा उपयोग कोणत्या ऋतूनंतर करता येईल ?
6] which is the last day in the weekend ?
7] ज्येष्ठ व आषाढ या दोन महिन्यांमध्ये कोणता उपऋतू असतो ?
8] सातारा जिल्ह्यात वेण्णा व कृष्णा नद्यांचा संगम कोठे झाला आहे ?
9] कोकण किनारपट्टीचे उत्तरेकडून दक्षिणेकडे असे निरीक्षण करत खाली आल्यास कोणता जिल्हा सर्वप्रथम दृष्टीक्षेपात येतो ?
10]महाराष्ट्र किनारपट्टीवर नुकतेच धडकलेल्या चक्रीवादळाचे नाव काय ?

श्री नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064