Sunday, August 2, 2020

आजची प्रश्नमंजुषा उपक्रमाची सांगता

प्रश्नमंजुषा भाग १०० ची उत्तरे
1] ताटवा
2] 00:00
3] कार्ल लँडस्टेनर
4] शिवनेरी
5] १६ सष्टेंबर
6] GOOD THINGS TAKE TIME
7] महात्मा गांधी
8] खाशाबा जाधव
9] सिंधुदुर्ग
10] पेदेमरी व्यंकट सुब्बाराव

सर्वांना नमस्कार..!!
     आजची प्रश्नमंजुषा या सदराचे काल १०० भाग पूर्ण झाले.आपणा सर्वांच्या प्रतिसादाने हे सदर खूप प्रसिद्धही झाले.यानिमित्ताने माझा refresh असा अभ्यासही झाला.अनेक शिक्षकांनी हा छोटा अभ्यास सर्व विद्यार्थी पालकवर्गापर्यंत पोहोचवला.whatsapp group च्या माध्यमातून ख-या अर्थाने तमाम शिक्षकांनी हे सदर मोठे केले.महत्त्व ओळखून लाॕकडाऊनमध्ये या रंजक उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन करण्यास प्रेरीत केले.
        आदरणीय प्रेरक मार्गदर्शक मा.श्री.रमेश चव्हाण साहेब ( गटशिक्षणाधिकारी पं.स.जावली ), मा.भागशिक्षणविस्ताराधिकारी कल्पना तोडरमल (पं.स.जावली ), केंद्रप्रमुख मा.विजयकुमार देशमुख, सर्व आदरणीय केंद्रप्रमुख पं.स.जावली व आपण तमाम महाराष्ट्रातील सर्व आदरणीय गुरुजन यांची प्रेरणा लाभली व मार्गदर्शन मिळाले.
          शिक्षक मंच सातारा, दैनिक रयतेचा वाली यांनी हे सदर महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवले.आज online प्रश्नमंजुषा घेत मुलांना या सदराचा आनंद देत आहोत.यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक मंच सातारा तर्फे एक प्रमाणपञ ही दिले जाईल.
        पुन्हा एकदा सर्वांचे आभार..!!!
        भेटू या पुन्हा एकदा  *विद्यार्थीहितासाठी..!!*
        तोपर्यंत नमस्कार !!

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob .9922777064

Saturday, August 1, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग १०० वा

प्रश्नमंजुषा भाग क्र.९९ ची उत्तरे
1] संदीप खरे
2] ञिमितीय वस्तू
3] लुई पाश्चर
4] केशरी
5] तेरेखोल
6] pictogram
7] नरेंद्र दाभोळकर
8] स्नेहल कदम
9] नाशिक
10] तहसिलदार

आजची प्रश्नमंजुषा भाग १०० वा
1] फुलझाडांच्या समूहाला काय म्हणतात ?
2] 24 तासांच्या डिजिटल घड्याळात मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत, ही वेळ कशी दिसेल ?
3] मानवी रक्तगटांचा शोध कोणी लावला ?
4] शिवाईदेवीचे मंदिर असणारा किल्ला कोणता ?
5] जागतिक ओझोन दिन कधी येतो ?
6] ' चांगल्या गोष्टींना वेळ लागतो ' या अर्थाची कोणती इंग्रजी म्हण आपण शिकला आहात ?
7] ' मानवता हाच खरा धर्म ' हे बोल कोणाचे ?
8]  आॕलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक खेळातील पहिले पदक मिळविणारे सातारा जिल्ह्यातील खेळाडू कोण ?
9] महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ' पहिला पर्यटन जिल्हा ' म्हणून घोषित झाला आहे ?
10] 'भारत माझा देश आहे ' या प्रतिज्ञेचे लेखक कोण ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob .9922777064

Friday, July 31, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र.९९

प्रश्नमंजुषा भाग ९८ ची उत्तरे
1] वाहवा
2] 8 दशक
3] मृग नक्षञाचा
4] पायदळाचा
5] दक्षिण भागात
6] Mechanic
7] सकपाळ
8] चाफळ जि.सातारा
9] उर्दू कवी मंहमद इक्बाल
10] राफेल

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र.९९
1] ' अग्गोबाई ढग्गोबाई ' हे मनोरंजक बालगीत कोणी लिहिले आहे ?
2] लांबी,रुंदी आणि उंची असलेल्या वस्तूंना भौमितिक  भाषेत काय म्हणतात ?
3] ' अँटीरेबीज लस ' शोधणारा शास्ञज्ञ कोण ?
4] राष्ट्रध्वजावरील कोणता रंग त्यागाचे प्रतीक आहे ?
5] महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील नदी कोणती ?
6] चिञाक्षरलिपीच्या आलेखास किंवा तक्त्यास इंग्रजीत काय म्हणतात  ?
7] ' महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती ' ची स्थापना कोणी केली ?
8] जिब्राल्टरची सामुद्रधुनी वडिलांसोबत पोहून पार करणारी सातारची सागरकन्या कोण ?
9] महाराष्ट्रात मीग विमान निर्मिती कोठे होते ?
10] ' तालुका दंडाधिकारी ' म्हणून काम पाहणारा अधिकारी कोण ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob .9922777064

Thursday, July 30, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र. ९८

प्रश्नमंजुषा भाग ९७ ची उत्तरे
1] भव्यता
2] 15
3] साल्क
4] हेन्री आॕक्झिंडेन
5] चिखलदरा
6] love
7] कर्मवीर भाऊराव पाटील
8] कराड जि.सातारा
9] डोंग [ राज्य - अरुणाचल प्रदेश ]
10] पुणे - सोलापूर

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र. ९८
1] ' वा ' या अक्षराने सुरुवात व शेवट होणारा प्रसंशादर्शक शब्द कोणता ?
2] 43 दशकातून 10 एकक वजा करुन त्यात किती दशक मिळविले असता उत्तर 5 शतक येईल ?
3] कोणत्या नक्षञात पडलेल्या पावसामुळे तापलेल्या जमिनीचा वाफसा होण्यास मदत होते ?
4] शिवरायांच्या कोणत्या दलात नूर बेग हा एक प्रमुख सेनानी होता ?
5] भारताचे स्थान आशिया खंडाच्या कोणत्या भागात आहे ?
6] Who repairs things by spanner and screwdriver ?
7] डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ आडनाव काय होते ?
8] मराठी कवी 'यशवंत' यांचे जन्मगाव कोणते ?
9] ' सारे जहाँ से अच्छा..' या गीताचे गीतकार कोण ?
10] प्रत्येक मोहिमेवर पाठवले जाऊ शकते असे कोणते लढाऊ विमान भारतीय वायुदलात नुकतेच दाखल झाले आहे ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob .9922777064

Wednesday, July 29, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र. ९७

प्रश्नमंजुषा भाग ९६ ची उत्तरे
1] हसू
2] 6
3] सूक्ष्मदर्शी
4] रायगडावर
5] पोफळीचे झाड
6] buck
7] १९ फेब्रुवारी
8] माण
9] मुरलीधर देवीदास आमटे
10] यमुना नदीवर

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र.९७
1] ' भव्य ' या शब्दापासून गुण दाखवणारे कोणते नाम तयार करता येईल ?
2] एका संख्येतून 8 वजा करुन त्याला 4 ने गुणल्यास गुणाकार 28 येतो.तर ती संख्या कोणती ?
3] पोलिओ या रोगाची लस कोणी शोधून काढली ?
4] शिवराज्याभिषेकास उपस्थित असलेल्या इंग्रज वकीलाचे नाव काय ?
5] विदर्भातील एकमेव गिरिस्थान कोणते ?
6] Which is the opposite word for ' hate ' ?
7] ' कमवा आणि शिका ' ही संकल्पना कोणाची ?
8] ' MH 50 ' हा वाहन नोंदनी क्रमांक सातारा जिल्ह्यातील कोणत्या परिवहन कार्यालयाचा आहे ?
9] भारतात सर्वप्रथम सूर्योदय होणारे गाव कोणते ?
10] राज्यातील ' संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग ' म्हणून कोणता मार्ग ओळखला जातो ?
नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Tuesday, July 28, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र.९६

प्रश्नमंजुषा भाग ९५ ची उत्तरे
1] अभ्राच्छादित
2] 12600 ने
3] ' ड ' जीवनसत्त्व
4] संत तुकाराम
5] भुईकोट किल्ला
6] badminton
7] पाचव्या
8] पुणे
9] आग्रेस ग्रोझा कॕश्युस
10] वाशिष्ठी नदीत

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र.९६
1] ' रडू ' या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता ?
2] एका संख्येच्या निमपटीची तिप्पट 9 आहे , तर ती संख्या कोणती ?
3] अतिसूक्ष्म कणांचा अभ्यास करण्यासाठी प्रयोगशाळेत कोणते उपकरण वापरतात ?
4] ऐतिहासिक हिरकणी बुरूज कोणत्या गडावर आहे ?
5] कोकणात सुपारीच्या झाडाला काय म्हणतात ?
6] what is called the young on of rabbit ?
7] ग्रेगरीयन वर्षाप्रमाणे शिवजयंती कोणत्या तारखेस येते ?
8] सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील मृदा तुलनात्मक दृष्ट्या निकृष्ट आहे ?
9] थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय ?
10] दिल्ली शहर कोणत्या नदीवर वसले आहे ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षिका ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Monday, July 27, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र. ९५

प्रश्नमंजुषा भाग ९४ ची उत्तरे
1] अनुज
2] 13
3] त्वचेमार्फत
4] शिवराई
5] दोन
6] She'd
7] आदिवासी बांधव [ वारली ]
8] शिवपुञ छञपती राजाराम महाराज
9] पालघर
10] चिखलदरा

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र. ९५
1] ' निरभ्र ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
2] जयवंतने 14,014 ही संख्या लिहिताना 0 लिहिला नाही तर त्याची संख्या कितीने चुकली ?
3] कोवळ्या सूर्यप्रकाशातून आपणाला कोणते जीवनसत्त्व मिळते ?
4] शिवराय कोणत्या संतांच्या किर्तनाला जात असत ? 
5] शनिवारवाडा हा किल्ला कोणत्या किल्ले प्रकारात येईल ?
6] Which game requires a shuttlecock for playing ?
7] कितव्या सौर महिन्यात आपणाला ऊन-पावसाचा खेळ पहावयास मिळतो ?
8] सातारा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?
9] भारतरत्न आणि नोबेल शांतता पुरस्कार सन्मानित मदर तेरेसा यांचे संपूर्ण नाव काय ?
10] कोयना जलविद्युत प्रकल्पाचे पाणी कोणत्या नदीत सोडले जाते ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064