Tuesday, July 28, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र.९६

प्रश्नमंजुषा भाग ९५ ची उत्तरे
1] अभ्राच्छादित
2] 12600 ने
3] ' ड ' जीवनसत्त्व
4] संत तुकाराम
5] भुईकोट किल्ला
6] badminton
7] पाचव्या
8] पुणे
9] आग्रेस ग्रोझा कॕश्युस
10] वाशिष्ठी नदीत

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र.९६
1] ' रडू ' या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता ?
2] एका संख्येच्या निमपटीची तिप्पट 9 आहे , तर ती संख्या कोणती ?
3] अतिसूक्ष्म कणांचा अभ्यास करण्यासाठी प्रयोगशाळेत कोणते उपकरण वापरतात ?
4] ऐतिहासिक हिरकणी बुरूज कोणत्या गडावर आहे ?
5] कोकणात सुपारीच्या झाडाला काय म्हणतात ?
6] what is called the young on of rabbit ?
7] ग्रेगरीयन वर्षाप्रमाणे शिवजयंती कोणत्या तारखेस येते ?
8] सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील मृदा तुलनात्मक दृष्ट्या निकृष्ट आहे ?
9] थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय ?
10] दिल्ली शहर कोणत्या नदीवर वसले आहे ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षिका ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

26 comments:

  1. आदरणीय जाधव सर आपले कार्य खरोखरच खूप खूप प्रेरणादायी आहे. अभ्यासपूर्ण काढलेले सर्व विषयानुरूप दर्जेदार अशी प्रश्नावली.विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त ठरते आहे.विद्यार्थी प्रतिसाद उस्फुर्त मिळत आहे. आम्हाला हा सुंदर उपक्रम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

    ReplyDelete
  2. सुंदर उपक्रम!!!

    ReplyDelete
  3. अतिशय उत्तम उपक्रम

    ReplyDelete
  4. खूप अभ्यासपूर्ण प्रश्नावली , विद्यार्थी उपयुक्त अशा उपक्रम 👌👌👌👌

    ReplyDelete
  5. अत्यंत उपयुक्त असा हा उपक्रम आहे.👌👍
    सुजाता जाधव

    ReplyDelete
  6. सर्वप्रथम आपले अभिनंदन सर

    'आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ?' या युक्तीप्रमाणे देशाची पिढी घडवण्यासाठी,सुजाण नागरिक घडवण्यासाठी शिक्षक हा सज्ज असला पाहिजे. आपण तयार केलेली प्रश्ननिर्मिती खूप छान असून आम्हा शिक्षकांना खूप मार्गदर्शक ठरत आहे.

    पुनश्च एकदा अभिनंदन व पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा सरजी

    ReplyDelete
  7. आमचे गुरूवर्य,मार्गदर्शक व मित्र श्री जाधव सर यांस खूप खूप धन्यवाद.
    त्यांच्या उपक्रमशीलतेला सलाम!!!!

    ReplyDelete
  8. सुंदर उपक्रम,,,,,,,,Ashok V.more G.T.Nipani

    ReplyDelete
  9. खूप अभ्यासपूर्ण प्रश्नावली

    ReplyDelete
  10. छान प्रश्नरचना...!!!

    ReplyDelete
  11. सर्वसमावेश कुतूहल जागृत करणारे प्रश्न..काकडे सर

    ReplyDelete
  12. या उपक्रमासाठी जाधव सर आपण खूप वेळ देताय.आम्ही सर्व आपले आभारी आहोत. प्राथमिक शिक्षिका.सौ.कांचन सुतार

    ReplyDelete
  13. आमचे मित्र नितीन जाधव सरांचे प्रश्नमंजुषाचे ९६ भाग पूर्ण झाले.खरंच खूप आनंद होतोय.तेवढाच अभिमानपण वाटतोय. विद्यार्थी,शिक्षक,पालक सर्वांना उपयुक्त अशी प्रश्नमंजुषा अविरतपणे अशीच पुढे चालत राहो.प्रश्नमंजुषाचे शतक पूर्ण होईलच. त्यापुढेही जाऊन सेहवाग सारखे प्रश्नमंजुषाचे त्रिशतक पूर्ण व्हावे,हीच प्रार्थन! आणि प्रश्नमंजुषाचे त्रिशतक पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हार्दिक आणि विराट शुभेच्छा!

    ReplyDelete