Friday, July 10, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ७८ वा

प्रश्नमंजुषा भाग ७७ ची उत्तरे
1] निर्माल्य
2] 30
3] पर्णरंध्रे
4] श्री चक्रधरस्वामी
5] तिथी
6] loaves
7] मकर राशीत
8] धावडशी ता.जि.सातारा
9] प्लेइंग इट माय वे
10] मकरसंक्रांत

आजची प्रश्नमंजुषा भाग ७८ वा
1] पावसापूर्वी केलेल्या पेरणीस काय म्हणतात ?
2] सापसिडीतील ' फासा ' कोणत्या आकाराचा असतो ?
3] कोणता गोड स्फटिकमय पदार्थ ' परिरक्षक पदार्थ ' म्हणूनही वापरतात ?
4] काही शतकांपूर्वी कोणत्या पक्ष्यांचा उपयोग संदेशवहनासाठी केला जाई ?
5] दिवसराञ समान असणारा पावसाळ्यातील दिवस कोणता ?
6] दातदुखीला इंग्रजीत कोणता शब्द वापरला जातो ?
7] कोकणात कोकणी भाषेबरोबरच आणखी कोणती बोलीभाषा प्रचलित आहे ?
8] सातारा जिल्ह्यातील कोणत्या शहरात ' कारगिल विजय दिवस ' साजरा केला जातो ?
9] कोणत्या सालानंतर मतदानाचा हक्क व्यक्तीस १८ वर्षे पूर्ण झाल्यावर देण्यात आला ?
10] सर्व विमाने वातावरणाच्या कोणत्या थरात उडतात ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

15 comments: