Monday, July 13, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ८१ वा

प्रश्नमंजुषा भाग ८० ची उत्तरे
1] लहान तोंडी मोठा घास
2] २८ दिवसांच्या
3] पोलिओ
4] नवाश्मयुग
5] हिमनग
6] merrily
7] १ जानेवारी [ नूतन ग्रेगरीयन वर्षारंभ ]
8] कोयना जलविद्युत प्रकल्प जि.सातारा
9] गड संरक्षण समिती
10] भारतात

आजची प्रश्नमंजुषा भाग ८१ वा
1] आठवड्यातील कोणत्या वारात चंद्राचा समानार्थी शब्द दडलेला आहे ?
2] कडा व कोपरे नसणारे क्रिकेट खेळामधील खेळसाहित्य कोणते ?
3] मान नसणारा उभयचर प्राणी कोणता ?
4] शिवरायांच्या कोणत्या सैन्यदलात युद्धनौकांचे तांडे असत ? 
5] कोणते फळ वाळवल्यानंतर त्याची खारीक तयार होते ?
6] How many edges does a handkerchief  have ?
7] हिंदू संस्कृतीतील कोणता सण तीथीनुसार येत नाही ?
8] समर्थ रामदास स्वामींचे महानिर्वाण कोणत्या गडावर झाले ?
9] कोणते फूल झाडावर असताना त्याचे तोंड सतत सूर्याकडे वळलेले असते ?
10] किती साली मोर हा पक्षी 'भारताचा राष्ट्रीय पक्षी ' म्हणून घोषित झाला ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob . 9922777064

17 comments:

  1. जाधव सर , तुमचा उपक्रम खूप प्रेरणादायी आहे.keep it up👍

    ReplyDelete
  2. खूपच छान व सातत्यपूर्ण उपक्रम

    ReplyDelete
  3. विविध प्रकारचे प्रश्न असल्याने जनरल नॉलेज वाढण्यास मदत होईल

    ReplyDelete
  4. विविध प्रकारचे प्रश्न असल्याने जनरल नॉलेज वाढण्यास मदत होईल

    ReplyDelete
  5. खूप सुंदर प्रश्नमाला, असेच उपक्रम राबवण्याची आपल्याला प्रेरणा मिळो💐💐💐

    ReplyDelete
  6. स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त प्रश्नमंजुशा आहे.
    You are great SIR. KEEP IT UP.

    ReplyDelete
  7. मार्गदर्शन देणारा उपक्रम आहे.खूप छान!

    ReplyDelete
  8. श्री.नितिन जाधव सर, दैनिक रयतेचा वाली या डिजिटल वृत्तपत्रात आपली "आजची प्रश्नमंजुषा" महाराष्ट्राच्या भेटीला येत आहे.त्याबद्दल आपले अभिनंदन.शिक्षक मंच सातारा च्या मंचावरून सुरू झालेला आजच्या प्रश्नमंजुषा उपक्रमाचा प्रवास आज संपूर्ण महाराष्ट्र भर पोहोचला आहे.
    निश्चितच यातून आपल्या या उपक्रमाची विद्यार्थी व पालकांना स्पर्धा परीक्षा व समान्यज्ञान वृद्धीसाठी असणारी उपयोगिता सिद्ध होते.
    असेच नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्यामार्फत विदयार्थी भेटीला येवोत यासाठी शुभेच्छा💐💐💐
    -श्रीम कदम ज्योती
    शिक्षक मंच सातारा

    ReplyDelete
  9. उत्कृष्ट उपक्रम

    ReplyDelete
  10. खुपच प्रेरणादायी उपक्रम ..... आदिनाथ कदम जी.प.शाळा निपाणीमुरा,ता.जावली जि.सातारा.

    ReplyDelete
  11. खूप छान सर!,👍विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक अशी ही प्रश्नमंजुषा आहे. सुजाता जाधव

    ReplyDelete
  12. GOOD PROGRAM SIR
    I WISH YOU GOOD SUCCESS IN FUTURE

    ReplyDelete
  13. स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्नमंजूषा आहे. सर्व विषयानुरुप दर्जेदार प्रश्न.अतिशय सुंदर आणि अभिनव उपक्रम.खूप धन्यवाद जाधव सर .
    कुमार कांबळे

    ReplyDelete