Friday, July 31, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र.९९

प्रश्नमंजुषा भाग ९८ ची उत्तरे
1] वाहवा
2] 8 दशक
3] मृग नक्षञाचा
4] पायदळाचा
5] दक्षिण भागात
6] Mechanic
7] सकपाळ
8] चाफळ जि.सातारा
9] उर्दू कवी मंहमद इक्बाल
10] राफेल

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र.९९
1] ' अग्गोबाई ढग्गोबाई ' हे मनोरंजक बालगीत कोणी लिहिले आहे ?
2] लांबी,रुंदी आणि उंची असलेल्या वस्तूंना भौमितिक  भाषेत काय म्हणतात ?
3] ' अँटीरेबीज लस ' शोधणारा शास्ञज्ञ कोण ?
4] राष्ट्रध्वजावरील कोणता रंग त्यागाचे प्रतीक आहे ?
5] महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील नदी कोणती ?
6] चिञाक्षरलिपीच्या आलेखास किंवा तक्त्यास इंग्रजीत काय म्हणतात  ?
7] ' महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती ' ची स्थापना कोणी केली ?
8] जिब्राल्टरची सामुद्रधुनी वडिलांसोबत पोहून पार करणारी सातारची सागरकन्या कोण ?
9] महाराष्ट्रात मीग विमान निर्मिती कोठे होते ?
10] ' तालुका दंडाधिकारी ' म्हणून काम पाहणारा अधिकारी कोण ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob .9922777064

28 comments:

  1. सर आपल्या हातून असेच उच्च दर्जाचे कार्य घडो. .स्वतः बरोबर आपण इतरांना आपल्या ज्ञानाचा फायदा देत आहात खूप खूप अभिनंदन

    ReplyDelete
  2. शतकपूर्तीकडे वाटचाल खूप खूप अभिनंदन

    ReplyDelete
  3. अभिनंदन!अभिनंदन! अभिनंदन!
    (सुजाता जाधव)

    ReplyDelete
  4. खूप च छान सर,,,,A.V.More,,,,,सोनवडी ता.फलटण

    ReplyDelete
  5. आदरणीय श्री जाधव सर .आपले कार्य खरोखरच खुप प्रेरणादायी अतुलनीय आहे. सगळे जण लाँकडाऊन असतांना आपण मात्र विद्यार्थांसाठी घरी बसून ज्ञानाची दारे अनलाँक केलीत.आपली शिक्षणविषयक तळमळ सतत विद्यार्थी विकासासाठी झटत राहण्याच्या व्रत्तीला. अशा कार्याला सलाम. आणि खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  6. शतकपूर्तीकडे वाटचाल खूप अभिनंदन...

    ReplyDelete
  7. Congratulations for great achievement of this activity and completion century💐💐💐

    ReplyDelete
  8. Great ....work sir ,✌️✌️
    All d very best for your forthcoming educational activities.💐💐💐

    ReplyDelete
  9. आदरणीय श्री.जाधव सर यांचा "आजची प्रश्नमंजुषा" हा अतिशय ज्ञान संपन्नतेचा खजिना असणारा उपक्रम शंभरीकडे वाटचाल करतोय याबददल श्री.जाधव सर यांचे कौतुक व मनःपूर्वक अभिनंदन. प्रश्नमंजुषेच्या रूपाने श्री.जाधव सरांनी विपुल ज्ञानाचं भांडार विदयार्थ्यांसाठी खुलं केलं आहे. यामधून श्री.जाधव सर यांची विद्यार्थ्यांच्या उत्तम शिक्षणाविषयीची तळमळ दिसून येते.श्री.जाधव सरांचा हा उपक्रम शंभर भागांपर्यंत मर्यादीत न राहाता त्रिशतकांपलिकडे तो पोहोचावा व या उपक्रमरूपी ज्ञानकुंभामधील अमृतकणांनी असंख्य विद्यार्थ्यांची ज्ञानतृष्णा भागावी.
    श्री.जाधव सर आपल्या या अतिशय वेगळ्या व विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षा अधिकाधिक रुंदावणाऱ्या उपक्रमास व आपल्या उत्तुंग शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि हो आम्हाला पुन्हा एकदा ऐकायला आवडेल "चला तर मग पुन्हा भेटू एका नव्या प्रश्नमंजुषेसह"
    -श्री.हेमकांत किरवे (बामणोली)

    ReplyDelete
  10. आदरणीय जाधव गुरुजी,
    बहुविध प्रश्नांनी नटलेली आपली प्रश्नमंजुषा स्पर्धा परीक्षांसाठी एक उत्तम पर्याय आहे.खूप छान रचले आहेत प्रश्न.
    आपल्या प्रश्ननिर्मिती कौशल्याला सलाम..!!
    वैशाली व अक्षय पवार फलटण

    ReplyDelete
  11. Best knowledge progressing programme.
    Pradnya Pune

    ReplyDelete
  12. ज्ञानवर्धक प्रश्न

    ReplyDelete
  13. खूप खूप छान उपक्रम

    ReplyDelete
  14. लाॕकडाऊनमधील शिक्षणास गती मिळाली..दाहिंजे सर

    ReplyDelete
  15. निवडालेला स्तुत्य उपक्रम

    ReplyDelete
  16. उपक्रमाचा छान यशस्वी प्रवास..देवी वाघ मॕडम

    ReplyDelete
  17. श्री.नितीन जाधव सर
    प्राथमिक शिक्षक म्हणून आपण २३ वर्षापासून अत्यंत आदर्श असे काम करत आहात. शिष्यवृत्ती मार्गदर्शन, प्रश्नमंजूषा, विवीध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा साठी आपण आपल्या विद्यार्थ्यांना नेहमीच नवनवीन ज्ञान देण्याचा प्रयत्न करत आहात.
    लॉकडाऊन च्या काळात आपण विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेली प्रश्नमंजूषा उपक्रम, प्रश्नमंजुषेच्या रूपाने आपण ज्ञानाचं भांडार विदयार्थ्यांसाठी खुलं केलं आहे. यामधून आपली विद्यार्थ्यांच्या उत्तम शिक्षणाविषयीची तळमळ दिसून येते. आपला हा उपक्रम शंभर भागापर्यंत पोहोचतोय.

    आपल्या या शैक्षणिक कार्यास सलाम व शुभेच्छा

    श्री.विजय शिर्के

    ReplyDelete
  18. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  19. आदरणीय जाधव सर,
    असे अनेक छान छान उपक्रम भविष्यातही भेटीला यावेत.अनेक शैक्षणिक प्रयोगांसाठी खूप खूप शुभेच्छा !

    ReplyDelete
  20. स्वस्थ न बसणा-या सतत प्रयत्नशील राहणा-या वर्गमिञास,एका आदर्श शिक्षकास उपक्रमशीलतेच्या उदंड शुभेच्छा..!!
    प्रविण शुक्ला

    ReplyDelete
  21. सर आपला हा ज्ञानयज्ञ असाच चालू राहावा👍👍👍
    सुनिता गंगावणे💐💐💐

    ReplyDelete
  22. सर आपला हा ज्ञानयज्ञ असाच चालू राहावा👍👍👍
    सुनिता गंगावणे💐💐💐

    ReplyDelete