Sunday, July 19, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ८७ वा

प्रश्नमंजुषा भाग ८६ ची उत्तरे
1] कु
2] 6
3] बीजांकुरण
4] प्रभास पाटण [ गुजरात ]
5] पवनउर्जा
6] p
7] संत ज्ञानेश्वर
8] काले ता.कराड  जि.सातारा
9] अग्निबाणाच्या साहाय्याने
10] राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

आजची  प्रश्नमंजुषा भाग ८७ वा
1] ' इकडे आड तिकडे विहीर ' या म्हणीतील ' आड ' आणि ' विहीर ' हे शब्द कोणता अर्थ दर्शवितात ?
2] इष्टिकाचितीच्या कोपऱ्यांना गणिती भाषेत काय म्हणाल ?
3] सरकीपासून मुख्यतः कशाची निर्मिती केली जाते ?
4] ' भारतीय सर्वेक्षण संस्था ' कोणत्या सालापासून कार्यरत आहे ?
5] समुद्र किना-यावर बोटी थांबण्यासाठी, बोटींना दोर बांधून समुद्रात जे साधन टाकले जाते त्यास काय म्हणतात ?
6] which is the shape of an egg ?
7]' खंजरी ' हे वाद्य कोणत्या संतांमुळे प्रसिद्धीस आले ?
8] सातारा जिल्ह्यातील कोणते पठार पवन-विद्युतनिर्मितीसाठी प्रसिद्ध आहे ?
9] रायगड किल्ल्याच्या रचनेचे श्रेय शिवरायांच्या कोणत्या स्वामिनिष्ठ सरदाराला दिले जाते ?
10] कोणता दिवस ' आंतरराष्ट्रीय शांतता दिन ' म्हणून जगभर साजरा केला जातो ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

20 comments:

  1. जाधव सर अतिशय छान प्रश्न . विद्यार्थ्यासाठी विचारप्रवर्तक प्रश्न .

    ReplyDelete
  2. विद्यार्थ्यांना उपयुक्त उपक्रम आहे.खूप छान.

    ReplyDelete
  3. अतिशय उपयुक्त असा हा अभिनव उपक्रम आहे.सर्व विषयांवर आधारित दर्जेदार प्रश्ननिर्मिती केली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास मदत होते.
    कुमार कांबळे
    जि.प.प्राथ शाळा लिंब नं 2

    ReplyDelete
  4. अशा उपक्रमातील सातत्य अभिनंदनीय

    ReplyDelete
  5. प्रश्नमाला खूप वैविध्यपूर्ण

    ReplyDelete
  6. संकटातही संधी पाहिलीत..सर..छानच

    ReplyDelete
  7. जबरदस्त उपक्रमशीलता

    ReplyDelete
  8. आपला उपक्रम बौद्धिक मेजवानी देत आहे.

    ReplyDelete
  9. स्त्युत्य उपक्रम

    ReplyDelete
  10. सुपर प्रश्नसंचमाला

    ReplyDelete
  11. ज्ञानवर्धक प्रश्नमाला

    ReplyDelete
  12. छान साठा झाला प्रश्नांचा

    ReplyDelete
  13. This comment has been removed by the author.

    ReplyDelete