Sunday, May 31, 2020

प्रश्नमंजुषा भाग १४ वा

प्रश्नमंजुषा भाग १३ ची उत्तरे

1]आयत
2] गोवा
3] मिलीमोटर
4] ३५ मिलीमीटर
5]  Television
6] Geography
7] स्थायी समिती
8] शेपूट
9] विशेषण (उदा.गोड बर्फी)
10]सज्जनगड

 प्रश्नमंजुषा भाग १४ वा

1] आकाशवाणीच्या माध्यमातून मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जनतेशी ज्या कार्यक्रद्वारे संवाद साधतात त्या कार्यक्रमाचे नाव काय ?
2] आयताला सममितीचे किती अक्ष पडतात ?
3] छत्तीसगढ हे राज्य महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे ?
4] बालदिन कोणत्या ग्रेगरीयन महिन्यात येतो ?
5] भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजतात ?
6] १ ते १०० संख्यांमधील सर्वात लहान विषम मूळ संख्येची चौपट किती ?
7] सातारा जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी कोण आहेत ?
8] फर्निचर बनविण्यासाठी वापरण्यात येणा-या कोणत्या लाकडास वाळवी लागत नाही ?
9] शिवराय शककर्ते राजे झाले ही घटना कोणत्या साली घडली ?
10]विजेच्या पाळण्याला म्हणजेच उंच इमारतींमधील लिफ्टला मराठीत काय म्हणतात ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा

प्रश्नमंजुषा भाग १३ वा

प्रश्नमंजुषा भाग १२ ची उत्तरे

1] सातारा व सांगली
2] आंबा
3] बीया
4] ओरोस बुद्रुक
5] दक्षिणेला
6] ३६० अंश
7] घन
8] १ मीटर
9] भा.रा.तांबे
10] (पुणे, सातारा, सोलापूर, सांगली कोल्हापूर )

प्रश्नमंजुषा भाग १३ वा

1] दोन चौरस एकमेकांना जोडले असता कोणती नविन आकृती मिळेल ?
2] देशातील पहिले कोरोनामुक्त राज्य कोणते ?
3] पडलेला पाऊस कोणत्या एकतात मोजला जातो ?
4] ३.५ सेमी म्हणजे किती मिलीमीटर ?
5] टेलिव्हीजन या शब्दाचे अचूक स्पेलिंग काय ?
6] भूगोल या विषयाला इंग्रजीत काय म्हणतात ?
7] जि.प.मधील सर्वात महत्त्वाची समिती कोणती ?
8] मासा पाण्यात पोहताना दिशा बदलण्यासाठी कोणत्या अवयवाचा उपयोग करतो ?
9] नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात ?
10]समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपल्या  जिल्ह्यातील गड कोणता ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा, आपटी ता.जावली जि.सातारा

Saturday, May 30, 2020

प्रश्नमंजुषा भाग ३७ वा

प्रश्नमंजुषा भाग ३६ ची उत्तरे

1] विनाश
2] दोन अक्ष
3] जलावरण
4] युरोप
5] पश्चिम
6] जिराफांवरील
7] सांगली
8] ५ तालुक्यांमधून
9] मढी
10] पालघर

३१ मे - जागतिक तंबाखू विरोधी दिन ' विशेष प्रश्नमंजुषा ' सदर

आजची प्रश्नमंजुषा भाग ३७ वा

1]जगात, तंबाखूमुळे होणा-या तोंडाच्या कॕन्सरचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत.-- या वाक्यातील 'कॕन्सर' या रोगाला आपण मराठीत कोणत्या नावाने ओळखतो ?
2]तंबाखूमुक्त शाळा अभियानात एका तालुक्यातील 250 शाळांपैकी 205 शाळा तंबाखूमुक्त झाल्या, तर या अभियानात तो तालुका किती टक्के यशस्वी झाला ?
3] तंबाखूमध्ये आढळणारा विषारी घटक कोणता ?
4] धूम्ररहित तंबाखू पदार्थांत किती कर्कजनक रसायने असतात ?
5] तंबाखू या वनस्पतीच्या कोणत्या अवयवापासून तंबाखू हा पदार्थ मिळतो ?
6] सिगारेट पाकिटावर तथा वेष्टनावर इंग्रजीत असणारी आरोग्यसूचना कोणती ?
7] जगातील पहिला तंबाखूमुक्त शाळांचा जिल्हा बनण्याचा मान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याने पटकावला आहे ?
8] सातारा जिल्ह्यातील तंबाखूमुक्त शाळांचा पहिला तालुका कोणता ?
9] आपल्या देशात तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम कायदा किती साली बनविण्यात आला ?
10]शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मदतीने महाराष्ट्रभर तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविणा-या संस्थेचे नाव काय ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा, आपटी ता.जावली जि.सातारा

प्रश्नमंजुषा भाग १२ वा

प्रश्नमंजुषा भाग ११ ची उत्तरे
1] तारापूर जि.पालघर
2] खरीप हंगाम
3] जलविद्युत निर्मिती
4] गुजरात
5] उरण
6]  देवराई
7] भीमाशंकर जि.पुणे
8] पूर्व महाराष्ट्र
9] माळढोक
10]पक्षिनिरीक्षण

 प्रश्नमंजुषा भाग १२ वा
1] चांदोली अभयारण्य कोणत्या दोन जिल्ह्यात येते ?
2] महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता ?
3] चहा पावडर चहा या वनस्पतींच्या पानांपासून मिळते तर काॕफी, काॕफी वनस्पतीच्या कोणत्या भागापासून मिळते ?
4] सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कारभार कोणत्या ठिकाणी चालतो ?
5] मध्यप्रदेश राज्याच्या कोणत्या दिशेला आपला महाराष्ट्र आहे ?
6] चौरसातील कोनांच्या मापांची बेरीज किती ?
7] कोणत्या ञिमितीय वस्तूतील प्रत्येक बाजूचा आकार चौरसाकृती असतो ?
8] एक सहा मीटर लांबीची दोरी पाच ठिकाणी कापल्यास प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल ?
9] रानकवी असा गौरव कोणत्या कवींचा केला जातो ?
10] पुणे प्रशासकीय विभागात किती जिल्हे येतात ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा, आपटी ता.जावली जि.सातारा

प्रश्नमंजुषा भाग ११ वा

प्रश्नमंजुषा भाग १० ची उत्तरे

1] बेसाॕल्ट
2] मुंबई हाय व वसई हाय
3] ७२० किमी
4] मणिकरण (हिमाचल प्रदेश )
5] काळा
6] हवा
7] व्हॕटिकन सिटी
8] २९ एप्रिल
9] कल्ले
10] विष्णू वामन शिरवाडकर

 प्रश्नमंजुषा भाग ११ वा
1] महाराष्ट्रातील एकमेव अणुविद्युत केंद्र कोठे आहे ?
2] पावसाळ्यात होणाऱ्या शेतीच्या हंगामाला कोणता हंगाम म्हणतात ?
3] मोठ्या धरणातील पाणी उंचावरुन खाली सोडून जी विद्युतनिर्मिती केली जाते, तिला कोणती विद्युतनिर्मिती म्हणतात ?
4] महाराष्ट्राच्या वायव्येस कोणते राज्य आहे ?
5] मुंबईजवळ अरबीसमुद्रात मिळणारा नैसर्गिक वायू कोणत्या बंदराजवळ साठवला जातो ?
6] महाराष्ट्रातील वनसंवर्धनाचा पारंपारिक प्रकार कोणता ?
7] महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरु खार कोणत्या जंगलात आढळते ?
8] हरियाल हा आपला राज्यपक्षी महाराष्ट्रातील कोणत्या भागात आढळतो ?
9] महाराष्ट्रात झुडपी व काटेरी वनांत आढळणारा संकटग्रस्त पक्षी कोणता ?
10] सलिम अली हे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व कोणत्या बाबीसाठी प्रसिद्ध आहे ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा

आजची प्रश्नमंजुषा भाग ३६ वा

प्रश्नमंजुषा भाग ३५ ची उत्तरे

१] पणा
२] 1200
३] हिवताप म्हणजेच मलेरीया
४] साहिष्णूता
५] भीमगड
६] forest / wood
७] सुमारे तीन लाख चौकिमी
८] पूर्व भागात ( पूर्व महाराष्ट्रात )
९] १ मे ला
१०] खोड

आजची प्रश्नमंजुषा भाग ३६ वा

1] थोर संशोधक डाॕ.भिसे यांनी स्वयंचलित तोफ करण्याचे काम नाकारून मानवतेच्या भूमिकेतून होणार संहार आपल्या परीने वाचवला. --- या वाक्यातील संहार या शब्दाचा अर्थ काय ?
2] आयताला सममितीचे किती अक्ष पडतात ?
3]पृथ्वीच्या कोणत्या आवरणात असणा-या जीवांची संख्या सर्वाधिक आहे ?
4] एक तासाचा कालखंड मोजण्यासाठी वापरात आलेली वाळूची घड्याळे सर्वप्रथम कोणत्या खंडात वापरात आली ?
5] महाराष्ट्रातील सुर्योदय पूर्व दिशेला होतो तर मध्यप्रदेशातील सूर्यास्त कोणत्या दिशेला होईल ?
6] We saw a TV programme on giraffes.-- या वाक्यातील on giraffes या शब्दसमूहाचा मराठी अर्थ काय ?
7] कर्मवीर भाऊराव पाटलांचे जन्मस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
8] सातारा जिल्ह्यातून गेलेला रेल्वेमार्ग जिल्ह्यातील किती तालुक्यांमधून प्रवास करतो ?
9] गाढवांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असणारे अहमदनगर जिल्ह्यातील ठिकाण कोणते ?
10] महाराष्ट्रातील जिल्हेनिर्मितीनुसार ३६ वा जिल्हा कोणता ?

नितिन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा, आपटी ता.जावली जि.सातारा

Friday, May 29, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ३५ वा

प्रश्नमंजुषा भाग ३४ ची उत्तरे

१] केकारव
२] 1/2
३] जलावरणात
४] अस्पृश्यता
५] तळबीड ता.कराड जि.सातारा
६] काफ्
७] वार्षिक गतीशी
८] श्रीमंत छञपती उदयनराजे भोसले
९] महाराष्ट्र
१०]३१ मे


 आजची प्रश्नमंजुषा भाग ३५ वा

1] प्रामाणिक या विशेषणाचे नामात रुपांतर करण्यासाठी त्या शब्दाला कोणता प्रत्यय जोडावा लागेल ?
2] 1800 पेरु 15 पेट्यात समान भरले त्यापैकी 10 पेट्या नागपूरला विक्रीसाठी पाठवल्या, तर किती पेरु नागपूरला पाठविले ?
3]अॕनाफिलीस डासाची मादी चावल्यामुळे आपणाला कोणता रोग होऊ शकतो ?
4]आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे. ही भावना म्हणजे कोणते नैतिक मूल्य ?
5] स्वराज्यात पुरंदर या किल्ल्याप्रमाणेच आणखी कोणत्या गडावर तोफा तयार करण्याचे कारखानेही होते ?
6] grove या इंग्रजीतील शब्दासाठी इंग्रजीतीलच कोणता समानार्थी शब्द वापरता येईल ?
7] आपल्या महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे ?
8] हरियाल हा आपला राज्यपक्षी महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आढळतो ?
9] सातारा शहरात ' गुलमोहर डे ' उन्हाळ्यात साजरा होतो, हा दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात ?
10] 'आले' या वनस्पतीच्या कोणत्या भागाचा आपण अन्न म्हणून वापर करतो ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा, आपटी ता.जावली जि.सातारा