Thursday, June 4, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ४२ वा

प्रश्नमंजुषा भाग ४१ ची उत्तरे

1] बेट
2] 1
3] आदिमूळ
4] लीळाचरिञ
5] सामुद्रधुनी
6] जवळच
7] 2 माध्यमातून
8] चार
9] उल्कापात
10]पाच

आजची प्रश्नमंजुषा भाग ४२ वा

1] अंगारे या शब्दाला जोडून येणारा जोडशब्द कोणता ?
2] दोन संख्यांची बेरीज 40 आहे व त्याच दोन संख्यांची वजाबाकी 8 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती ?
3] पाऊस पडण्याचा ठरावीक काळ सोडून इतर वेळी पडणा-या पावसास आपण काय म्हणतो ?
4] महाराष्ट्रातील कोणत्या संतांची पदे 'गुरुग्रंथसाहिब ' या शीख धर्मग्रंथात पहावायास मिळतात ?
5] महाराष्ट्रातील वीजनिर्मितीमध्ये कोणत्या शक्तीचा वापर अतिशय मर्यादित स्वरुपात आहे ?
6] रस्त्यावरील वाहतुकीला इशारा देण्यासाठी लावलेल्या  दिव्यांना इंंग्रजीत काय म्हणतात ?
7] ' दो बूँद जिंदगी के ' हे वाक्य कोणत्या मोहिमेसंदर्भातील आहे ?
8] पेशवेकालीन न्यायाधीश रामशास्ञी प्रभुणे यांचे सातारा जिल्ह्यातील जन्मगाव कोणते ?
9] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती पूर्व भागाबरोबर आणखी कोणत्या भागात एकवटलेली आहे ?
10]महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

आजची प्रश्नमंजुषा भाग ४१ वा

प्रश्नमंजुषा भाग ४० ची उत्तरे

1] मोहर
2] 50 बाटल्या
3] खेचर
4] मिर्झाराजे जयसिंग
5] दोन
6] ripe
7] 5 जून
8] परळी किल्ला
9] खातगूण ता.खटाव
10]नागपूर

आजची प्रश्नमंजुषा भाग ४१ वा


1] द्वीप म्हणजे काय ?
2] म आणि क असे दोन बिंदू एकमेकांपासून 6 सेमी अंतरावर आहेत. या दोन्ही बिंदूतून जाणाऱ्या किती रेषा काढता येतील ?
3] सोटमूळाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात ?
4] श्रीचक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे कोणता ग्रंथ ?
5] दोन सागरांना जोडणा-या सागरी जलाच्या अरुंद भागास काय म्हणतात ?
6] A mouse was playing nearby. -- या वाक्यातील nearby या शब्दाचा अर्थ काय ?
7] कावीळ हा संसर्गजन्य रोग किती माध्यमांतून पसरू शकतो ?
8] सातारा जिल्ह्याचे प्राकृतिक रचनेनुसार एकूण किती भाग पडतात ?
9] प्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या भौगोलिक कारणामुळे निर्माण झाले आहे ?
10]आपल्या देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी किती ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा

आजची प्रश्नमंजुषा भाग ४० वा

प्रश्नमंजुषा भाग ३९ ची उत्तरे

1] पालवी
2] CL
3] काजू
4] राजगडावर
5] आधुनिक शेती
6] coconut shell
7] होळी
8] सातारा
9] सिंधुदुर्ग
10]खाद्य पदार्थांची गुणवत्ता


आजची प्रश्नमंजुषा भाग ४० वा

1] आंबा या वनस्पतीच्या फुलो-याला काय म्हणतात ?
2] यंञाच्या मदतीने एका बाटलीत सरबत भरुन ती बंद करण्यास 6 मिनिटे वेळ लागतो,तर अशा किती बाटल्या 5 तासांत भरुन होतील ?
3] पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना जलचर म्हणतात तर, हवेत उडणा-या प्राण्यांना काय म्हणतात ?
4] कोंढाण्यावर किल्लेदार म्हणून असलेल्या उदेभानची किल्लेदार म्हणून नेमणूक कोणी केली होती ?
5] संञे या फळाचे वर्षभरात किती बहर येतात ?
6] Which is the opposite word for the word 'raw' ?
7] जागतिक पर्यावरण दिन कोणत्या तारखेस व कोणत्या महिन्यात साजरा केला जातो ?
8]सज्जनगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते ?
9] सातारा जिल्ह्यातील हिंदू - मुस्लिम ऐक्याचा उरुस जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी भरतो ?
10]भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शवणारे झीरो माइल हे स्थान महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा

आजची प्रश्नमंजुषा भाग ३९ वा

प्रश्नमंजुषा भाग ३८ ची उत्तरे

1] चार
2] 138
3] रुई या वनस्पतीच्या पानावर
4] गिरीदुर्ग
5] ठाणे
6] बक्षिस / पारितोषिक
7] कटगुण ता.खटाव जि.सातारा
8] सातारा
9] चिकू
10]ताम्हण

आजची प्रश्नमंजुषा भाग ३९ वा.

1] झाडांना येणाऱ्या नविन कोवळ्या पानांना काय म्हणतात ?
2] 150 ही संख्या रोमन अंकात कशी लिहावी लागेल ?
3] फळाच्या बाहेर बी असणारे फळ कोणते ?
4] आग्रा येथील सुटकेनंतर शिवराय महाराष्ट्रातील कोणत्या गडावर सुखरूप पोहोचले ?
5] विज्ञान व तंञज्ञानाचा वापर करुन करण्यात येणाऱ्या शेतीस कोणती शेती म्हणतात ?
6] इंग्रजीत नारळाला coconut म्हणतात, तर नारळाच्या करवंटीला काय म्हणावे लागेल ?
7] कोकणात गणेशोत्सवाबरोबर आणखी कोणता सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो ?
8] संपूर्ण महाराष्ट्रात सांगली जिल्ह्याबरोबर हळद व आल्याचे सर्वाधिक उत्पादन घेणारा दुसरा जिल्हा कोणता ?
9] महाराष्ट्रातील एकमेव सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्याच्या किनारपट्टीला आहे ?
10]एग्मार्क हे प्रमाणपञ कशाची गुणवत्ता दाखवते ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा, आपटी ता.जावली जि.सातारा

Sunday, May 31, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ३८ वा

प्रश्नमंजुषा भाग ३७ ची उत्तरे

1] कर्करोग
2] ८२ %
3] निकोटीन
4] २८ रसायने
5] पानांपासून
6] CIGARETTE SMOKING IS INJURIOUS TO HEALTH.
7] यवतमाळ
8] जावली तालुका
9] २००३ साली
10] सलाम मुंबई फाउंडेशन


आजची प्रश्नमंजुषा भाग ३८ वा

1] सावजासाठी वाघ गवतात दबा धरुन लपून बसतो.-----या वाक्यात एकूण किती नामे आलेली आहेत ?
2] 70 च्या अगोदरच्या व नंतरच्या लगतच्या मूळ सख्यांची बेरीज काय येईल ?
3] बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरु कोणत्या वनस्पतीच्या पानावर अंडे घालते ?
4] दौलताबाद हा कोणत्या प्रकारचा दुर्ग आहे ?
5] वारली कलासंस्कृती ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे ?
6] price या शब्दाचा अर्थ भाव/किंमत तर prize या शब्दाचा अर्थ काय ?
7] महात्मा ज्योतिराव फुले यांचे जन्मगाव कोणते ?
8] सातारा जिल्ह्यातील ठोसेघर हा प्रसिद्ध धबधबा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?
9] महाराष्ट्रातील घोलवड हे ठिकाण कौणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ?
10] आपल्या राज्याचे राज्यफूल कोणते ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा, आपटी ता.जावली जि.सातारा

प्रश्नमंजुषा भाग १६ वा

प्रश्नमंजुषा भाग १५ ची उत्तरे

1] 6 या संख्येची
2] आसरा/थारा
3] नावाडी
4] राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
5] अवकाश/अंतराळ
6] शिशिर
7] हरितद्रव्य
8] वनस्पती
9] keep it safe
10]12

 प्रश्नमंजुषा भाग १६  वा

1] फळभाज्या,फळे व पालेभाज्या विकणा-यास इंग्रजीत  काय म्हणतात ?
2] 1 कोटी म्हणजे किती लाख ?
3] भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्ञाला काय म्हणतात ?
4] सहा अंकी सर्वात मोठी संख्या आणि सात अंकी सर्वात लहान संख्या यांतील फरक कीती ?
5] ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास अपु-या शब्दापुढे कोणते विरामचिन्ह वापरतात ?
6] उसात आढळणाऱ्या शर्करेचे नाव काय ?
7] शरीरातील लोहाच्या अभावाने कोणता रोग होतो ?
8] भारतीय उपखंडातील संस्कृती कोणत्या नावाने ओळखली जाते ?
9] 'शहेनशाही' ही कालगणना भारतातील कोणत्ता समाज उपयोगात आणतो ?
10] लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात कोणता ग्रंथ लिहिला ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा, आपटी ता.जावली जि.सातारा

प्रश्नमंजुषा भाग १५ वा

प्रश्नमंजुषा भाग १४ ची उत्तरे

1] मन की बात
2] २
3] पूर्वेला
4] नोव्हेंबर
5] रीश्टर स्केल
6]  १२
7] मा.प्रभावती कोळेकर
8]  सागवान
9] १६७४
10]उद् वाहक

 प्रश्नमंजुषा भाग १५ वा

1] 144 ही संख्या कोणत्या संख्येची 24 पट  आहे ?
2] विसावा या शब्दाचा एक समानार्थी शब्द  निवारा तर दुसरा समानार्थी शब्द कोणता असेल ?
3] घोडा चालवणा-याला घोडेस्वार म्हणतात तर होडी चालवणा-याला काय म्हणतात ?
4] 'ग्रामगीता' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
5] ग्रह, तारे यांमधील असणारी रिकामी जागा म्हणजे काय ?
6] भारतातील उपऋतुंमधील शेवटचा उपऋतू कोणता ?
7] पानांमधल्या कोणत्या घटकाच्या मदतीने वनस्पती स्वतः चे अन्न तयार करतात ?
8] पर्यावरणातील अन्नसाखळीचा प्रमुख आधार घटक कोणता ?
9] 'ते सुरक्षित ठेव' ही सूचना असलेला शब्दसमूह इंग्रजीत कसा व्यक्त कराल ?
10] आॕटोरीक्षा हा इंग्रजी शब्द किती अक्षरांचा आहे ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा