Tuesday, May 26, 2020

प्रश्नमंजुषा भाग ५

प्रश्नमंजुषा भाग ५

1] ब्राँझ हा मिश्रधातू मिळविण्यासाठी कोणत्या दोन धातूंचे रस एकत्र करावे लागतील ?
2] विजेच्या खांबाची लांबी, विहिरीची खोली, नदीवरील पुलाची लांबी तसेच डोंगर अथवा पर्वताची उंची मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते ?
3] सारिकाजवळ 256 फुले आहेत या फुलांपासून दशकाच्या कीती माळा तयार होतील व किती फुले शिल्लक राहतील ?
4] भाजक या शब्दाला योग्य उपसर्ग लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा ?
5]  रेडिओ ला मराठीत आपण आकाशवाणी असे म्हणतो.अजून कोणता मराठी शब्द रेडिओसाठी वापरता येईल ?
6] तापमापीमध्ये तापमान दर्शविण्यासाठी पूर्वी पारा वापरला जायचा आता एक विशिष्ट पदार्थ वापरला जातो ज्याचा रंग लाल असतो सांगा पाहू त्याचे नाव ?
7 ]चार रस्ते जिथे एकत्र येतात त्या ठिकाणाला चौक म्हणतात तर तीन रस्ते ज्या ठिकाणी एकञ येतात त्या जागेला काय म्हणतात  ?
8] सातारा जिल्ह्यात एकूण किती शिखरे आहेत ?
9] शिवरायांनी भोरप्या डोंगरावर बांधलेला किल्ला कोणता ?
10] माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण ?

नितीन जाधव
शाळा ,आपटी ता.जावली

 उत्तरसूची :
1] कथिल व तांबे
2] मीटर
3] 25 माळा
4] विभाजक दुभाजक
5] नभोवाणी
6] अल्कोहोल
7] तीठा
8] मांढरदेव ता.वाई, शिखर शिंगणापूर ता.माण
9] प्रतापगड
10] महात्मा गांधी

प्रश्नमंजुषा भाग ४

प्रश्नमंजुषा भाग ४

1] दोन अंकी संख्यांना इंग्रजीत काय म्हणतात ?
2] 49 ही क्रमवाचक संख्या इंग्रजीत कशी लिहाल ?
3] कोणत्या संख्येची तिप्पट 39 असेल ?
4] शिवरायांनी तोरणा गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, हा गड जिंकल्यावर शिवरायांनी त्या गडाला कोणते नाव दिले ?
5] प्रत्येक तालुक्याचा कारभार करण्यासाठी अथवा पाहण्यासाठी  कोणती स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असते ?
6] आपला सातारा जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?
7] शरीरातील रक्ताभिसरणाचे कार्य कोणते आंतरींद्रिय करत असते ?
8] मराठी महिन्यातील दररोजच्या दिनांकास काय म्हणतात ?
9] महात्मा फुले यांचे सातारा जिल्ह्यातील मूळगाव कोणते ? 10]पंचायत समितीतील प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो ?

नितीन जाधव
शाळा, आपटी ता.जावली

उत्तरसूची :
1] two digit numbers
2] forty-ninth ( 49 th )
3] 13
4] प्रचंडगड
5] पंचायत समिती
6] पुणे
7] हृदय
8] तिथी
9] कटगूण
10] गटविकास अधिकारी ( B. D. O.)

प्रश्नमंजुषा भाग ३

प्रश्नमंजुषा भाग ३

1] कोरोना या आजाराला दुसऱ्या   कोणत्या नावाने ओळखले जाते ?
2] सुर्योदय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
3] समुद्राला इंग्रजीत sea सी असं म्हणतात तर महासागराला इंग्रजीत काय म्हणतात ?
4] अन्नाचे पचन अन्ननलिकेत होते.या अन्ननलिकेचे एकूण कीती भाग असतात ?
5] इंग्रजीत एकूण किती स्वर आहेत ?
6] मराठी नववर्ष ज्या सणाने सुरु होते त्या सणाचे नाव काय ?
7] सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेल्या भूरुपाला काय म्हणतात ?
8] ग्रामपंचायत तथा गावाला मदत करणा-या सरकारी अधिका-याला काय म्हणतात ?
9] गावातील लोकांचे आरोग्य प्रश्न सोडविण्यासाठी, आरोग्यसेवा देण्यासाठी गावपातळीवर जे सरकारी केंद्र असते त्या केंद्राचे नाव काय ?
10] गणेशोत्सव हा सण किती दिवस चालतो ?

नितीन जाधव
शाळा,आपटी ता.जावली

उत्तरसूची

1] कोव्हीड -१९
2] सूर्यास्त
3] ocean
4] ५ ( तोंड, ग्रसिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे )
5] ५ ( a, e, I, o, u )
6] गुढीपाडवा
7] बेट
8] ग्रामसेवक
9] प्राथमिक आरोग्य केंद्र
10] ११ दिवस

प्रश्नमंजुषा भाग २

प्रश्नमंजुषा भाग २

1]करंगळी या मराठी शब्दाला इंग्रजीत काय नाव आहे स्पेलिंगसहित सांगा ?
2] दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असेल तर त्या संख्यांना कोणत्या संख्या म्हणून ओळखले जाते ?
3] कवीवर्य बा.सी.मर्ढेकर यांचे सातारा जिल्ह्यातील कोणते गाव आहे ?
4] वातावरणातील कोणत्या घटकातून पाऊस पडतो ?
5] घरातील काडीपेटीच्या आकारास गणितीय भाषेत काय म्हटले जाते ?
6] मोहरम या सणाचे दुसरे नाव काय ?
7] दरवर्षी आपण कोणत्या तारखेस शिवजयंती साजरी करतो ?
8] रविंद्रनाथ टागोरांनी 'शांति- निकेतन' ही शाळा बंगालमध्ये कोणत्या ठिकाणी सुरु केली ?
9] नवाश्मयुग हा कोणत्या युगाचा कालखंड आहे ?
10] प्राचीन इजिप्तमध्ये कोणता खेळ फार लोकप्रिय होता ?

नितीन जाधव
शाळा, आपटी ता.जावली

 उत्तरसूची :

1] little finger
2] जोडमूळ संख्या
उदा.5 व 7 : 11 व 13 कारण 5 व 7 दरम्यान 6 ही एकच संयुक्त संख्या येते.
3] कृष्णा नदीकाठावरील मर्ढे ता.सातारा
4] ढगातून
5] इष्टिकाचिती
6] ताजिया
7] १९ फेब्रुवारी
8] बोलपूर
9] अश्मयुग
10] सेनात

प्रश्नमंजुषा भाग ३२ वा

प्रश्नमंजुषा भाग ३१ ची उत्तरे

1] o
2] पळस
3] शहाजीराजांनी
4] hopscotch
5] १२ मे
6] lockdown
7] an
8] कानात
9] १९६० पासून
10] १४ मे


प्रश्नमंजुषा भाग ३२ वा

१]भारताचे ध्वजगीत ' विजयी विश्व तिरंगा प्यारा ' हे कोणी लिहिले आहे ?
२]luckily या adverb मध्ये लपलेले adjective कोणते ?
३]अपेक्षित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
४]वातावरणाच्या कोणत्या थरात ओझोन हा वायू असतो ?
५]शिवरायांनी मालवणजवळ कोणत्या बेटावर सिंधुदुर्ग हा जलदुर्ग बांधला ?
६]'निसर्गाने करुणा केली,  भाते पिकुनी पिवळी झाली' ---या वाक्यात किती नामे आली आहेत ?
७]घड्याळातील अर्ध्या तासात किती सेकंद असतात ?
८]महाराष्ट्रातील पंढरपूर हे तीर्थक्षेञ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
९]महाराष्ट्रातील एकमेव खा-या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१०]भारत देशातील सर्वोच्च लष्करी पदक कोणते?

नितीन जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली

Saturday, May 23, 2020

*प्रश्नमंजुषा भाग १*

*प्रश्नमंजुषा भाग १*
1] पूर्व व दक्षिण या दोन दिशांमधील उपदिशा कोणती ?
2] १ ते १०० सख्यांमधील २१ वी मूळ संख्या कोणती ?
3] डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण नाव काय ?
4] पाणीविरहीत हात स्वच्छतेसाठी वापरले जाणारे सॕनिटायझरमध्ये कोणता घटक जास्त प्रमाणात असतो ?
5] ईस्टर डे म्हणजेच कोणता सण ?
6] शिवरायांचा राज्याभिषेक ज्या गडावर झाला तो गड कोणत्या जिल्ह्यात आहे ?
7] जयंती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
8]फळे व भाज्यांपासून आपणास कोणते अन्नघटक मिळतात ?
9] ३ रीम ५ दस्ते ८ ताव : किती ताव ?
10] कोणत्या प्रक्रियेत बर्फाचे पाण्यामध्ये रुपांतर होते ?

_*नितीन जाधव*_
शाळा, आपटी ता.जावली

*उत्तरसूची*
1] आग्नेय
2] ७३
3] भिमराव रामजी आंबेडकर
4] अल्कोहोल
5] गुडफ्रायडे
6] रायगड
7] पुण्यतिथी
8] खनिजे व जीवनसत्त्वे
9] १५६८ ताव
10]वितळणे

Friday, May 22, 2020

प्रश्नमंजुषा

तशी या उपक्रमाची पहिल्यापासून च आवड आहे.तसे पाहिले तर प्रत्येक प्रश्न एक सूक्ष्म उपघटकच असतो.मुलांची शोधकवृत्ती वाढविण्यासाठी, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी हा एक रंजक उपक्रम आहे.या उपक्रमाचे सातत्य ठेवल्यास शेवटी विद्यार्थीही हे प्रश्ननिर्मितीचे कौशल्य आत्मसाद करतो.ज्ञानाची रचना करायला शिकतो.हे एक प्रकारचे *स्वावलंबनच* आहे.
सर्वांना धन्यवाद ‼
मी या blog मार्फत हा उपक्रम सर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे.सर्वांचे सहकार्य लाभावे. खूप खूप धन्यवाद ‼
🌷🙏