Tuesday, June 30, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ६८ वा

प्रश्नमंजुषा भाग ६७ वा
1] मुलाखत तंञ
2] १०
3] चार
4] आग्र्याहून सुटका
5] शिखर
6] liquid soap
7] साडेतीन मुहूर्त
8] गजे लेझिम
9] कोल्हापूर
10] नील आर्मस्टाँग

आजची प्रश्नमंजुषा भाग ६८ वा
1] ' वनस्पतींची झाडावरुन खाली पडलेली वाळलेली पाने ' या शब्दसमूहासाठी एक शब्द सांगा ?
2] वर्तुळाची सर्वात मोठी जीवा त्या वर्तुळातील ञिज्येच्या कितीपट असते ?
3] मीठ व साखरेच्या द्रावणाला वैज्ञानिक भाषेत काय म्हणतात ?
4] घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला ?
5] लीपवर्षात मकरसंक्रांत कोणत्या तारखेस येते ?
6] dirty म्हणजे घाणेरडे तर, dirt म्हणजे काय ?
7] अग्रहायण हे कोणत्या सौर महिन्याचे दुसरे नाव आहे ?
8] सातारा जिल्ह्यातील कोणती नदी कृष्णेची प्रमुख उपनदी म्हणून ओळखली जाते ?
9] बौद्ध धर्मियांच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात ?
10] ब्रेल लिपीचे जनक कोण ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Monday, June 29, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ६७ वा

प्रश्नमंजुषा भाग ६६ ची उत्तरे
1] प्रत्यय
2] कोनमापक
3] फ्लाॕवर / केळफूल
4] भवानीमाता
5] पाल्कची सामुद्रधुनी
6] t
7] आॕस्ट्रेलिया
8] ललिता बाबर
9] रेशीम किडा
10] २० मार्च १९२७

आजची प्रश्नमंजुषा भाग ६७ वा
1] प्रश्न विचारून माहिती गोळा करणे या तंञाला काय म्हणतात ?
2] 1 ते 100 पर्यंत एकूण किती चौरस संख्या सापडतील ?
3] खेकडा या जलचराला पायाच्या किती जोड्या असतात ?
4] जसवंतसिंग राठोड या सरदाराची आठवण आपणाला कोणत्या प्रसंगातून येते ?
5] सर्वात उंच असणाऱ्या भूरूपास काय म्हणतात ?
6] द्रवरूप साबणाला इंग्रजीत काय म्हणतात ?
7] सौरवर्षात एकूण किती शुभमुहूर्त असतात ?
8] सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील प्रसिद्ध लेझिम प्रकार कोणता ?
9] गुळाची मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेले आपल्या  राज्यातील ठिकाण कोणते ?
10] चंद्रावर पहिले पाऊल ठेवणा-या मानवाचे नाव सांगा ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Sunday, June 28, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ६६ वा

प्रश्नमंजुषा भाग ६५ ची उत्तरे
1] आत्मवृत्त / आत्मचरिञ
2] शून्य
3] इंधन
4] रायगड
5] पूर्व
6] 12 letters
7] घंटागाडी
8] रहिमतपूर ता.कोरेगाव
9] ९ आॕगस्ट
10] पॕसिफिक महासागर

आजची प्रश्नमंजुषा भाग ६६ वा
1] मूळ शब्दांच्या पुढे जोडून येणाऱ्या शब्दांना काय म्हणतात ?
2] कंपासपेटीतील कोणत्या साधनाचा आकार अर्धवर्तुळाकृती असतो ?
3] आपल्या आहारात असणाऱ्या कोणत्याही एका फुलभाजीचे नाव सांगा ?
4] शिवरायांच्या कुलदेवतेचे नाव सांगा ?
5] अरबी समुद्र व बंगालचा उपसागर या दोन समुद्रांना जोडणा-या सामुद्रधीनीचे नाव काय ?
6] Tell the silent letter in the word ' Pitcher.'
7] कांगारु हा प्राणी पाहण्यासाठी आपणाला कोणत्या देशाला भेट द्यावी लागेल ?
8] २०१५ साली आशियाई अॕथलेटिक्समध्ये स्टीपलचेसचं सुवर्णपदक जिंकणारी,माणदेशी एक्सप्रेस अशी उंच ओळख लाभलेली खेळाडू कोण ?
9] ' रेशीम ' नावाचा धागा कोणापासून मिळतो ?
10] चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची संपूर्ण तारीख सांगा ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता,जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Saturday, June 27, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ६५ वा

प्रश्नमंजुषा भाग ६४ ची उत्तरे
1] ञ्यंबक बापूजी ठोंबरे
2] 7
3] पाणी
4] १९५० पासून
5] हिमालय
6] Diwali
7] शीख धर्मियांचा
8] कराड
9] नंदुरबार
10] हाॕकी

आजची प्रश्नमंजुषा भाग ६५ वा
1] ' स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरिञ ' या शब्दसमूहासाठी एक शब्द सांगा ?
2] 12 च्या पाढ्यातील तीन अंकी विषम संख्या किती ?
3] उष्णता मिळवण्यासाठी जो ज्वलनशील पदार्थ सोईस्करपणे वापरता येतो, त्या पदार्थाला काय म्हणतात ?
4] शिवरायांनी आपल्या राज्याभिषेकासाठी कोणत्या गडाची निवड केली ?
5] कोणत्याही नकाशात दिशादर्शक बाणाच्या उजवीकडील दिशा कोणती असते ?
6] How many letters are there in the word ' handkerchief.'
7] घरातील कचरा वाहून नेण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या गाड्यांची व्यवस्था करतात, त्या गाड्यांना काय म्हणतात ? 
8] केंद्रीय कृषी खात्याने सुरु केलेले ' देशातील पहिले आले संशोधन केंद्र ' सातारा जिल्ह्यात कोठे आहे ?
9] आॕगस्ट क्रांतिदिन आॕगस्ट महिन्यातील कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?
10] जगातील सर्वात मोठा व सर्वाधिक खोली असणारा महासागर कोणता ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Thursday, June 25, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ६४ वा

प्रश्नमंंजुषा भाग ६३ ची उत्तरे

1] उद् गारार्थी वाक्य
2] 270
3] शिंगाडा
4] शिवराम हरी राजगुरू
5] मुंबई
6] leafy
7] वटवृक्ष
8] पुणे-बंगळुर
9] सारनाथ येथील अशोकस्तंभावरून
10] समृद्धीचे / भरभराटीचे

आजची प्रश्नमंजुषा भाग ६४ वा
1] बालकवी असे कोणत्या कवीस संबोधले जाते ?
2] नऊ कोटी लिहिताना नऊवर किती शून्य द्यावी लागतील ?
3] पदार्थांच्या तिन्ही अवस्थांमध्ये आढळणारा एकमेव पदार्थ कोणता ?
4] भारतीय संविधानाची अंमलबजावणी कोणत्या सालापासून सुरू करण्यात आली ?
5] भारतातील कोणत्या पर्वताच्या शिखरांवर सतत बर्फ साठलेला असतो ?
6] Which is the festival of lamps ?
7] ' बैसाखी ' हा सण कोणत्या धर्मियांचा आहे ?
8] सातारा जिल्ह्यात कोणत्या शहरात आपणास उंच गोलाकार मनोरे पहावयास मिळतात ?
9] 'आदिवासींचा जिल्हा ' म्हणून ओळख असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता ?
10] भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

आजची प्रश्नमंजुषा भाग ६३ वा

प्रश्नमंजुषा भाग ६२ ची उत्तरे

1] अरुणोदय
2] ७२
3] पाणी
4] १८ एप्रिल
5] पोफळी
6] artificial
7] सत्यमेव जयते
8] पाटण
9] कोकम
10] आंबोली

आजची प्रश्नमंजुषा भाग ६३ वा
1] ' बालचमू खुशीत दिसतोय!' या वाक्याचा प्रकार कोणता ?
2] एका आंब्याच्या झाडाला 3240 आंबे आले ते किती डझन आंबे असावेत ?
3] पाण्यात वाढणाऱ्या कोणत्या वनस्पतीचे कंद अन्न म्हणून खाल्ले जातात ?
4] कोणत्या क्रांतिकारकाच्या स्मृतिप्रित्यर्थ खेड या त्यांच्या जन्म गावास ' राजगुरूनगर 'असे नाव देण्यात आले ?
5] भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहराचा गौरव केला जातो ?
6] Make a correct adjective from the noun ' leaf '.
7] रयत शिक्षण संस्थेचे ' बोधचिन्ह ' कोणते ?
8] सातारा जिल्ह्यातून गेलेल्या एकमेव लोहमार्गाचे नाव काय ?
9] राजमुद्रा हे आपले राष्ट्रीय प्रतीक कोठून घेतले आहे ?
10] आपल्या राष्ट्रध्वजातील हिरवा रंग कशाचे प्रतीक आहे ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Wednesday, June 24, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ६२ वा

प्रश्नमंजुषा भाग ६१ ची उत्तरे
1] अनुभव
2] सात
3] खोड
4] नेतोजी पालकर
5] ३६५ दिवस ६ तास
6] tamarind seed
7] डेबूजी झिंगराजी जानोरकर
8] सैनिक स्कूल सातारा
9] क्यूसेक
10] फातिमा शेख

आजची प्रश्नमंजुषा भाग ६२ वा
1] सूर्योदय या अर्थाचा कोणता शब्द आपणाला अनेक कवितांमधून पहावयास मिळतो ?
2] ९ च्या पाढ्यातील सर्वात मोठी विषम संख्या व सर्वात लहान विषम संख्या यांतील फरक सांगा ?
3] अन्नातील कोणत्या घटकामुळे आपल्या शरीरातील रक्त पातळ राहते ?
4] जागतिक वारसा दिन दरवर्षी कोणत्या तारखेस साजरा केला जातो ?
5] कोकणात सुपारीच्या झाडाला कोणत्या नावाने संबोधले जाते ?
6] Which is the opposite word for the word 'natural ' ?
7] भारत देशाचे ब्रीदवाक्य कोणते ?
8] सातारा जिल्ह्यातील कोणते ठिकाण कोयना व केरा या दोन नद्यांच्या संंगमावर वसलेले आहे ?
9] रातांबीच्या झाडांना लागणाऱ्या फळांना काय म्हणतात ?
10] महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद होते ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Tuesday, June 23, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ६१ वा

प्रश्नमंजुषा भाग ६० ची उत्तरे
1] तिन्ही सांज
2] 500 डेसिमीटर
3] डोळा
4] सिद्दी मसऊद
5] त्सुनामी
6] caterpillar
7] माणिकजी बंडूजी ठाकूर
8] नेर तलाव
9] सोलापूर
10] अकरा

आजची प्रश्नमंजुषा भाग ६१ वा
1] ' स्वतःशी घडलेली घटना अथवा प्रसंग ' या शब्दसमूहासाठी एक शब्द सांगा ?
2] 13 चे दोन अंकी विभाज्य किती ?
3] आले हा वनस्पतीचा भाग वनस्पतीच्या कोणत्या अवयवात मोडतो ?
4] शिवकाळात लोक प्रतिशिवाजी असे कोणास म्हणत ?
5] पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो ?
6] चिंचेतील बीला इंग्रजीत कोणत्या नावाने ओळखले जाते ?
7] संत गाडगेबाबांचे पूर्ण नाव सांगा ?
8] भारतातील पहिली, लष्करी शिक्षण देणारी कोणती शाळा सातारचा मानबिंदू आहे ?'
9] धरणातील पाण्याचा विसर्ग कोणत्या एककात मोजतात ?
10] सावित्रीबाई फुलेंच्या सहकारी शिक्षिकेचे नाव सांगा ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Monday, June 22, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ६० वा

प्रश्नमंजुषा भाग ५९ ची उत्तरे

1] नर्तक
2] सहा
3] शॕमेलिअन सरडा
4] हर हर महादेव
5] जम्मू- काश्मीर
6] full / substantial
7] वसंत
8] आगाशिव डोंगर
9] आपत्कालीन व्यवस्थापन विभाग
10] १५ आॕगस्ट १९४७

आजची प्रश्नमंजुषा भाग ६० वा

1] दिवस संपून राञ व्हायच्या आधीच्या वेळेला काय म्हणतात ?
2] 50 मीटर म्हणजे किती डेसिमीटर ?
3] अनैच्छिक आणि ऐच्छिक स्नायूंपासून कोणते ज्ञानेंद्रिय बनते ?
4] तुरी देऊन शिवराय निसटल्याचे लक्षात येताच सिद्दीने शिवरायांचा पाठलाग करण्यास कोणाला पाठविले ?
5] समुद्रात भूकंप झाला, तर अतिशय मोठ्या लाटा उसळतात. त्यांना काय म्हणतात ?
6] फुलपाखरांच्या वाढीतील दुसऱ्या अवस्थेला इंग्रजीत काय म्हणतात ?
7] राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव काय ?
8] सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील ब्रिटिशकालीन तलावाचे नाव काय ?
9] महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते ?
10]  समर्थ रामदास स्वामी स्थापित किती मारुती देवस्थाने राज्यात पहायला मिळतात ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Sunday, June 21, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ५९ वा

प्रश्नमंजुषा भाग ५८ ची उत्तरे

1] क्षितीज
2] 91 सेमी
3] चार पदार्थांचे
4] वल्कले
5] निम सदाहरित वने
6] blue whale
7] नारळ
8] महाबळेश्वर
9] २०१५ पासून
10] २१ जून

आजची प्रश्नमंजुषा भाग ५९ वा

1] नर्तिका या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ?
2] 5, 0, 3, 1 या चार अंकांपासून 4000 पेक्षा मोठ्या किती संख्या मिळतील ?
3] आपल्या इच्छेनुसार, आवश्यकतेनुसार आपल्या त्वचेचा रंग सहजपणे बदलू शकणारा, सरपटणारा प्राणी कोणता ?
4] शिवकालीन युद्धगर्जना कोणती ?
5] आपल्या देशात हिमवर्षाव कोठे होतो ?
6] Which is the opposite word for the word ' hollow ' ?
7] पक्षी कोणत्या उपऋतूत विशेष आनंदी असतात ?
8] सातारा जिल्ह्यातील कराड शहाराजवळील बौद्ध लेणी कोणत्या डोंगरात खोदलेल्या आहेत ?
9] नैसर्गिक संकटांना तोंड देण्यासाठी सरकारने कोणता विभाग स्थापन केला आहे ?
10] आपला राष्ट्रध्वज सर्वप्रथम कधी फडकवण्यात आला, त्या ऐतिहासिक दिनाची संपूर्ण तारीख सांगा ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Saturday, June 20, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ५८ वा

प्रश्नमंजुषा भाग ५७ ची उत्तरे

1] तंटा
2] 2 इंच
3] तोंड
4] छञपती राजाराम महाराज
5] झरा
6] red
7] अग्यारी
8] पश्चिम
9] संत तुकाराम
10]आर्सेनिक अल्बम 30

आजची प्रश्नमंजुषा भाग ५८ वा
1] जिथे आकाश जमिनीला टेकले आहे असे वाटते ते ठिकाण --- या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?
2] एका फळ्यावर एक रेषा 100 सेमी लांबीची तर दुसरी रेषा 90 मिमी लांबीची आहे तर दोन्ही रेषांच्या लांबीमधील फरक किती ?
3] लिंबाचे सरबत किती पदार्थांचे द्रावण आहे ?
4] आदिमानव अंगाभोवती गुंडाळत असलेल्या झाडांच्या सालींना काय म्हणत ?
5] महाराष्ट्राच्या वनक्षेञांपैकी बराचसा भाग कोणत्या प्रकारच्या वनांनी व्यापला आहे ?
6] Which is the largest animal on earth ?
7] आपल्या संस्कृतीत कोणत्या फळाला 'श्रीफळ ' म्हणतात ?
8] पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्धीस आलेले भिलार हे गाव सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?
9]कोणत्या वर्षापासून २१ जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होऊ लागला ?
10]कोणत्या तारखेस आपल्याकडे सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान राञ असते ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Friday, June 19, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ५७ वा

प्रश्नमंजुषा भाग ५६ ची उत्तरे

1] विष्णू वामन शिरवाडकर
2] 4 दस्ते
3] कार्बनडायआॕक्साइड
4] मेण
5] जलयुक्त शिवार
6] fireman
7] वसंत
8] सज्जनगड
9] चिमणी
10]केरळ

आजची प्रश्नमंजूषा भाग ५७ वा

1] भांडण या शब्दाला त्याच अर्थाचा कोणता शब्द जोडल्यास अर्थपूर्ण असा जोडशब्द तयार होईल ?
2] पाच सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड किती इंच लांबीचा असेल ?
3] अन्नपचनाची सुरूवात कोणत्या अवयवात सुरु होते ?
4] कोणाच्या आज्ञेवरून रामचंद्रपंत अमात्य यांनी 'आज्ञापञ' हा ग्रंथ लिहिला ?
5] जमिनीखालचे पाणी काही ठिकाणी जमिनीतून बाहेर पडते, या प्रवाहाला आपण कोणत्या नावाने ओळखतो ?
6] which is the first colour in rainbow ?
7] पारशी धर्मियांच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात ?
8] महाराष्ट्राच्या नकाशाप्रमाणे सातारा जिल्हा कोणत्या भागात येतो ?
9] "एकमेका साह्य करू l अवघे धरू सुपंथ ll" या काव्यपंक्ती कोणाच्या ?
10]भारत सरकारच्या आयुष मंञालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सुचविलेल्या औषधाचे नाव काय ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Thursday, June 18, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ५६ वा

प्रश्नमंजुषा भाग ५५ ची उत्तरे

1] सौम्य
2] 25 वर्षांनी
3] कार्बनडायआॕक्साइड
4] फाल्गुन वद्य तुतीया शके १५५१
5] मोराची चिंचोली जि.पुणे
6] कोणे एके काळी
7] रमाकांत आचरेकर
8] कराड
9] सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
10]बंगालच्या उपसागरास

आजची प्रश्नमंजुषा भाग ५६ वा

1] हळूच या हो हळूच या !! --- ही गोड कविता ज्या कवींची आहे त्यांचे पूर्ण नाव सांगा ?
2] एका पेपरमार्टमधून प्रशिकने 96 कागद खरेदी केले तर, त्याने किती दस्ते कागद खरेदी केले ?
3] एखाद्या बंदीस्त ठिकाणी माणसांच्या गर्दीमुळे आपणाला गुदमरल्यासारखे होऊ लागते तेव्हा त्या ठिकाणी कोणत्या वायूचे प्रमाण वाढलेले असते ?
4] शिवकाळात पावसाळ्याच्या दिवसांत गडांवरील तोफा गंजू नयेत, म्हणून तोफांना कोणत्या पदार्थाचा लेप लावला जात असे ?
5] राज्याला कायमस्वरुपी दुष्काळापासून मुक्त करण्यासाठी शासनाने कोणती योजना हाती घेतली आहे ?
6] अग्निशमन दलामध्ये आग विझवण्याचे काम करणा-या अग्निशामकास इंग्रजीत काय म्हणतात ?
7] 'ऋतुराज' असे कोणत्या उपऋतूला संबोधण्यात येते ?
8] सातारा जिल्ह्यात दासनवमीला कोणत्या गडावर लाखो भाविकांची गर्दी उसळते ?
9] मोबाईलमधून निघणाऱ्या लहरींचा परिणाम कोणत्या पक्ष्यावर अधिकतेने झाल्याचे आढळते ?
10]भारतातील कोणत्या राज्यात सर्वप्रथम मोसमी पावसाची सुरुवात होते ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Wednesday, June 17, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ५५ वा

प्रश्नमंजुषा भाग ५४ ची उत्तरे

1] बेढब
2] 48 सेमी
3] सर्दी-खोकला
4] मराठी
5] सासवड जि.पुणे
6] l ( एल् )
7] बंकीमचंद्र चॕटर्जी
8] सांगली
9] प्रवाशांच्या सेवेसाठी
10]1646 मीटर

आजची प्रश्नमंजुषा भाग ५५ वा

1] ' प्रखर ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
2] रौप्यमहोत्सवी सोहळ्यानंतर किती वर्षांनी एका शाळेचा सुवर्णमहोत्सवी सोहळा येईल ?
3] बेसुमार जंगलतोडीमुळे वातावरणातील कोणत्या वायूचे शोषण अपुरे होत आहे ?
4] शिवाजी महाराजांच्या जन्माची जन्मतिथी सांगा ?
5] महाराष्ट्रातल्या कोणत्या गावात मोरांना अभय मिळाले आहे ?
6] 'once upon a time' या इंग्रजी शब्दसमूहाचा मराठी अर्थ सांगा ?
7] मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर या महान क्रिकेटरच्या गुरुंचे नाव काय ?
8] सातारा जिल्ह्यात कोणत्या शहरात लहान विमानतळ तथा धावपट्टी उपलब्ध आहे ?
9] महाराष्ट्र राज्य पोलिस खात्याचे ब्रीदवाक्य कोणते ?
10]महाराष्ट्रातील सर्वात लांब व प्रमुख असणारी नदी शेवटी कोणत्या सागरास जाऊन मिळते ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

आजची प्रश्नमंजुषा भाग ५४ वा

प्रश्नमंजुषा भाग ५३ ची उत्तरे

1] वर्तमानकाळी
2] 16 चौसेमी.
3] खोडाचा
4] सबनीस
5] भारतीय चित्ता
6] centuries
7] डाॕ.एम्.एस्.स्वामिनाथन
8] कराड
9] न्हावाशेवा
10]दादर ( मुंबई )

आजची प्रश्नमंजुषा भाग ५४ वा

1] 'सुबक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
2] एका चौरसाचे क्षेत्रफळ 144 चौसेमी आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती असेल ?
3] अडुळसा या वनस्पतीच्या पानांचा अर्क कोणत्या आजारावर गुणकारी ठरतो ?
4] राज्यकारभारात कोणते शब्द वापरता यावेत, म्हणून शिवरायांनी राज्यव्यवहारकोश हा ग्रंथ तयार केला ?
5] 'अंजीर' या फळासाठी महाराष्ट्रातील कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे ?
6] 'व्हाॕलिबाॕल' या शब्दात कोणते इंग्रजी अक्षर जास्त वेळा येईल ?
7] आपल्या राष्ट्रीय गीताचे गीतकार कोण ?
8] पूर्वीच्या सातारा जिल्ह्याच्या विभाजनातून कोणता जिल्हा निर्माण झाला होता ?
9]महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कोणते ब्रीदवाक्य आपणास एस.टी.वर लिहिलेले आढळते ?
10]महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखराची उंची किती मीटर आहे ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

आजची प्रश्नमंजुषा भाग ५३ वा

प्रश्नमंजुषा भाग ५२ ची उत्तरे

1] मिञ
2] 18 मीटर
3] लॕक्टोज
4] नाईल
5] बेसाॕल्ट
6] mushroom
7] ज्वारी
8] सज्जनगड ता.सातारा
9] औरंगाबाद
10]शिवाजीनगर ता.साक्री, जि.धुळे

आजची प्रश्नमंजुषा भाग ५३ वा

1] जी सत्ये कधीच बदलत नाहीत ती सत्ये दर्शविताना कोणत्या काळाची क्रीयापदे योजतात ?
2] एका चौरसाची एक बाजू 4 सेमी असल्यास त्या चौरसाचे क्षेञफळ किती असेल ?
3] कंद हा वनस्पतीच्या कोणत्या अवयवाचाच एक भाग आहे ?
4] शिवकाळात गडावरील जमाखर्चाचा हिशोब ठेवण्याचे काम किल्ल्यावरील कोणत्या अधिका-याचे असे ?
5] भारतीय वन्य प्राण्यांमधील कोणता हिंंस्ञ प्राणी नामशेष झाला आहे ?
6] Which is the plural form of 'century' ?
7] भारतातील हरितक्रांतीचे जनक म्हणून आपण कोणत्या कृषिशास्ञज्ञाला ओळखतो ?
8] सातारा जिल्ह्यात कल्पना चावला विज्ञान कक्ष कोठे आहे ?
9] महाराष्ट्रातील दोन आंतरराष्ट्रीय बंदरांपैकी एक मुंबई तर दुसरे आंतरराष्ट्रीय बंदर कोणते ?
10]दिक्षाभूमी म्हटलं की नागपूर शहर आठवतं मग चैत्यभूमी म्हटलं की कोणते शहर आठवेल ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

आजची प्रश्नमंजुषा भाग ५२ वा

प्रश्नमंजुषा भाग ५१ ची उत्तरे

1] कमाल
2] 4 ची आठपट
3] पन्हं
4] शहाजीराजांनी
5] कोल्हापूर
6] खेळगडी/खेळातील सवंगडी (playfellow हा शब्द फारसा वापरला जात नाही.)
7] व-हाडी
8] वाई ता.वाई जि.सातारा
9] संगितक्षेञात
10]ब्ल्यू माॕरमाॕन ( राणी पाकोळी )

आजची प्रश्नमंजुषा भाग ५२ वा

1] मानवाला सूर्याची मदत मिळते तसेच अनेकविध प्रकारे उपयोग होतो.त्याच्या या उपयोगितेवरून आपण सूर्याला कोणत्या विशिष्ट नावाने ओळखतो ?
2] एका विहिरीची खोली 30 मीटर आहे.तिचा 3/5 भाग पाण्यात आहे. तर एकूण किती मीटर भाग पाण्याखाली आहे ?
3] दुधामध्ये असणाऱ्या शर्करेचे नाव सांगा ?
4] इजिप्त देशाची संस्कृती कोणत्या नदीच्या काठी बहरास आली ?
5] लेण्या खोदण्यासाठी महाराष्ट्रातील कोणत्या खडकांनी व्यापलेला भाग अतिशय उपयुक्त ठरला आहे ?
6] अळंबी/भूछञ या वनस्पतीला इंग्रजीत कोणत्या नावाने ओळखले जाते ?
7] CSH-4 व SSV-84 ही कोणत्या धान्याच्या सुधारित बियाण्यांची नावे आहेत ?
8] सातारा जिल्ह्यात समर्थ जीवन शिल्पसृष्टी संग्रहालय कोठे आहे ?
9] महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागाला मराठवाडा म्हणून ओळखले जाते ?
10]महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प कोठे आहे ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

आजची प्रश्नमंजुषा भाग ५१ वा

प्रश्नमंजुषा भाग ५० ची उत्तरे

1] दोन
2] 12
3] पान
4] प्रचंडगड
5] सैंधव मीठ
6]wealthy अशाप्रकारचे अनेक शब्द
7] साने गुरुजी
8] प्रतापगड ता.महाबळेश्वर जि.सातारा
9] पश्चिमेस
10] बंगालच्या उपसागरावर

आजची प्रश्नमंजुषा भाग ५१ वा

1] ' किमान ' या शब्दासाठी अचूक असा विरुद्धार्थी शब्द सांगा ?
2] 9 च्या आठपटीतून 5 ची आठपट वजा केल्यास कितीची आठपट प्राप्त होईल ?
3] कैरीपासून तयार होणाऱ्या लोकप्रिय पेयाचे नाव काय ?
4] किल्ले दुर्गम कसे बनवावेत, याचे शिक्षण शिवरायांना कोणाकडून मिळाले होते ?
5] तांबडा-पांढरा मटण रस्सा हा पदार्थ  महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची खासियत आहे ?
6] playground म्हणजे क्रीडांगण तर playfellow म्हणजे काय ?
7] महाराष्ट्रातील विदर्भ भागात बोलली जाणारी मराठी बोलीभाषा कोणती ?
8] आपल्या जिल्ह्यात मराठी विश्वकोश कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
9] दृष्टिहीन रवींद्र जैन हे नाव कोणत्या क्षेञाशी संबंधित आहे ?
10]महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

आजची प्रश्नमंजुषा भाग ५० वा

प्रश्नमंजुषा भाग ४९ ची उत्तरे

1] अष्टपैलू
2]  3
3] ग्रॕफाइट / काळे शिसे / काळा कार्बन
4] पद्मदुर्ग
5] झाडे
6] incorrect
7] गटविकास अधिकारी
8] कंदी पेढा
9] अस्तंभा
10] रायगड

आजची प्रश्नमंजुषा भाग ५० वा

1] 'हवा' हा शब्द शब्दांच्या जातीतील किती प्रकारांत वापरता येईल ?
2] 6 चा 16 वा विभाज्य हा कोणत्या संख्येचा 8 वा विभाज्य आहे ?
3] कोरफड गर त्या वनस्पतीच्या कोणत्या अवयवात असतो ?
4] छञपती शिवरायांनी कोणत्या गडाचे नामकरण तोरणा असे केले ?
5] भूगर्भात सापडणा-या काळ्या मीठाला कोणत्या नावाने ओळखले जाते ?
6] Tell the rhyming word for the word 'healthy'.
7] बलसागर भारत होवो l विश्वात शोभुनी राहो ll या काव्यपंक्ती कोणाच्या ?
8] दरवर्षी शिवप्रताप दिन कोणत्या गडावर साजरा केला जातो ?
9] छत्तीसगढ राज्याच्या कोणत्या दिशेला आपला महाराष्ट्र आहे ?
10] मे 2020 मध्ये आलेले अम्फान हे चक्रीवादळ कोणत्या सागरावर निर्माण झाले होते ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

आजची प्रश्नमंजुषा भाग ४९ वा

प्रश्नमंजुषा भाग ४८ ची उत्तरे
1] दोन
2] 11
3] बर्फाचा
4] राजगडावर
5] चांद्रकालगणना
6] mare
7] तुळस
8] कास तलाव
9] रीश्टर स्केल
10] तेलंगणा


आजची प्रश्नमंजुषा भाग ४९ वा

1] अनेक विषयांत तरबेज असणा-या व्यक्तीसाठी कोणते विशेषण वापरणे योग्य ठरेल ?
2] एका संख्येला 9 ने गुणण्याऐवजी 7 ने गुणले तेव्हा गुणाकार 6 ने कमी आला तर ती संख्या कोणती ?
3] शिसपेन्सीलमध्ये लेखन करण्यासाठी जो पदार्थ वापरलेला असतो त्या पदार्थाचे नाव काय ?
4] शिवरायांनी कोकणात जंजि-याजवळ भरसमुद्रात कोणता जलदुर्ग उभारला ?
5] हवेतील गारवा, आद्रर्ता आणि प्राणवायू यांचे प्रमाण निसर्गातील कोणत्या घटकावर अवलंबून असते ?
6] which  is the opposite word for the word  'correct' ?
7] पंचायत समितीतील  प्रमुख अधिका-याचे पद कोणते  ?
8] साता-याची खासियत म्हणून सुप्रसिद्ध असलेला मिठाईतील पदार्थ कोणता ?
9] सातपुडा पर्वतावरील सर्वात उंच ठिकाण कोणते ?
10] निसर्ग चक्रीवादळाने सर्वाधिक नुकसान झालेला  कोकणातील जिल्हा कोणता ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

आजची प्रश्नमंजुषा भाग ४८ वा

प्रश्नमंजुषा भाग ४७ ची उत्तरे

1] हुतात्मा
2] 11
3] तीन
4] १ मे १९६०
5] पूर्व
6] Penguin
7] किरी करवंदे
8] पाच
9] टी.एम.सी
10] स्वर्गिय यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग

आजची प्रश्नमंजुषा भाग ४८ वा

1] वरण या शब्दातील अक्षरांपासून दोन अक्षरी अर्थपूर्ण असे किती शब्द तयार होतील ?
2]मे महिन्यातील तारखा पाहिल्यास आपल्याला किती मूळसंख्या तारखांच्या रुपात दिसतील ?
3] जास्त तापमानात खराब होणाऱ्या वस्तू किंवा पदार्थ साठवण्यासाठी व टिकविण्यासाठी कोणत्या पदार्थाचा उपयोग होतो ?
4] शिवरायांच्या स्वराज्यातील कोणत्या गडावर आपणाला पाली दरवाजा पहावयास मिळतो ?
5] इस्लाम दिनदर्शिकेत कोणत्या कालगणना पद्धतीचा वापर केला जातो ?
6] which is the opposite gender name of  horse ?
7] आपल्या संस्कृतीत पविञ मानली जाणारी झुडुप वर्गातील वनस्पती कोणती ?
8] सातारा जिल्ह्यातील कोणता तलाव हा उरमोडी नदीचे उगमस्थान आहे ?
9] भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजली जाते ?
10]भारताचे २९ वे राज्य म्हणून कोणत्या राज्याची निर्मिती झाली आहे ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Tuesday, June 9, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ४७ वा

प्रश्नमंजुषा भाग ४६ ची उत्तरे

1] आत्माराम रावजी देशपांडे
2] 36 मीटर
3] लुई लिकी
4] 11 भूरुपे
5] दिवस
6] 206
7] वटपौर्णिमा
8] चाफळ ता.पाटण जि.सातारा
9] पाच
10]नारळ


आजची प्रश्नमंजुषा भाग ४७ वा

1] देशासाठी बलिदान देणाऱ्या व्यक्तीस काय म्हणतात ?
2] एक संख्या 11 वेळा घेऊन बेरीज केली तेव्हा बेरीज 121 आली तर ती संख्या कोणती ?
3] फुलपाखरांना पायाच्या किती जोड्या असतात ?
4] महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या दिवशी व किती साली झाली ?
5] नकाशा वाचण्यापूर्वी नकाशातील पूर्व दिशा ही परिसरातील कोणत्या दिशेशी जोडून घ्यावी लागते ?
6] Which bird cannot fly  but it can swim easily in the ocean ?
7] कोणत्या जातीची करवंदे पिकून गोडसर झाली तरी रंगाने हिरवीच राहतात ?
8] सातारा जिल्ह्याला किती जिल्ह्याच्या सीमा स्पर्श करतात ?
9] धरणातील पाणीसाठा कोणत्या एककात मोजतात ?
10]मुंबई-पुणे दरम्यान असणाऱ्या द्रुतगती मार्गाचे ( express way ) चे नाव काय ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

आजची प्रश्नमंजुषा भाग ४६ वा

प्रश्नमंजुषा भाग ४५ ची उत्तरे

1] सुगम
2] 5
3] संघनन
4] होमो
5] जम्मू आणि काश्मीर
6] a bunch of grapes
7] राजस्थान
8] उष्ण व कोरडे
9] Compressed Natural Gas.
10]ग्रामगीता

आजची प्रश्नमंजुषा भाग ४६ वा

1] कवी अनिल यांचे पूर्ण नाव काय ?
2] एका समभुज चौकोनाची परिमिती 144 मीटर आहे तर त्या समभुज चौकोनाची बाजू किती लांबीची असेल ?
3] कुशल मानवाच्या अस्तित्वाचा शोध कोणत्या शास्ञज्ञाने लावला ?
4] पृथ्वीतलावर किती प्रकारची भूरुपे आपणाला पहावयास मिळतात ?
5] पृथ्वीच्या परिवलनाचा एक सूर्योदय ते पुढचा सूर्योदय या कालावधीला काय म्हणतात ?
6] How many bones are there in human body ?
7] ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेदिवशी आपल्या संस्कृतीतील कोणता सण साजरा केला जातो ?
8] छञपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांची भेट आपल्या जिल्ह्यात प्रथम कोठे झाली ?
9] महाराष्ट्रातील ' राष्ट्रीय उद्यान ' असा दर्जा मिळालेल्या अरण्यांची संख्या किती ?
10] आपला राज्यवृक्ष म्हणून जसा आंबा आपल्याला परिचित आहे तसे कल्पवृक्ष म्हणून आपण कोणत्या झाडाला ओळखतो ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

आजची प्रश्नमंजुषा भाग ४५ वा

प्रश्नमंजुषा भाग ४४ ची उत्तरे

1] सुकाळ
2] 36
3] नॕप्थेलिन
4] गंगापूर
5] उत्तर आशियातील सायबेरियामधून
6] wrost
7] बेंदूर
8] खटाव
9] बंगालच्या उपसागरास
10] अजिंठा-वेरुळ


आजची प्रश्नमंजुषा भाग ४५ वा

1] दुर्गम या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द सांगा ?
2] 1 पासून 9 पर्यंतच्या संख्यांची सरासरी किती ?
3] बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रुपांतरण होण्याच्या क्रियेला शास्ञीय भाषेत काय म्हणतात ?
4] लॕटिन भाषेतील कोणत्या शब्दाचा अर्थ मानव असा होतो ?
5] आपल्या राज्यात केशर हा पदार्थ कोठून आयात करावा लागतो ?
6] द्राक्षांचा घडाला इंग्रजीत काय म्हणाल ?
7]भारतीय महावाळवंट प्रामुख्याने ज्या राज्यात येते ते राज्य कोणते ?
8] सातारा जिल्ह्याचे हवामान कसे आहे ?
9] CNG चे विस्तारित रुप कोणते ?
10] राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कोणत्या ग्रंथातून स्वच्छतेचे महत्त्व प्रतिपादन केले आहे ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

आजची प्रश्नमंजुषा भाग ४४ वा

प्रश्नमंजुषा भाग ४३ ची उत्तरे

1] संयोगचिन्ह
2] 35.75 रु.
3] तंतुमय पदार्थ
4] मध्याश्मयुगात
5] पावसाळ्यानंतर
6] Saturday
7] ग्रीष्म ऋतू
8] माहुली ता.जि.सातारा
9] पालघर
10] निसर्ग चक्रीवादळ

आजची प्रश्नमंजुषा भाग ४४ वा

1] दुष्काळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
2] एका वर्गातील एक तृतियांश विद्यार्थ्यांची संख्या 12 असेल तर वर्गात एकूण किती विद्यार्थी असतील ?
3] डांबरगोळ्यांमध्ये कोणते रसायन असते ?
4] महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिकजवळचे कोणते स्थळ प्रसिद्ध आहे ?
5] मायणी पक्षीअभयारण्यात येणारे रोहित पक्षी कोणत्या प्रदेशातून स्थलांतर करुन येतात ?
6] bad या शब्दाचे तिसरे रुप कोणते ?
7] बैलपोळा या सणास महाराष्ट्रातील काही भागात दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ?
8] सातारा जिल्ह्यातील मायणी पक्षी अभयारण्य कोणत्या तालुक्यात येते ?
9] महाबळेश्वर येथे उगम पावणारी कृष्णा नदी शेवटी कोणत्या सागरास जावून मिळते ?
10] महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध लेणी कोणती ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Friday, June 5, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ४३ वा

प्रश्नमंजुषा भाग ४२ ची उत्तरे

1] धुपारे
2] २४
3] अवकाळी पाऊस
4] संत नामदेव
5] अणुशक्तीचा
6] traffic signal
7] पल्स पोलिओ निर्मूलन मोहिम
8] माहुली
9] नैऋत्य
10]आंबा


आजची प्रश्नमंजुषा भाग ४३ वा

1] 'विद्यार्थी-प्रतिनिधी' हा शब्द लिहिताना दोन शब्दांमध्ये कोणते विरामचिन्ह वापरावे लागेल ?
2] एक टन साखरेची किंमत 35750 रुपये असेल तर एक किलो साखरेची किंमत किती असेल ?
3] केसर आंब्यातील धागे हे कर्बोदकांच्या कोणत्या प्रकारात मोडतात ?
4] अश्मयुगातील कोणत्या कालखंडात पृथ्वीवरील हवामान उबदार होऊ लागले होते ?
5] जलव्यवस्थापनाचा उपयोग कोणत्या ऋतूनंतर करता येईल ?
6] which is the last day in the weekend ?
7] ज्येष्ठ व आषाढ या दोन महिन्यांमध्ये कोणता उपऋतू असतो ?
8] सातारा जिल्ह्यात वेण्णा व कृष्णा नद्यांचा संगम कोठे झाला आहे ?
9] कोकण किनारपट्टीचे उत्तरेकडून दक्षिणेकडे असे निरीक्षण करत खाली आल्यास कोणता जिल्हा सर्वप्रथम दृष्टीक्षेपात येतो ?
10]महाराष्ट्र किनारपट्टीवर नुकतेच धडकलेल्या चक्रीवादळाचे नाव काय ?

श्री नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Thursday, June 4, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ४२ वा

प्रश्नमंजुषा भाग ४१ ची उत्तरे

1] बेट
2] 1
3] आदिमूळ
4] लीळाचरिञ
5] सामुद्रधुनी
6] जवळच
7] 2 माध्यमातून
8] चार
9] उल्कापात
10]पाच

आजची प्रश्नमंजुषा भाग ४२ वा

1] अंगारे या शब्दाला जोडून येणारा जोडशब्द कोणता ?
2] दोन संख्यांची बेरीज 40 आहे व त्याच दोन संख्यांची वजाबाकी 8 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती ?
3] पाऊस पडण्याचा ठरावीक काळ सोडून इतर वेळी पडणा-या पावसास आपण काय म्हणतो ?
4] महाराष्ट्रातील कोणत्या संतांची पदे 'गुरुग्रंथसाहिब ' या शीख धर्मग्रंथात पहावायास मिळतात ?
5] महाराष्ट्रातील वीजनिर्मितीमध्ये कोणत्या शक्तीचा वापर अतिशय मर्यादित स्वरुपात आहे ?
6] रस्त्यावरील वाहतुकीला इशारा देण्यासाठी लावलेल्या  दिव्यांना इंंग्रजीत काय म्हणतात ?
7] ' दो बूँद जिंदगी के ' हे वाक्य कोणत्या मोहिमेसंदर्भातील आहे ?
8] पेशवेकालीन न्यायाधीश रामशास्ञी प्रभुणे यांचे सातारा जिल्ह्यातील जन्मगाव कोणते ?
9] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती पूर्व भागाबरोबर आणखी कोणत्या भागात एकवटलेली आहे ?
10]महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

आजची प्रश्नमंजुषा भाग ४१ वा

प्रश्नमंजुषा भाग ४० ची उत्तरे

1] मोहर
2] 50 बाटल्या
3] खेचर
4] मिर्झाराजे जयसिंग
5] दोन
6] ripe
7] 5 जून
8] परळी किल्ला
9] खातगूण ता.खटाव
10]नागपूर

आजची प्रश्नमंजुषा भाग ४१ वा


1] द्वीप म्हणजे काय ?
2] म आणि क असे दोन बिंदू एकमेकांपासून 6 सेमी अंतरावर आहेत. या दोन्ही बिंदूतून जाणाऱ्या किती रेषा काढता येतील ?
3] सोटमूळाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात ?
4] श्रीचक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे कोणता ग्रंथ ?
5] दोन सागरांना जोडणा-या सागरी जलाच्या अरुंद भागास काय म्हणतात ?
6] A mouse was playing nearby. -- या वाक्यातील nearby या शब्दाचा अर्थ काय ?
7] कावीळ हा संसर्गजन्य रोग किती माध्यमांतून पसरू शकतो ?
8] सातारा जिल्ह्याचे प्राकृतिक रचनेनुसार एकूण किती भाग पडतात ?
9] प्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या भौगोलिक कारणामुळे निर्माण झाले आहे ?
10]आपल्या देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी किती ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा

आजची प्रश्नमंजुषा भाग ४० वा

प्रश्नमंजुषा भाग ३९ ची उत्तरे

1] पालवी
2] CL
3] काजू
4] राजगडावर
5] आधुनिक शेती
6] coconut shell
7] होळी
8] सातारा
9] सिंधुदुर्ग
10]खाद्य पदार्थांची गुणवत्ता


आजची प्रश्नमंजुषा भाग ४० वा

1] आंबा या वनस्पतीच्या फुलो-याला काय म्हणतात ?
2] यंञाच्या मदतीने एका बाटलीत सरबत भरुन ती बंद करण्यास 6 मिनिटे वेळ लागतो,तर अशा किती बाटल्या 5 तासांत भरुन होतील ?
3] पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना जलचर म्हणतात तर, हवेत उडणा-या प्राण्यांना काय म्हणतात ?
4] कोंढाण्यावर किल्लेदार म्हणून असलेल्या उदेभानची किल्लेदार म्हणून नेमणूक कोणी केली होती ?
5] संञे या फळाचे वर्षभरात किती बहर येतात ?
6] Which is the opposite word for the word 'raw' ?
7] जागतिक पर्यावरण दिन कोणत्या तारखेस व कोणत्या महिन्यात साजरा केला जातो ?
8]सज्जनगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते ?
9] सातारा जिल्ह्यातील हिंदू - मुस्लिम ऐक्याचा उरुस जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी भरतो ?
10]भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शवणारे झीरो माइल हे स्थान महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा

आजची प्रश्नमंजुषा भाग ३९ वा

प्रश्नमंजुषा भाग ३८ ची उत्तरे

1] चार
2] 138
3] रुई या वनस्पतीच्या पानावर
4] गिरीदुर्ग
5] ठाणे
6] बक्षिस / पारितोषिक
7] कटगुण ता.खटाव जि.सातारा
8] सातारा
9] चिकू
10]ताम्हण

आजची प्रश्नमंजुषा भाग ३९ वा.

1] झाडांना येणाऱ्या नविन कोवळ्या पानांना काय म्हणतात ?
2] 150 ही संख्या रोमन अंकात कशी लिहावी लागेल ?
3] फळाच्या बाहेर बी असणारे फळ कोणते ?
4] आग्रा येथील सुटकेनंतर शिवराय महाराष्ट्रातील कोणत्या गडावर सुखरूप पोहोचले ?
5] विज्ञान व तंञज्ञानाचा वापर करुन करण्यात येणाऱ्या शेतीस कोणती शेती म्हणतात ?
6] इंग्रजीत नारळाला coconut म्हणतात, तर नारळाच्या करवंटीला काय म्हणावे लागेल ?
7] कोकणात गणेशोत्सवाबरोबर आणखी कोणता सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो ?
8] संपूर्ण महाराष्ट्रात सांगली जिल्ह्याबरोबर हळद व आल्याचे सर्वाधिक उत्पादन घेणारा दुसरा जिल्हा कोणता ?
9] महाराष्ट्रातील एकमेव सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्याच्या किनारपट्टीला आहे ?
10]एग्मार्क हे प्रमाणपञ कशाची गुणवत्ता दाखवते ?

नितीन आत्माराम जाधव
विषयशिक्षक
जि.प.शाळा, आपटी ता.जावली जि.सातारा