Friday, July 31, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र.९९

प्रश्नमंजुषा भाग ९८ ची उत्तरे
1] वाहवा
2] 8 दशक
3] मृग नक्षञाचा
4] पायदळाचा
5] दक्षिण भागात
6] Mechanic
7] सकपाळ
8] चाफळ जि.सातारा
9] उर्दू कवी मंहमद इक्बाल
10] राफेल

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र.९९
1] ' अग्गोबाई ढग्गोबाई ' हे मनोरंजक बालगीत कोणी लिहिले आहे ?
2] लांबी,रुंदी आणि उंची असलेल्या वस्तूंना भौमितिक  भाषेत काय म्हणतात ?
3] ' अँटीरेबीज लस ' शोधणारा शास्ञज्ञ कोण ?
4] राष्ट्रध्वजावरील कोणता रंग त्यागाचे प्रतीक आहे ?
5] महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील नदी कोणती ?
6] चिञाक्षरलिपीच्या आलेखास किंवा तक्त्यास इंग्रजीत काय म्हणतात  ?
7] ' महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती ' ची स्थापना कोणी केली ?
8] जिब्राल्टरची सामुद्रधुनी वडिलांसोबत पोहून पार करणारी सातारची सागरकन्या कोण ?
9] महाराष्ट्रात मीग विमान निर्मिती कोठे होते ?
10] ' तालुका दंडाधिकारी ' म्हणून काम पाहणारा अधिकारी कोण ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob .9922777064

Thursday, July 30, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र. ९८

प्रश्नमंजुषा भाग ९७ ची उत्तरे
1] भव्यता
2] 15
3] साल्क
4] हेन्री आॕक्झिंडेन
5] चिखलदरा
6] love
7] कर्मवीर भाऊराव पाटील
8] कराड जि.सातारा
9] डोंग [ राज्य - अरुणाचल प्रदेश ]
10] पुणे - सोलापूर

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र. ९८
1] ' वा ' या अक्षराने सुरुवात व शेवट होणारा प्रसंशादर्शक शब्द कोणता ?
2] 43 दशकातून 10 एकक वजा करुन त्यात किती दशक मिळविले असता उत्तर 5 शतक येईल ?
3] कोणत्या नक्षञात पडलेल्या पावसामुळे तापलेल्या जमिनीचा वाफसा होण्यास मदत होते ?
4] शिवरायांच्या कोणत्या दलात नूर बेग हा एक प्रमुख सेनानी होता ?
5] भारताचे स्थान आशिया खंडाच्या कोणत्या भागात आहे ?
6] Who repairs things by spanner and screwdriver ?
7] डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ आडनाव काय होते ?
8] मराठी कवी 'यशवंत' यांचे जन्मगाव कोणते ?
9] ' सारे जहाँ से अच्छा..' या गीताचे गीतकार कोण ?
10] प्रत्येक मोहिमेवर पाठवले जाऊ शकते असे कोणते लढाऊ विमान भारतीय वायुदलात नुकतेच दाखल झाले आहे ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob .9922777064

Wednesday, July 29, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र. ९७

प्रश्नमंजुषा भाग ९६ ची उत्तरे
1] हसू
2] 6
3] सूक्ष्मदर्शी
4] रायगडावर
5] पोफळीचे झाड
6] buck
7] १९ फेब्रुवारी
8] माण
9] मुरलीधर देवीदास आमटे
10] यमुना नदीवर

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र.९७
1] ' भव्य ' या शब्दापासून गुण दाखवणारे कोणते नाम तयार करता येईल ?
2] एका संख्येतून 8 वजा करुन त्याला 4 ने गुणल्यास गुणाकार 28 येतो.तर ती संख्या कोणती ?
3] पोलिओ या रोगाची लस कोणी शोधून काढली ?
4] शिवराज्याभिषेकास उपस्थित असलेल्या इंग्रज वकीलाचे नाव काय ?
5] विदर्भातील एकमेव गिरिस्थान कोणते ?
6] Which is the opposite word for ' hate ' ?
7] ' कमवा आणि शिका ' ही संकल्पना कोणाची ?
8] ' MH 50 ' हा वाहन नोंदनी क्रमांक सातारा जिल्ह्यातील कोणत्या परिवहन कार्यालयाचा आहे ?
9] भारतात सर्वप्रथम सूर्योदय होणारे गाव कोणते ?
10] राज्यातील ' संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग ' म्हणून कोणता मार्ग ओळखला जातो ?
नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Tuesday, July 28, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र.९६

प्रश्नमंजुषा भाग ९५ ची उत्तरे
1] अभ्राच्छादित
2] 12600 ने
3] ' ड ' जीवनसत्त्व
4] संत तुकाराम
5] भुईकोट किल्ला
6] badminton
7] पाचव्या
8] पुणे
9] आग्रेस ग्रोझा कॕश्युस
10] वाशिष्ठी नदीत

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र.९६
1] ' रडू ' या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता ?
2] एका संख्येच्या निमपटीची तिप्पट 9 आहे , तर ती संख्या कोणती ?
3] अतिसूक्ष्म कणांचा अभ्यास करण्यासाठी प्रयोगशाळेत कोणते उपकरण वापरतात ?
4] ऐतिहासिक हिरकणी बुरूज कोणत्या गडावर आहे ?
5] कोकणात सुपारीच्या झाडाला काय म्हणतात ?
6] what is called the young on of rabbit ?
7] ग्रेगरीयन वर्षाप्रमाणे शिवजयंती कोणत्या तारखेस येते ?
8] सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील मृदा तुलनात्मक दृष्ट्या निकृष्ट आहे ?
9] थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय ?
10] दिल्ली शहर कोणत्या नदीवर वसले आहे ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षिका ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Monday, July 27, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र. ९५

प्रश्नमंजुषा भाग ९४ ची उत्तरे
1] अनुज
2] 13
3] त्वचेमार्फत
4] शिवराई
5] दोन
6] She'd
7] आदिवासी बांधव [ वारली ]
8] शिवपुञ छञपती राजाराम महाराज
9] पालघर
10] चिखलदरा

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र. ९५
1] ' निरभ्र ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
2] जयवंतने 14,014 ही संख्या लिहिताना 0 लिहिला नाही तर त्याची संख्या कितीने चुकली ?
3] कोवळ्या सूर्यप्रकाशातून आपणाला कोणते जीवनसत्त्व मिळते ?
4] शिवराय कोणत्या संतांच्या किर्तनाला जात असत ? 
5] शनिवारवाडा हा किल्ला कोणत्या किल्ले प्रकारात येईल ?
6] Which game requires a shuttlecock for playing ?
7] कितव्या सौर महिन्यात आपणाला ऊन-पावसाचा खेळ पहावयास मिळतो ?
8] सातारा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?
9] भारतरत्न आणि नोबेल शांतता पुरस्कार सन्मानित मदर तेरेसा यांचे संपूर्ण नाव काय ?
10] कोयना जलविद्युत प्रकल्पाचे पाणी कोणत्या नदीत सोडले जाते ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Sunday, July 26, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र.९४

प्रश्नमंजुषा भाग ९३ ची उत्तरे
1] अंकुश
2] 1
3] पळस
4] शेलारमामांनी
5] खारफुटी वने
6] valley
7] बत्तीस शिराळे
8] पश्चिम भाग
9] विष्णू वामन शिरवाडकर
10] महाराजा सयाजीराव गायकवाड

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र.९४
1] आधी जन्मलेला अग्रज तर नंतर जन्मलेला कोण ?
2] 1ते100 पर्यंत एकूण किती ञिकोणी संख्या आहेत ?
3] शीतकाल समाधीत बेडूक कोणत्या इंद्रियामार्फत श्वसन करतात ?
4] शिवरायांनी निर्मिलेल्या पहिल्या नाण्याचे नाव काय ?
5] राज्यातील किती जिल्हे पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतात ?
6] Tell the correct contracted form of 'She would' ?
7] वारली चिञकला कोणत्या समाजबांधवांच्या संस्कृतीचे प्रतीक आहे ?
8] कोणत्या राजाच्या कारकिर्दीत प्रथमच साता-यास मराठेशाहीच्या राजधानीचे स्थान लाभले ?
9] राज्यात कोणत्या जिल्ह्यातील घोलवडचे चिकू प्रसिध्द आहेत ?
10] महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी काॕफीचे मळे आढळतात ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावाली जि.सातारा
Mob. 9922777064

Saturday, July 25, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र.९३

प्रश्नमंजुषा भाग क्रमांक ९२ ची उत्तरे
1] मोहोळ
2] 30 %
3] आॕक्सीमीटर
4] पंताजी गोपीनाथ
5] आॕक्टोबर
6] tasty
7] वैशाख
8] शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज यांनी
9] आंबट
10] आंबेसरी

आजची प्रश्नमंजुषा भाग क्रमांक ९३
1] माहूत आपल्या हाती कोणते साधन घेऊन हत्तीला ताब्यात ठेवतो ?
2] कोणती संख्या लहानात लहान ' मोजसंख्या ' आहे ?
3] कोणत्या झाडाला तीन पानांच्या समूहातच पाने असतात ?
4] शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंञण कोणी दिले ?
5] खाड्यांच्या भागात कोणती वने आढळतात ?
6] What is called the space between two mountains ?
7] सांगली जिल्ह्यातील कोणत्या गावचा नागपंचमी उत्सव ख्यातीप्राप्त आहे ?
8] सातारा जिल्ह्याचा कोणता भाग वनाच्छादित आहे ?
9] कोणत्या साहित्यिकाचा जन्मदिन ' जागतिक मराठी दिन ' म्हणून साजरा केला जातो ?
10] जोतिबा फुले यांना 'महात्मा' ही पदवी कोणी दिली ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Friday, July 24, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र.९२

प्रश्नमंजुषा भाग ९१ ची उत्तरे
1] मोठा भाऊ [ आधी जन्मलेला  ]
2] 49
3] प्लॕटिनम
4] १६६५ साली
5] कोकण
6] Exam
7] बालकवी
8] २०१२ साली
9] महाराष्ट्रात
10] काझिरंगा [ आसाम राज्य  ]

आजची प्रश्नमंजुषा भाग क्रमांक ९२
1] मधमाश्यांच्या पोळ्याला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते ?
2] भावनाने 40 झाडांपैकी 28 झाडांना पाणी दिले ; तर किती टक्के झाडे पाण्यावाचून राहिलीत ?
3] मानवी शरीरातील आॕक्सिजनचे प्रमाण मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?
4] अफजलखान भेटीवेळी शिवरायांचे कोणते वकील त्यांच्याबरोबर होते ?
5] ग्रेगरीयन वर्षातील कोणता महिना संक्रमण महिना म्हणून ओळखला जातो ?
6] What is the meaning of delicious ? 
7] बुद्धपौर्णिमा कोणत्या सौर महिन्यात येते ?
8] सातारा जिल्ह्यातील 'अजिंक्यतारा ' हा किल्ला कोणी बांधला ?
9] रोगप्रतिकारक शक्ती वाढविणा-या 'सी' व्हिटॕमिनच्या गोळ्यांची चव कशी असते ?
10] कोकणात उन्हाळ्यात आंब्याच्या मोसमात पडणाऱ्या पावसास काय म्हणतात ?

Thursday, July 23, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग क्र. ९१

प्रश्नमंजुषा भाग ९० ची उत्तरे
1] अविनाशी
2] ९ वर
3] हरितलवक / हिरवेकण
4] ग्रामसेवक
5] मुंबई
6] 52 weeks
7] नागपंचमी
8] महाबळेश्वर
9] तिरंगा
10] सुभाषचंद्र बोस

आजची प्रश्नमंजुषा भाग ९१ वा
1] अग्रज म्हणजे काय ?
2] 1 ते 50 संख्यालेखनात येणारी सर्वात मोठी वर्गसंख्या कोणती ?
3] सर्वात महाग धातू कोणता ?
4] इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तह' किती साली झाला ?
5] वर्षभर सम व दमट हवामान आढळणारा प्राकृतिक विभाग कोणता ?
6] which is the short form of 'Examination' ?
7] "श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे" असे श्रावण सौंदर्याचे वर्णन करणारा कवी कोण ?
8] किती साली कास पठाराचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केला गेला ?
9] 'खो-खो' खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला ?
10] एकशिंगी गेंड्यांसाठी जगात प्रसिद्ध असणारे भारतातील ठिकाण कोणते ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Wednesday, July 22, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ९० वा

प्रश्नमंजुषा भाग ८९ ची उत्तरे
1] अवर्णनीय
2] ९८७
3] कडू
4] संत नामदेव
5] गोदावरी
6] downwards
7] मोदक
8] चांदोली
9] खटारा
10] पंडिता रमाबाई

आजची प्रश्नमंजुषा भाग ९० वा
1] नाशवंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
2] घड्याळात २१:०० वाजता तासकाटा कितीवर असतो ?
3] वनस्पतीतील कोणत्या घटकामुळे पाने हिरवी दिसतात ?
4] ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ?
5] भारतातील आर्थिक घडामोडींचे महत्त्वाचे केंद्र बनलेले शहर कोणते ?
6] How many weeks are in a year ?
7] ' झोकापंचमी ' म्हणजेच कोणता सण ?
8] सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील मधुमक्षिकापालन हा उद्योग महत्त्वाचा आहे ?
9] आपल्या राष्ट्रध्वजाचे नाव काय ?
10] 'तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूँगा' ही घोषणा कोणाची ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Tuesday, July 21, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ८९ वा

प्रश्नमंजुषा भाग ८८ ची उत्तरे
1] अपकर्ष
2] 9900
3] अॕल्युमिनिअम
4] १२ अंकी
5] १० वर्षांनी
6] on 14 th November
7] केशवकुमार
8] शिंदोला
9] टिलीमिली
10] श्रीहरीकोटा [ आंध्रप्रदेश ]

आजची प्रश्नमंजुषा भाग ८९ वा
1] ' वर्णन करता येणार नाही असे ' या शब्दसमूहासाठी एक शब्द सांगा ?
2] एक अंक एकेकदाच वापरून तयार होणारी सर्वांत मोठी ३ अंकी संख्या कोणती ?
3] साखरेत घोळल्यामुळे कारल्याची चव कशी लागेल ?
4] नरसी गावचे राहणारे संत कोण ?
5] नाशिक हे शहर कोणत्या नदीतीरावर आहे ?
6] In which direction raindrops falls ?
7] गणेशचतुर्थीला कोणत्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवतात ?
8] सातारा जिल्ह्यात काही भागात पसरलेले राष्ट्रीय उद्यान कोणते ?
9] एकच बैल जुंपलेल्या गाडीला काय म्हणतात ?
10] ' पंडिता ' या नावाने ओळखली जाणारी महाराष्ट्रातील एकमेव स्ञी कोणती ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Monday, July 20, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ८८ वा

प्रश्नमंजुषा भाग ८७ ची उत्तरे
1] अडचणीची स्थिती
2] शिरोबिंदू
3] तेलाची
4] १७६७
5] नांगर
6] oval
7] राष्ट्रसंत तुकाराम महाराज
8] वनकुसवडे जि.सातारा
9] हिरोजी इंदलकर
10] २१ सप्टेंबर

आजची प्रश्नमंजुषा भाग ८८ वा
1] ' उत्कर्ष ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
2] कोणत्या संख्येत एक शतक मिळविल्यास 5 अंकी सर्वात लहान संख्या तयार होईल ?
3] वीजेच्या खांबांवरील तारा कोणत्या धातूच्या असतात ?
4] स्वतःची ओळख असलेल्या आधारकार्डवर किती अंकी नंबर असतो ?
5] जनगणना दर किती वर्षांनी होते ?
6] When do we celebrate Baldin ?
7] श्री.प्रल्हाद केशव अञे हे कोणत्या नावाने कविता लिहीत ?
8] महाबळेश्वर पठारावरील सर्वात उंच शिखर कोणते ?
9] लाॕकडाऊनच्या काळात इ.१ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर प्रसारीत होणाऱ्या अभ्यासमालेचे नाव काय ?
10] भारतीय उपग्रह अवकाशात सोडण्याचे केंद्र कोठे आहे ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Sunday, July 19, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ८७ वा

प्रश्नमंजुषा भाग ८६ ची उत्तरे
1] कु
2] 6
3] बीजांकुरण
4] प्रभास पाटण [ गुजरात ]
5] पवनउर्जा
6] p
7] संत ज्ञानेश्वर
8] काले ता.कराड  जि.सातारा
9] अग्निबाणाच्या साहाय्याने
10] राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

आजची  प्रश्नमंजुषा भाग ८७ वा
1] ' इकडे आड तिकडे विहीर ' या म्हणीतील ' आड ' आणि ' विहीर ' हे शब्द कोणता अर्थ दर्शवितात ?
2] इष्टिकाचितीच्या कोपऱ्यांना गणिती भाषेत काय म्हणाल ?
3] सरकीपासून मुख्यतः कशाची निर्मिती केली जाते ?
4] ' भारतीय सर्वेक्षण संस्था ' कोणत्या सालापासून कार्यरत आहे ?
5] समुद्र किना-यावर बोटी थांबण्यासाठी, बोटींना दोर बांधून समुद्रात जे साधन टाकले जाते त्यास काय म्हणतात ?
6] which is the shape of an egg ?
7]' खंजरी ' हे वाद्य कोणत्या संतांमुळे प्रसिद्धीस आले ?
8] सातारा जिल्ह्यातील कोणते पठार पवन-विद्युतनिर्मितीसाठी प्रसिद्ध आहे ?
9] रायगड किल्ल्याच्या रचनेचे श्रेय शिवरायांच्या कोणत्या स्वामिनिष्ठ सरदाराला दिले जाते ?
10] कोणता दिवस ' आंतरराष्ट्रीय शांतता दिन ' म्हणून जगभर साजरा केला जातो ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Saturday, July 18, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ८६ वा

प्रश्नमंजुषा भाग ८५ ची उत्तरे
1] कृतज्ञ
2] 45 रु.
3] कुञा या प्राण्यांची झुंड
4] पुणे
5] भूगोल
6] cactus
7] आंब्याची पाने
8] महाबळेश्वर
9] पाच
10] पैठण [ जि.औरंगाबाद ]

आजची प्रश्नमंजुषा भाग ८६ वा
1] 'सुपुञ' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाची सुरुवात कोणत्या उपसर्गाने होईल ?
2] घनाच्या कडांची व पृष्ठभागांची संख्या यांतील फरक किती ?
3] बीयांना कोंब फुटण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?
4] कणाद ऋषींचा जन्म कोठे झाला होता ?
5] शिडाची होडी चालण्यासाठी कोणत्या उर्जेचा उपयोग होतो ?
6] Which is the sixteenth letter of alphabet ?
7] ' पसायदान ' कोणी लिहिले ?
8] रयत शिक्षण संस्थेची पहिली शाळा कोठे सुरु झाली ?
9] कृञिम उपग्रहांचे प्रक्षेपण कशाच्या सहाय्याने केले जाते ?
10] ' या भारतात बंधुभाव नित्य वसू दे | ' ही रचना कोणाची ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावाली जि.सातारा
Mob. 9922777064

Friday, July 17, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ८५ वा

प्रश्नमंजुषा भाग ८४ ची उत्तरे
1] तीन
2] 17
3] कार्बन डायआॕक्साइड
4] तोरणा
5] द्राक्षे
6] breakfast
7] आश्विन शुद्ध दशमी
8] MH 11
9] नागपूर
10] सिंदखेड राजा [ जि. बुलढाणा ]

आजची प्रश्नमंजुषा भाग ८५ वा
1] केलेले उपकार विसरणारा 'कृतघ्न' तर स्मरणारा कोण ?
2] जर 10 सेमी.रेबीनची किंमत 3 रु.असेल तर दिडमीटर रेबीनची किंमत किती ?
3] कच-याच्या ढिगा-यांजवळ कोणत्या मिश्रहारी प्राण्यांची झुंड आपणाला पहावयास मिळते ?
4] स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून सजलेला गड कोणत्या जिल्ह्यात आहे ?
5] 'आकाश निरीक्षण ' हा उपक्रम तुम्ही शिकत असलेल्या कोणत्या विषयाशी संबंधित आहे ?
6] Which thorny desert plant is always green ?
7] सण-समारंभात निर्मिलेल्या फूल तोरणांमध्ये प्रामुख्याने कोणत्या झाडाच्या पानांना स्थान दिले जाते ?
8] बालकवींनी सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणाचे वर्णन ' निसर्गास पडलेले सुंदर स्वप्न ' असे केलेले आहे ?
9] महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची नावे दोन अक्षरी आहेत ?
10] महाराष्ट्रात वृंदावन गार्डन,म्हैसूरच्या धर्तीवर निर्मिलेले उद्यान कोठे आहे ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.फ.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mib. 9922777064

Thursday, July 16, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ८४ वा

प्रश्नमंजुषा भाग ८३ ची उत्तरे
1] आ
2] 10 चौरस
3]श्रावण
4] कोंढाणा
5] चुनखडक
6] The sun
7] नारळीपौर्णिमा
8] महाबळेश्वर 
9] महर्षी धोंडो केशव कर्वे
10] किल्लारी

आजची प्रश्नमंंजुषा भाग ८४ वा
1] ' दबदबा ' या शब्दातील अक्षरांपासून दोन अक्षरी अर्थपूर्ण असे किती शब्द तयार होतील ?
2] 17 च्या दोन अंकी विषम अवयवांची बेरीज किती ?
3] शीतपेय निर्मितीमध्ये कोणता वायू वापरतात ?
4] कानद खो-यात असलेल्या कोणत्या गडावर बुधला माची आहे ?
5] कोणत्या फळापासून आपणाला बेदाणे मिळतात ?
6] Which word we use for ' The first meal in the morning ?' 
7] विजयादशमी हा सण कोणत्या तिथीस येतो ?
8] सातारा जिल्ह्याचा वाहन नोंदनी क्रमांक किती आहे ?
9] महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते ?
10] शिवरायांच्या मातोश्री जिजाई यांचे जन्मस्थान असलेले गाव कोणते ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Wednesday, July 15, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ८३ वा

प्रश्नमंजुषा भाग ८२ ची उत्तरे
1] फिरकी
2] 300
3] वाफेच्या/बाष्पाच्या रुपात
4] मामा-भाचा
5] ' प्रकाश-छाया ' पद्धती
6] sheep
7] शिशिर
8] वजराई
9] तुणतुणे
10] पिंपळ

आजची प्रश्नमंजुषा भाग ८३ वा
1] 'नावड' या शब्दाचा यमक जुळणारा व विरुद्धार्थी असणारा शब्द कोणत्या स्वराने सुरु होईल ?
2] 5 मी.लांब व 2 मी.रुंद आयताकृती जागेचे 1 मी.बाजू असलेले किती चौरस तयार होतील ?
3] कोणत्या सौर महिन्यात इंद्रधनुष्य अनेकदा दिसते ?
4] दादाजी कोंडदेव कोणत्या सुभ्याचे सुभेदार होते ?
5] सिमेंट निर्मितीसाठी कोणते खनिज आवश्यक आहे ?
6] Which is the largest star in the sky ?
7] कोणत्या सणापासून कोळी बांधव मासेमारीला सुरुवात करतात ?
8] सातारा जिल्ह्यात गहू गेरवा संशोधन केंद्र कोठे आहे ?
9] भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत झालेल्या महाराष्ट्रातील कोणत्या थोर समाजसुधारकाने आपले सारे आयुष्य स्ञी शिक्षण व सामाजिक सुधारणांसाठी वेचले ?
10] १९९३ साली भीषण भूकंपामुळे लातूर जिल्ह्यातील कोणत्या गावाची वाताहात झाली होती ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Tuesday, July 14, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ८२ वा

प्रश्नमंजुषा भाग ८१ वा
1] सोमवार
2] चेंडू
3] बेडूक
4] आरमार
5] खजूर
6] four
7] मकरसंक्रांत
8] सज्जनगड ता.जि.सातारा
9] सूर्यफूल
10] १९६२

आजची प्रश्नमंजुषा भाग ८२ वा
1] पतंगाचा दोरा ज्यावर गुंडाळला जातो ते गोलाकार साधन कोणते ?
2] 400 गुणांच्या परीक्षेत आदित्यला 75% गुण मिळाले ; तर एकूण किती गुण मिळाले ?
3] पाऊस कोणत्या रुपात आभाळात जातो ?
4] शायिस्ताखान व औरंगजेब या दोघांमधील नातेसंबंध सांगा ?
5] नकाशा निर्मितीच्या आधुनिक पद्धती विकसित होण्याआधी कोणत्या पद्धतीचा वापर नकाशानिर्मितीसाठी केला जाई ?
6] which furry animal gives us wool ?
7] ऋतुचक्रातील शेवटचा उपऋतू कोणता ?
8] सातारा जिल्ह्यातील कोणता धबधबा तीन टप्प्यात कोसळतो ?
9] कोणत्या वाद्यातून फक्त 'तुण,तुण'असाच ध्वनी निघतो ?
10] भारतरत्न पदकात कोणत्या वृक्षाचे पान प्रतिकृतीत दिसते ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Monday, July 13, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ८१ वा

प्रश्नमंजुषा भाग ८० ची उत्तरे
1] लहान तोंडी मोठा घास
2] २८ दिवसांच्या
3] पोलिओ
4] नवाश्मयुग
5] हिमनग
6] merrily
7] १ जानेवारी [ नूतन ग्रेगरीयन वर्षारंभ ]
8] कोयना जलविद्युत प्रकल्प जि.सातारा
9] गड संरक्षण समिती
10] भारतात

आजची प्रश्नमंजुषा भाग ८१ वा
1] आठवड्यातील कोणत्या वारात चंद्राचा समानार्थी शब्द दडलेला आहे ?
2] कडा व कोपरे नसणारे क्रिकेट खेळामधील खेळसाहित्य कोणते ?
3] मान नसणारा उभयचर प्राणी कोणता ?
4] शिवरायांच्या कोणत्या सैन्यदलात युद्धनौकांचे तांडे असत ? 
5] कोणते फळ वाळवल्यानंतर त्याची खारीक तयार होते ?
6] How many edges does a handkerchief  have ?
7] हिंदू संस्कृतीतील कोणता सण तीथीनुसार येत नाही ?
8] समर्थ रामदास स्वामींचे महानिर्वाण कोणत्या गडावर झाले ?
9] कोणते फूल झाडावर असताना त्याचे तोंड सतत सूर्याकडे वळलेले असते ?
10] किती साली मोर हा पक्षी 'भारताचा राष्ट्रीय पक्षी ' म्हणून घोषित झाला ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob . 9922777064

Sunday, July 12, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ८० वा

प्रश्नमंजुषा भाग ७९ ची उत्तरे
1] यजमान
2] १० ठिकाणी
3] ' अ ' जीवनसत्त्व
4] कोल्हापूर
5] भूस्सखलन
6] curd
7] ठाणे जिल्ह्यातील वारली आदिवासी बांधव
8] अपशिंगे ता.जि.सातारा
9] लोकमान्य टिळक
10] आचार्य विनोबा भावे


आजची प्रश्नमंजुषा भाग ८० वा
1] ' सामान्य माणसाने थोर माणसाला हिताची गोष्ट सांगणे ' या अर्थाची एक म्हण सांगा ?
2] किती दिवसांच्या महिन्यात सर्वच वार चार वेळा येतील ?
3] कोणत्या रोगाची प्रतिबंधक लस तोंडावाटे दिली जाते ?
4] अश्मयुगातील शेवटचा कालखंड कोणता ?
5] समुद्रावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे सुळके म्हणजे काय ?
6] Which another word we can use for the word happily ?
7] ख्रिस्त जन्मोत्सवाची सांगता कोणत्या तारखेस होते ?
8] राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता ?
9] गडांवर पर्यटकांसाठी लावलेले सूचनाफलक कोण प्रदर्शित करते ?
10] जगात सर्वाधिक वाघ कोणत्या देशात आढळतात ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Saturday, July 11, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ७९ वा

प्रश्नमंजुषा भाग ७८ ची उत्तरे
1] धूळपेरणी
2] घनाकृती
3] साखर
4] कबुतर
5] २२ सप्टेंबर
6] toothache
7] मालवणी
8] कराड
9] १९८८ नंतर
10] तपांबरात

आजची प्रश्नमंजुषा भाग ७९ वा
1] ' पाहुणा ' या शब्दासाठी  विरुद्धार्थी शब्द सांगा ?
2] 99 मीटर लांबीच्या तारेचे 11 समान तुकडे करण्यासाठी ती तार किती ठिकाणी कापावी लागेल ?
3] कोणत्या जीवनसत्त्वाच्या सततच्या अभावामुळे रातांधळेपणा येऊ शकतो ?
4] पन्हाळगड व विशाळगड हे दोन्ही गड कोणत्या जिल्ह्यात येतात ?
5] पुणे जिल्ह्यातील माळीण गाव दुर्घटना कोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे झाली ?
6] which another word we also use for yoghurt ?
7] ' कोली भाजी ' हा सण कोणते आदिवासी बांधव साजरा करतात ?
8] लष्कर भरतीत सातारा जिल्ह्यात अग्रेसर असणारे गाव कोणते ?
9] ' गीतारहस्य ' या ग्रंथाचे ग्रंथकार कोण ?
10] भूदान चळवळीचे प्रणेते कोण ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob . 9922777064

Friday, July 10, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ७८ वा

प्रश्नमंजुषा भाग ७७ ची उत्तरे
1] निर्माल्य
2] 30
3] पर्णरंध्रे
4] श्री चक्रधरस्वामी
5] तिथी
6] loaves
7] मकर राशीत
8] धावडशी ता.जि.सातारा
9] प्लेइंग इट माय वे
10] मकरसंक्रांत

आजची प्रश्नमंजुषा भाग ७८ वा
1] पावसापूर्वी केलेल्या पेरणीस काय म्हणतात ?
2] सापसिडीतील ' फासा ' कोणत्या आकाराचा असतो ?
3] कोणता गोड स्फटिकमय पदार्थ ' परिरक्षक पदार्थ ' म्हणूनही वापरतात ?
4] काही शतकांपूर्वी कोणत्या पक्ष्यांचा उपयोग संदेशवहनासाठी केला जाई ?
5] दिवसराञ समान असणारा पावसाळ्यातील दिवस कोणता ?
6] दातदुखीला इंग्रजीत कोणता शब्द वापरला जातो ?
7] कोकणात कोकणी भाषेबरोबरच आणखी कोणती बोलीभाषा प्रचलित आहे ?
8] सातारा जिल्ह्यातील कोणत्या शहरात ' कारगिल विजय दिवस ' साजरा केला जातो ?
9] कोणत्या सालानंतर मतदानाचा हक्क व्यक्तीस १८ वर्षे पूर्ण झाल्यावर देण्यात आला ?
10] सर्व विमाने वातावरणाच्या कोणत्या थरात उडतात ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Thursday, July 9, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ७७ वा

प्रश्नमंजुषा भाग ७६ ची उत्तरे
1] कवडसा
2] 1000
3] लाजाळू
4] छञपती शिवरायांनी
5] वायूप्रदूषण
6] horse cart
7] श्रावण
8] मायणी तलाव
9] मुंबई
10] लाल बहाद्दूर शास्ञी

आजची प्रश्नमंजुषा भाग ७७ वा
1] पूजाविधीत आज वापरलेले पाने, फुले, हार असे साहित्य उद्या कोणत्या नावाने संबोधले जाईल ?
2] 10 सेकंदात एक चिञ छापून होते ; तर पाच मिनिटात किती चिञे छापून होतील ?
3] वनस्पती ज्या छिद्रांच्या सहाय्याने श्वसन करतात, त्यांना काय म्हणतात ?
4] लीळाचरिञात कोणाच्या आठवणी सांगितल्या आहेत ?
5] चांद्रमासातील दिवसांना काय म्हणतात ?
6] Which is the plural form of ' loaf ' ?
7] मकरसंक्रांतीला सूर्याचा कोणत्या राशीत प्रवेश होतो ?
8] ' झाशीची राणी लक्ष्मीबाई ' यांचे सातारा जिल्ह्यातील मूळ गाव कोणते ?
9] सचिन तेंडुलकरच्या आत्मचरिञाचे नाव काय ?
10] ' भूगोलदिन ' कोणत्या सणादिवशी साजरा होतो ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Wednesday, July 8, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ७६ वा

प्रश्नमंजुषा भाग ७५ ची उत्तरे
1] अर्धविराम
2] शून्य
3] पवनचक्की
4] एप वानरापासून
5] 22 मार्च
6] saucer
7] दसरा
8] रायगड
9] शुक्र
10] हिमालय

आजची प्रश्नमंजुषा भाग ७६ वा
1] ' छोट्या जागेतून येणारा सूर्यप्रकाश ' या शब्दसमूहासाठी एक शब्द सांगा ?
2] 0.009 हा अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांकात लिहिल्यास छेद किती असेल ?
3] स्पर्श करताच अंग चोरते असे छोटे झाड कोणते ?
4] ' राज्याभिषेक शक ' या शकाची सुरूवात कोणी केली ?
5] वाहतूकीच्या कोंडीमुळे कोणत्या प्रदूषणात वाढ होते ?
6] घोडागाडीला इंग्रजीत काय म्हणतात ?
7] बहीणभावांच्या पविञ नात्याचे स्मरण करणारा रक्षाबंधनाचा सण कोणत्या मराठी महिन्यातील पौर्णिमेस येतो ?
8] महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात चांद नदीवर ब्रिटिशकालीन धरणामुळे कोणता तलाव निर्माण झाला आहे ?
9] महाराष्ट्रातील कोणते शहर सात बेटांवर वसलेले आहे ?
10] महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी आणखी कोणत्या थोर नेत्याची जयंती असते ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Tuesday, July 7, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ७५ वा

प्रश्नमंजुषा भाग ७४ ची उत्तरे
1] शववाहिका
2] शनिवारी
3] आदिजीव
4] तोरणजाईचे
5] कोकण
6] walks
7] आषाढ
8] पाचगणी
9] कुस्ती
10] अडीच

आजची प्रश्नमंजुषा भाग ७५ वा
1] गड आला पण सिंह गेला. या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरावे लागेल ?
2] 400 ची पाव पट आणि 200 ची निमपट यातील फरक किती ?
3] वा-याच्या मदतीने पाणी उपसण्याचे साधन कोणते ?
4] कोणत्या जातीच्या वानरापासूनव उत्क्रांत होत आदिमानव निर्माण झाला ?
5] उन्हाळ्यातील कोणत्या दिवशी दिवसराञ समान असतात ?
6] ln the pair of words which word comes with 'cup'?
7] सोने म्हणून आपट्याची पाने एकमेकांना दिली जातात तो सण कोणता ?
8] सातारा जिल्ह्याच्या वायव्येस कोणता जिल्हा आहे ?
9] पृथ्वी व बुध यांच्या दरम्यानचा ग्रह कोणता ?
10] भारताच्या उत्तरेकडील सीमा कोणत्या अतिउंच पर्वतरांगेने तयार झाली आहे ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Monday, July 6, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ७४ वा

प्रश्नमंजुषा भाग ७३ ची उत्तरे
1] निवारा
2] 29-2-2024
3] ई-कचरा
4] मिश्रधातू
5] उत्तर-दक्षिण
6] stale
7] सरपंच
8] महाबळेश्वर
9] मासे
10] माळेगाव

आजची प्रश्नमंजुषा भाग ७४ वा
1] रुग्णांना वाहून नेण्यासाठी रुग्णवाहिका असते तर, शहरात मृतांना वाहून नेण्यासाठी काय असते ?
2] 2020 चा स्वातंत्र्यदिन शनिवारी येत आहे तर, याच वर्षीचा शिक्षकदिन कोणत्या वारी येईल ?
3] सजीवांची निर्मिती ज्या अतिसूक्ष्म एकपेशीय सजीवांपासून झाली, त्या जीवांना कोणत्या नावाने ओळखले जाई ?
4] प्रचंडगडावर कोणत्या देवीचे मंदिर आहे ?
5] महाराष्ट्रातील कोणत्या प्राकृतिक विभागात भरपूर पाऊस पडूनही उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते ?
6] ' कासव हळूहळू चालते.' या वाक्यातील क्रीयापदासाठी इंग्रजीतील अचूक शब्दरुप सांगा ?
7] गुरुपौर्णिमा उत्सव कोणत्या मराठी महिन्यात येतो ?
8] अनेक निवासी शाळांमुळे सातारा जिल्ह्यातील कोणते ठिकाण एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले आहे ?
9] महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
10] वाघाची पिल्ले किती वर्षाची झाली की, ती आईपासून स्वतंत्र जगू लागतात ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Sunday, July 5, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ७३ वा

प्रश्नमंजुषा भाग ७२ ची उत्तरे
1] धनीण
2] 60
3] लोणी
4] येशू ख्रिस्त
5] गोवा
6] पवनचक्की
7] जैन धर्मियांचे
8] सातारा जिल्हा
9] N -95
10] १९५० पासून

आजची प्रश्नमंजुषा भाग ७३ वा
1] ' ऊन,वारा,पाऊस यांच्यापासून रक्षण होईल असा आसरा ' या शब्दसमूहासाठी एक शब्द सांगा ?
2] फेब्रुवारी 2024 या महिन्यातील शेवटची पूर्ण तारीख सांगा ?
3] इलेक्ट्रॉनिक वस्तू कधीतरी निरुपयोगी होतात, अशा निरुपयोगी वस्तूंच्या कच-याला काय म्हणतात ?
4] मूळ धातूपेक्षा कोणता धातू जास्त टणक असतो ?
5] महाराष्ट्रातील बहुतांश राष्ट्रीय मार्ग कसे गेलेले आहेत ?
6] Which is the opposite word for the word fresh ?
7] गावचा प्रथम नागरिक कोण असतो ?
8] सातारा जिल्ह्यातील कोणत्या पर्यटन स्थळी पर्यटक अप्रतिम अशा सूर्यास्ताचा अनुभव घेतात ?
9] आॕटर या प्राण्याचे प्रमुख खाद्य कोणते ?
10] नांदेड जिल्ह्यातील कोणत्या गावी घोडे आणि गाढवे यांचा बाजार भरतो ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Saturday, July 4, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ७२ वा

प्रश्नमंजुषा भाग ७१ ची उत्तरे
1] दिंडीनृत्य
2] वर्तुळ
3] रक्तात
4] पंडितराव
5] उंट
6] स्वातंत्र्यदिन
7] बेंदूर / बैलपोळा
8] नायगाव
9] महाराष्ट्र
10] रोहित पक्षी

आजची प्रश्नमंजुषा भाग ७२ वा
1] ' धनी ' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ?
2] तीन क्रमवार सम संख्यांपैकी मधली संख्या 20 आहे ; तर त्या तीन सम संख्यांची बेरीज किती ?
3] कोणत्या दुग्धजन्य पदार्थापासून तूप हा पदार्थ मिळतो ?
4] कोणाच्या स्मरणार्थ इसवी सनाची सुरुवात झाली ?
5] भारतातील सर्वात कमी क्षेञफळ असलेले राज्य कोणते ?
6] wind म्हणजे वारा तर, windmill म्हणजे काय ?
7] पर्युषणपर्व हे कोणत्या धर्मियांचे एक व्रत आहे ?
8] महाराष्ट्रात ' शूरविरांचा जिल्हा ' अशी ओळख असलेला जिल्हा कोणता ?
9] कोरोनाबाधित अथवा संशयित रुग्णांच्या संदर्भातील सेवा देणाऱ्या सर्वांनाच कोणत्या प्रकारचा मास्क वापरणे अत्यावश्यक आहे,त्या मास्कचे नाव सांगा ?
10] गणराज्यदिन कोणत्या सालापासून साजरा होत आहे ?

नितीन आत्माराम जाधव
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Friday, July 3, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ७१ वा

प्रश्नमंजुषा भाग ७० ची उत्तरे
1] वीरबाला
2] आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे
3] सागो
4] बंगाल प्रांतात
5] धरण
6] rectangle
7] औदुंबर
8] कृष्णाकाठची वांगी
9] श्वसन संस्थेशी
10] हिरव्या रंगाचा डबा

आजची प्रश्नमंजुषा भाग ७१ वा
1] वारक-यांच्या नृत्याला काय म्हणतात ?
2] केंद्रबिंदू आपणाला कोणत्या भौमितिक आकृतीत दाखवता येईल ?
3] सलाइन थेट सुईने शरीरातील कोणत्या घटकात सोडले जाते ?
4] अष्टप्रधानमंडळातील न्यायाधीशाबरोबरच आणखी कोणाला युद्धप्रसंग करावे लागत नसत ?
5] कोणत्या प्राण्याला ' वाळवंटातील जहाज ' म्हणतात ?
6] ' Independence day ' म्हणजेच कोणता राष्ट्रीय सण ?
7] कोणता सण बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो ?
8] क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक सातारा जिल्ह्यात कोठे आहे ?
9] भारतातील कोणत्या राज्याची राजभाषा मराठी आहे ?
10] फ्लेमिंगो पक्ष्यांना आपण आणखी कोणत्या नावाने ओळखतो ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Thursday, July 2, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ७० वा

प्रश्नमंजुषा भाग ६९ ची उत्तरे
1] चार
2] तीन वार
3] डोळा
4] तानाजी मालुसरे
5] तांदूळ
6] मूर्ख
7] माॕनिटर
8] लोणंद
9] नायट्रोजन
10] १ मे

आजची प्रश्नमंजुषा भाग ७० वा
1] बालवीर या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ?
2] मोजपट्टीवरील अंक कोणत्या प्रकारच्या संख्याचिन्हांत लिहिलेले असतात ?
3] साबुदाणा कोणत्या वनस्पतीपासून मिळतो ?
4] औरंगजेबाने रागारागाने शायिस्ताखानाची रवानगी कोठे केली ?
5] पाणी साठवण्याच्या नव्या व्यवस्थांपैकी प्रमुख व्यवस्था कोणती ?
6] Which is the shape of your English textbook's cover-page ?
7] कोणत्या वृक्षास 'औदुंबर ' असेही म्हटले जाते ?
8] सातारा जिल्ह्यातील कृष्णाकाठची कोणती फळभाजी राज्यात प्रसिद्ध आहे ?
9] कोव्हिड-19 हा आजार शरीरातील कोणत्या संस्थेची संबंधित आहे ?
10] कचरा व्यवस्थापनात कोणत्या रंगाचा डबा ओला कचरा एकञित करण्यासाठी वापरतात ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064

Wednesday, July 1, 2020

आजची प्रश्नमंजुषा भाग ६९ वा

प्रश्नमंजुषा भाग ६८ ची उत्तरे
1] पाचोळा
2] दुप्पट
3] जलसंजिवनी
4] मालोजीराजे भोसले
5] १५ जानेवारी
6] घाण
7] मार्गशीर्ष
8] कोयना
9] विहार
10] ब्रेल लुई

आजची प्रश्नमंजुषा भाग ६९ वा
1] ' तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे.' या वाक्यातील विधेय भाग किती शब्दांचा आहे ?
2] जुलै महिन्यात पाच वेळा किती वार येतात ?
3] कोणत्या ज्ञानेंद्रीयामार्फत आपणाला सर्वात जास्त ज्ञान मिळते ?
4] कोकणातील महाडजवळचे उमरठे हे शिवरायांच्या कोणत्या स्वामिनिष्ठ सरदाराचे गाव ?
5] दक्षिण भारतातील प्रमुख पीक कोणते ?
6] full म्हणजे पूर्ण भरलेला तर, fool म्हणजे काय ?
7] संगणकात टीव्हीच्या पडद्यासारखे दिसणाऱ्या साधनाला काय म्हणतात ?
8] सातारा जिल्ह्यातील कोणते गाव ' कांद्याची बाजारपेठ ' म्हणून प्रसिद्ध आहे ?
9] गाडीच्या टायरमध्ये कोणत्या वायुचा हवेसारखा उपयोग करतात ?
10] महाराष्ट्रात ' कामगार दिन ' कोणत्या दिनी साजरा होतो ?

नितीन आत्माराम जाधव [ विषयशिक्षक ]
जि.प.शाळा,आपटी ता.जावली जि.सातारा
Mob. 9922777064